घरमनोरंजनटॉम क्रुज आणि प्रभास एकत्र झळकणार,‘मिशन इम्पॉसिबल7’मध्ये डार्लिंग प्रभासची वर्णी?

टॉम क्रुज आणि प्रभास एकत्र झळकणार,‘मिशन इम्पॉसिबल7’मध्ये डार्लिंग प्रभासची वर्णी?

Subscribe

रे क्रिस्टोफर मैक्वेरी याने आगामी 7 व्या भागासाठी प्रभासशी संपर्क साधला होता. क्रिस्टोफर मैकक्वेरी ‘मिशन इम्पॉसिबल7'मध्ये प्रभासला कास्ट करणार आहे.

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रुज(Tom Cruise) सध्या आगामी सुप्रसिद्ध चित्रपट ‘मिशन इम्पॉसिबल’ च्या 7 व्या भागाच्या चित्रिकरणात सध्या कमालीचा व्यस्त आहे. तसेच जगामध्ये ‘मिशन इम्पॉसिबल’ चित्रपटाने प्रचंड असा चाहता वर्ग निर्माण केला आहे.भला मोठा सिनेमाप्रेमी वर्ग असणार्‍या भरतामध्येही याची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. जर ‘मिशन इम्पॉसिबल’ या हॉलीवूडपटात भारतातील सुप्रसिद्ध स्टार प्रभासची एंट्री झाली तर,तुम्ही म्हणाल ‘काय सांगाताय?’ सध्या सोशल मीडियावर एक पोस्टर व्हायरल होत आहे आणि यात असे दिसत आहे की सुप्रसिद्ध अभिनेता डार्लिंग प्रभासची ‘मिशन इम्पॉसिबल7 ‘ सिनेमात वर्णी लागली आहे. पण अद्याप याबतीत काही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीये तरीसुद्धा चाहते प्रभासला‘मिशन इम्पॉसिबल7’ मध्ये पहण्यास कमालीचे उत्सुक दिसत आहेत.

- Advertisement -

काय लिहलं आहे व्हायरल पोस्टमध्ये?

सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या पोस्टमध्ये सुपरहिट फ्रेंचाइझी ‘मिशन इम्पॉसिबल’ सिनेमच्या दोन भागांचे दिग्दर्शन करणारे क्रिस्टोफर मैक्वेरी याने आगामी 7 व्या भागासाठी प्रभासशी संपर्क साधला होता. क्रिस्टोफर मैकक्वेरी ‘मिशन इम्पॉसिबल7’मध्ये प्रभासला कास्ट करणार आहे. तसेच त्यांची याबाबत चर्चा देखील झाली आहे. पोस्ट मध्ये लिहल्या प्रमाणे प्रभास इटली मध्ये ‘राधे श्याम’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान क्रिस्टोफर मैक्वेरी आणि प्रभासची भेट झाली पण सध्या प्रभास किंवा ‘मिशन इम्पॉसिबल’ टिम कडून या बातमी बाबत शिक्कामोर्तब करण्यात आला नाहीये. व्हायरल होणारी पोस्ट खरी आहे की खोटी अद्याप याबाबत कोणतीही सत्यता समोर आली नाहीये.
पण ही बातमी ऐकून प्रभासच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘मिशन इम्पॉसिबल’ सिरिजच्या पुढच्या भागाची चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत. 22 मे 2022 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

- Advertisement -

हे हि वाचा – KRK च्या राधे रिव्ह्यू विरोधात सलमान खानने ठोकला मानहानीचा दावा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -