तापसी करणार सुपरस्टार शाहरुख खान सोबत बिग बजेट सिनेमात काम?

तापसी सुपरस्टार शाहरुख खान(Shahrukh Khan) तसेच दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Raajkumar Hirani) यांच्या एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे

Will Tapasi work with superstar Shah Rukh Khan in big budget movies?
तापसी करणार सुपरस्टार शाहरुख खान सोबत बिग बजेट सिनेमात काम?

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Tapsee Pannu)सध्या प्रचंड व्यस्त आहे. तापसीकडे अनेक सिनेमाच्या रांगा लागल्या आहे. तसेच तिचा आगामी सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. नूकतच तापसी सुपरस्टार शाहरुख खान(Shahrukh Khan) तसेच दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Raajkumar Hirani) यांच्या एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. पण वेळीच तापसीने या सर्व खोट्या बातम्या असल्याचे एका मुलाखती दरम्यान स्पष्ट केले आहे. मुलाखती दरम्यान तापसीने तिच्याबद्दल पसरत असणाऱ्या अफांना पुर्णविराम देत म्हणाली आहे की, “जर अशाप्रकारचा कोणताही सिनेमा साईन केला असेल तर मी ही बातमी तुम्हां सगळ्यांना घराच्या पत्र्यावर चढून ओरडून सांगेन. तुम्ही मुंबईत कुठेही असणार तरी तुम्हाला माझा आवाज ऐकू येईन.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

लोकांपासून लपवून ठेवावी यांसारखी काही लाजीरवाणी गोष्ट नाहीये. माझ्या जवळ स्क्रीप्ट आली तर मी हे प्रोजेक्ट दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीजवळ जाऊ देणार नाही मला दुप्पट मेहनत करावी लागली तरी मी करेन. एका वर्षात मला 300 दिवस काम करावे लागले तरी हरकत नाही. मी ध्येया पर्यंत पोहचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. करीयरच्या सुरूवातीला मला खूप विचित्र स्क्रिप्टची निवड करावी लागात होती करण मला स्क्रिनवर सतत दिसण्याची गरज होती. पण आता परीस्थिती बदलली आहे मी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट निवडू शकते वेगळ्या भूमिका करु शकते.” अशा आशयाचं वक्तव्य करत तापसीने चाहत्यासमोर खरी बाजू समोर आणली आहे.हे हि वाचा – InstagramRichlist2021: प्रियांका इंस्टाग्रामच्या रिचलिस्टमध्ये, एका पोस्टसाठी पैसे माहितेयत का ?