टॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती वारंवार आपले नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. तसेच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यातील गोष्टी सुद्धा तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे शेअर करत असते. दरम्यान, अशातच समंथाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, समंथा आजारी असल्यामुळे करिअरमधून मोठा ब्रेक घेत आहेत.
समंथा घेणार करिअरमधून ब्रेक?
View this post on Instagram
टॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री समंथा मागील अनेक महिन्यांपासून दुर्मिळ आजाराचा सामना करत आहे. याबाबत काही महिन्यांपूर्वी तिने सोशल मीडियाद्वारे माहिती देखील दिली होती. दरम्यान, अशातच या आजारातून पूर्णपणे ठीक होण्यासाठी समंथा करिअरमधून ब्रेक घेणार आहे. ब्रेक घेण्यापूर्वी ती तिचे शेवटचे दोन प्रोजेक्ट पूर्ण करुन जाणार आहे.
समंथाचे शेवटचे दोन चित्रपट
View this post on Instagram
समंथा करिअरमधून ब्रेक घेण्यापूर्वी वरुण धवनसोबत सिटाडेल चित्रपटाचे शूटिंग आणि विजय देवरकोंडासोबत कुशी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करणार आहे. या चित्रपटांच्या शूटिंगनंतर समंथा संपूर्ण एक वर्ष कोणताही चित्रपट करणार नाही. या काळात ती तिच्या आरोग्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणार आहे.