Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
HomeमनोरंजनWomens Day 2025 : महिलांनी आवर्जून पाहावे हे सिनेमे

Womens Day 2025 : महिलांनी आवर्जून पाहावे हे सिनेमे

Subscribe

पूर्वीच्या स्त्रिया ‘चूल आणि मूल’पुरता मर्यादित जीवन जगायच्या. पण आजची स्त्री शिक्षण, अधिकार आणि करिअरकडे सकारात्मकतेने पाहते. इतकेच नव्हे तर ती घर सांभाळताना समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठीसुद्धा कार्यरत आहे. अशा स्त्रियांनी आवर्जून पाहाव्या अशा अनेक कलाकृती आहेत. ज्यांपैकी काही सिनेमांविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महिलांचे भावविश्व उलगडणारे, त्यांच्या विचारांचा आणि अधिकारांचा आदर करणारे टॉप सिनेमे कोणते? यावर एक नजर टाकूया.

1. क्विन

अभिनेत्री कंगना रणौत अभिनित हा सिनेमा लग्न मोडलेल्या तरुणीच्या आयुष्यावर भाष्य करतो. ठरलेलं लग्न मोडल्यानंतर एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी एकटीच विदेशात जाते. तेही हनीमूनसाठी.. यानंतर तिचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलतो आणि तिच्यात कसा बदल होतो? हे या सिनेमात पहायला मिळतं. हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

2. पिंक

‘पिंक’ हा सिनेमा समाजाच्या मूर्ख मानसिकतेवर आणि बुरसटलेल्या पुरुषी विचारांवर भाष्य करतो. त्यामुळे एखाद्या महिलेकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहणाऱ्या वृत्तीवर टिप्पणी करणारा हा सिनेमा प्रत्येक स्त्रीने एकदा तरी पाहावा. या सिनेमात अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनेत्री तापसी पन्नू, कीर्ती कुल्हारी आणि अँड्रिया तारिआंग मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

3. थप्पड

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा ‘थप्पड’ हा एक सर्वोत्तम सिनेमा आहे. यामध्ये एका गृहिणीला तिचा नवरा भर कार्यक्रमात कानाखाली मारतो. यानंतर ती गृहिणी संपूर्ण कुटुंबाला आणि समाजाला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देते. या सिनेमात अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत झळकली आहे. हा सिनेमा अमेझॉन प्राईम व्हिडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

4. लापता लेडीज

हलक्या फुलक्या विनोदांसह एका सामाजिक संदेश देणाऱ्या कथेची मांडणी म्हणजे ‘लापता लेडीज’. या सिनेमात अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने समाजातील लैंगिक भेदभाव तसेच रुढी परंपरांवर भाष्य करण्यात आले आहे. ज्यात दोन महिलांचे चरित्र अत्यंत खुबीने मांडण्यात आले आहे. या सिनेमात स्पर्श श्रीवास्तव, नितांशी गोएल, प्रतिभा रांता, रवी किशन आणि छाया कदम अशी स्टारकास्ट झळकली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

5. दो पत्ती

‘दो पत्ती’ हा एक जबरदस्त सिनेमा आहे. ज्यात सौम्या आणि शैली या दोन जुळ्या बहिणींची गोष्ट पाहायला मिळते. हा सिनेमा अत्यंत रंजक पद्धतीने घरगुती हिंसाचारावर भाष्य करतो. यातील ट्विस्ट तुम्हाला खिळवून ठेवणारे आहेत. या सिनेमात अभिनेत्री क्रिती सॅनॉनने जुळ्या बहिणींची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री काजोल पोलिस आणि वकिलाच्या भुमिकेत झळकली आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

6. मिसेस

अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘मिसेस’ हा सिनेमा लग्नानंतरची घुसमट, घरातल्या जबाबदाऱ्या आणि हिरावलेलं स्वातंत्र्य यावर भाष्य करतो. एक स्त्री लग्नानंतर आलं आयुष्य समोरच्या कुटुंबावर बदलते. पण तिच्यासाठी समोरील कुटुंब बदलतं का? या अत्यंत महत्वाच्या विषयावर हा सिनेमा बनवण्यात आला आहे. सध्या गुगलवर हा सिनेमा सर्वाधिक सर्च केला जातोय. या सिनेमात अभिनेत्री सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकली आहे. हा सिनेमा ZEE 5 वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

हेही पहा –

Tamannah Bhatia & Vijay Varma Breakup Reason: तमन्ना- विजयच्या ब्रेकअपचे कारण आले समोर