घरमनोरंजनसाखरपुड्याच्या निमित्ताने निशी, नीरज आणि मेघनाच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा येईल?

साखरपुड्याच्या निमित्ताने निशी, नीरज आणि मेघनाच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा येईल?

Subscribe

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत निशीच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. एकीकडे लालीने श्रीनू साठी मुली बघायला सुरुवात केलेय ज्याने श्रीनू आणि ओवी अस्वस्थ आहेत. पण उमा दोघांना धीर देते. इकडे नीरज आणि निशीच्या लग्नासाठी मेघना आपल्याकडून तयारी सुरु करते. ती निशीसाठी खास नव्या शैलीच्या दागिन्यांच्या डिझाइन्स बघते आणि निशीला ही दाखवते. निशी म्हणते मला साधं राहायला आवडतं मला जास्त दागिन्यांची हौस नाही. पण नीरज एकटा मुलगा असल्याने आणि निशी त्याची बायको होणार असल्याने.. मेघनालाही हौस मौज करायची इच्छा आहे. पण नीरज त्या सगळ्या संवादात फार अलिप्त आहे. हे पाहून मेघनाला वाईट वाटतं.

मेघना खोतांच्या घरी जाऊन रघुनाथ आणि दाईचीला सांगते की मला माहितीये तुम्ही सगळे अजुनही माझ्याकडे संशयानेm बघता पण निशी सून म्हणून आमच्या घरी येण्याआधी मला माझ्या हातून झालेल्या प्रत्येक चुकीचं प्रायश्चित्त घ्यायचं आहे आणि ह्यापुढे माझ्याकडून फक्त त्या दिशेनेच प्रयत्न होतील.

- Advertisement -

मेघना खरंच बदललेय की तिच्या डोक्यात अजून काहीतरी शिजतंय? या साखरपुड्याच्या निमित्ताने निशी, नीरज आणि मेघनाच्या नात्यामध्ये पुन्हा गोडवा आणू शकेल?


हेही वाचा :

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ कार्यक्रमाचा पहिला प्रोमो समोर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -