घरमनोरंजनहोळीच्या निमित्ताने शिवा आणि आशुवर चढेल का प्रेमाचा रंग?

होळीच्या निमित्ताने शिवा आणि आशुवर चढेल का प्रेमाचा रंग?

Subscribe

‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ह्या मालिकेचा होळी विशेष भाग नुकताच चित्रित झाला. शिवा, आशुची गुंडांच्या तावडीतून सुटका करते आणि तेव्हा तिला हाताला जखम होते तर आशुची शिवासाठी मलमपट्टी करण्याची धडपड पाहून शिवाला मनातून अतिशय आनंद होतोय. अप्पर आणि सायलेंसर हे सगळं बघतात आणि त्यांना वाटत की आशुच शिवाची छान काळजी घेऊ शकतो. शिवाच्या हाताला लागलेल असूनसुद्धा शिवा होळीतुन नारळ काढते.

रंगपंचमीच्या दिवशी आशु ठरवतो की पहिला रंग माझ्या होणाऱ्या बायकोला लावेन, पण इकडे पाना गँग ठरवते की शिवाला पहिला रंग आशुच लावेल. आशु आणि मांजा वस्तीत येतात तेव्हा पाना गँग आशूला चॅलेंज करते की दम असेल तर शिवाला रंग लावून दाखव. तिकडे आशु रंग लावायला आलेला बघून शिवा पळत सुटते.


हेही वाचा : Times Square वर झळकले सिद्धू मुसेवालाच्या भावाचे फोटो

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -