घर मनोरंजन रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा करणार लग्न?

रश्मिका मंदाना-विजय देवरकोंडा करणार लग्न?

Subscribe

टॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या जोडीचे अनेक चाहते आहेत. या दोघांनी बऱ्याच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या चित्रपटांमुळे बऱ्याचदा या दोघांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरु असतात. दरम्यान, अशातच आता पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय देवरकोंडा यांच्या अफेअर्सच्या सुरु झाल्या आहेत. या मागचं कारण म्हणजे, या दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावरुन हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं म्हटलं जात आहे.

रश्मिका आणि विजय लिव्ह-इन मध्ये?

नुकताच रश्मिकाने तिच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात तिने नारंगी रंगाची साडी नेसली असून तिच्या मागील बॅकग्राऊंडला गार्डन दिसत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी विजयने देखील त्याचा एक फोटो शेअर केला होता त्यावेळी त्याच्या मागे देखील हाच सेम बॅकग्राऊंड दिसत आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे चाहते कमेंट करुन दोघं एकत्र राहत असल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काहीतरी सुरु आहे असं देखील म्हटलं जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

- Advertisement -

दरम्यान, अद्याप विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाने याबाबत काही खुलासा केलेला नाही. या आधी देखील मालदीवच्या ट्रिपवर ते दोघं एकत्र असल्याचं अनेकजण म्हणत होते. या दोघांनी ‘डियर कॉमरेड’ आणि ‘गीता गोविंदम’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.


हेही वाचा :

शाहरुखचा ‘जवान’ आज प्रदर्शित; पहिल्याच दिवशी ‘पठाण’चा मोडणार रेकॉर्ड?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -