Women’s Day : विक्की कौशलने शेअर केला आई आणि बायकोचा अनसीन फोटो

कतरिना आणि तिच्या सासूमध्ये असलेले नातेसंबंध पाहून चाहते देखील अवाक झाल्याचे पहायाला मिळाले आहे.

womens day vicky kaushal sharesPhoto of mom and wife katrina kaif
Women's Day : विक्की कौशलने शेअर केला आई आणि बायकोचा अनसीन फोटो

बॉलिवूड अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal )  सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. डिसेंबर महिन्यात विक्कीने अभिनेत्री कतरिना कैफसोबत (Katrina Kaif )  लग्नगाठ बांधली. तेव्हा पासून विक्की जरा जास्तच चर्चेत आला आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त विक्कीने त्याच्या आयुष्यातील महत्त्वाच्या महिलांचा फोटो शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे. विक्कीने पत्नी कतरिना आणि आई वीना कौशल या दोघींचा एक अनसीन फोटो शेअर केला आहे. विक्की आणि कतरिनाच्या चाहत्यांना पहिल्यांदा सासू सूनेतील अनोखे बंध या फोटोतून पाहायला मिळाले. फोटोमध्ये कतरिना सासूच्या मांडीवर बसली आहे. दोघांमधील प्रेम, जिव्हाळा या फोटोमधून पाहायला मिळत आहे.

‘माझी ताकद आणि माझं जग’, असे म्हणत विक्कीने आई आणि बायकोचा फोटो शेअर केला आहे. विक्कीने फोटो शेअर करताच चाहत्यांनी काही वेळातच फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. कतरिना आणि तिच्या सासूमध्ये असलेले नातेसंबंध पाहून चाहते देखील अवाक झाल्याचे पहायाला मिळाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

विक्कीच्या फोटोवर एका युझर्सने कमेंट करत म्हटले, ,सासू सूनेत किती ते प्रेम,, तर दुसऱ्या युझरने ,मम्मा कौशल आणि बेटी कौशल’, म्हणत प्रेम व्यक्त केलेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

तर दुसरीकडे कतरिनाने महिला दिनानिमित्त तिच्या बहिणींसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. कतरिना मिळून त्या एकूण पाच बहिणी आहेत. फोटोमध्ये एकूण सहा जणी रस्त्यावर मस्त वॉक करताना दिसत आहेत. ‘एका कुटुंबात बऱ्याच महिला’, असे म्हणत कतरिनाने फोटो शेअर केलाय. कतरिनाच्या या फोटोला तिच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली आहे.


हेही वाचा –  ‘gangubai kathiawadi’ च्या घवघवीत यशानंतर आलिया करणार ‘हॉलिवूड’मध्ये पदार्पण