घरमनोरंजनतब्बल २५ वर्षानंतर Michael Jackson च्या शो साठीचा कर परत देणार

तब्बल २५ वर्षानंतर Michael Jackson च्या शो साठीचा कर परत देणार

Subscribe

१९९६ साली जगप्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सनच्या शोच भारतात आयोजन करण्यात आले होते. विझक्राफ्ट या कंपनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

मुंबईत १९९६ मध्ये प्रसिद्धा पॉप गायक मायकेल जॅक्सनच्या झालेल्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क परत देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मायकल जॅक्सनच्या कार्यक्रमासाठी ३ कोटी ३३ लाख ७६ हजार इतकी रक्कम मनोरंजन कर आणि अधिभाराची रक्कम म्हणून जमा करण्यात आली होती. जमा झालेली रक्कम विझक्राफ्ट कंपनीला परत करण्याचा प्रस्ताव महसूल विभागाने तयार केला होता. मंत्रीमंडळाची बुधवारी बैठक झाली त्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात येणार आहे. शिवसेनेची आणि भाजपची १९९५ मध्ये युती झाल्यानंतर युती सरकार सत्तेत असताना ही करमणूक शुल्क माफी वादग्रस्त ठरली होती. मुंबई उच्च न्यायालयाने तो निर्णय रद्द करून पुन्हा सुनावणीचे आदेश दिले होते. मात्र आता तब्बल २५ वर्षांनंतर या निर्णयावर सुनावणी होणार आहे.

१९९६ साली जगप्रसिद्ध पॉप सिंगर मायकल जॅक्सनच्या शोच भारतात आयोजन करण्यात आले होते. विझक्राफ्ट या कंपनीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे मायकल जॅक्सन हा क्लासिकल सिंगर असल्याचे दाखवून या शोसाठी ३ कोटी ३४ लाखांचा करमणूक कर माफ करण्यात आला. या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेमुळे विझक्राफ्ट कंपनीने ३ कोटी ३४ लाखांची रक्कम कर म्हणून न्यायालयात जमा केली होती. करमणूक कर माफ करणाऱ्या युती सरकारला उच्च न्यायालयाने ताशेरे ओढले होते. विजक्राफ्ट या कंपनीने करमणूक करेची रक्कम परत करवी यासाठी राज्य सरकारकडे अर्जही करण्यात आला होता. त्यामुळे २५ वर्षांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत विजक्राफ्ट कंपनीला करमणूक कराच्या रकमेत सुट मिळण्यासाठी प्रस्ताव येणार असून त्यावर योग्य निर्णय होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

पॉप सिंगर मायकल जॅक्सन याला भारतात आणण्यासाठी शिवसेने पुढाकार घेतला होता. त्या वेळी शिवउद्योग सेनेची स्थापना झाली होती. यात त्यावेळी राज ठाकरे यांनी मोठा सहभाग दर्शवला होता.मायकल जॅक्सनला विमानतळावर आणण्यासाठी स्वत: राज ठाकरे. शर्मिला ठाकरे आणि अभिनेत्री सोनाली बेंद्रेही गेली होती. मायकल जॅक्सनचे भारतीय पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले होते. भारतात आल्यानंतरच्या अनेक आठवणी मायकल जॅक्सन यांनी लिहून ठेवल्या आहेत.


हेही वाचा – अलियाचा ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटागृहात प्रदर्शित होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -