थप्पड प्रकरण Will Smith ला भोवलं; Oscar Academy ने घेतला मोठा निर्णय

ऑस्‍कर अवॉर्ड्स सुरू असताना प्रेझेंटर क्रिस रॉकने विलच्या पत्नीची खिल्ली उडवली होती, त्यामुळे विल स्मिथने संतापून त्याच्या कानाखाली थप्पड लगावली. याच प्रकरणी आता ऑस्कर अकादमीने विल स्मिथबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. जो त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे

Will Smith banned from Oscars ceremonies for 10 years over chris rock slap in 94 oscar award ceremony
थप्पड प्रकरण Will Smith ला भोवलं; Oscar Academy ने घेतला मोठा निर्णय

‘द मॅन इन ब्लॅक’चा अभिनेता विल स्मिथ खूप प्रसिद्ध आहे. विल स्मिथचे जगभरात प्रचंड मोठा चाहता वर्ग आहेत. प्रेक्षक त्याच्या दमदार अभिनयाचे आणि चित्रपटांचे चाहते आहेत, पण आजकाल तो त्याच्या अभिनयामुळे नाही तर ऑस्करशी संबंधित थप्पड प्रकरणामुळे चर्चेत आलाय. क्रिस रॉकला मारलेली ही थप्पड आता विल स्मिथला चांगलीच भोवली आहे. ऑस्‍कर अवॉर्ड्स सुरू असताना प्रेझेंटर क्रिस रॉकने विलच्या पत्नीची खिल्ली उडवली होती, त्यामुळे विल स्मिथने संतापून त्याच्या कानाखाली थप्पड लगावली. याच प्रकरणी आता ऑस्कर अकादमीने विल स्मिथबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. जो त्याच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. (chris rock slap oscars)

अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने (Academy of Motion Picture Arts and Sciences) थप्पड प्रकरणी कडक कारवाई करत 10 वर्षांसाठी विल स्मिथला ऑस्कर सोहळ्यात सहभागी होण्यास बंदी घातली आहे. म्हणजेच आता पुढील 10 वर्षे तो ऑस्करच्या कोणत्याही सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. अकॅडमीचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन आणि सीईओ डॉन हडसन यांनी एका निवेदनात जारी केलं आहे. ज्यात त्यांनी म्हटले की “94 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचा उद्देश लोकांचा गौरव, उत्सव साजरा करणे आहे. ज्याने गेल्या वर्षी अविश्वसनीय कार्य केले. पण यंदा विल स्मिथच्या अस्वीकार्य वागण्याने त्यावर पाणी फिरवले. दरम्यान या घटनेनंतर विल स्मिथने यापूर्वीच अकॅडमीचा राजीनामा दिला आहे. त्याने माफी मागत एक निवेदन जारी करून आपला निर्णय जाहीर केला.

2022 ऑस्कर अकॅडमी पुरस्कार सोहळ्यादरम्यान हॉलिवूड अभिनेता विल स्मिथची पत्नी जेडाची तिच्या आजारपणावरून कॉमेडियन क्रिस रॉकने खिल्ली उडवली. त्यामुळे संतापलेल्या विल स्मिथने कसाही विचार न करता स्टेटवर येत थेट क्रिस रॉकच्या कानशिलात लगावली. या थप्पडचा आवाज जगभरात ऐकू आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.


थप्पड प्रकरणानंतर Will Smith ने दिला अ‍ॅकडमीचा राजीनामा