घरमनोरंजन‘वंडर विमेन’ 18 नोव्‍हेंबरला होणार प्रदर्शित

‘वंडर विमेन’ 18 नोव्‍हेंबरला होणार प्रदर्शित

Subscribe

महिलांची मैत्री नवीकरणीय ऊर्जा स्रोतासारखी असते. एका महिलेने दुसऱ्या महिलेला प्रोत्‍साहित करताना पाहणे कोणाला आवडणार नाही? यामधून साहचर्य व नात्‍याच्‍या सुरेख गाथा रचल्‍या जातात. विभिन्‍न पार्श्‍वभूमींमधील अशा ७ महिलांचा प्रवास अनुभवण्‍यासाठी पहा सोनी लिव्‍हची आगामी बहुभाषिक ओरिजिनल सिरीज ‘वंडर विमेन’. हा चित्रपट १८ नोव्‍हेंबर रोजी फक्‍त सोनी लिव्‍हवर प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट सहा गर्भवती महिलांची कथा सादर करतो, ज्या गर्भधारणा व बाळंतपणाबाबत विश्वास, गोंधळ आणि प्रश्नांसह प्रसूतीपूर्व कक्षामध्‍ये येतात. या सर्व गोष्‍टींचा उलगडा करण्‍याच्‍या प्रयत्‍नात त्यांना त्यांची ओळख आणि त्यांच्या खोलवर रुजलेल्या समस्यांची उत्तरे सापडतात.

- Advertisement -

अमृता सुभाषने या चित्रपटात पुराणमतवादी महाराष्‍ट्रीयन महिला जयाची भूमिका साकारली आहे, जी उपचारासाठी तिच्‍या पतीसोबत केरळला जाते. ही भूमिका आणि तिच्‍या वास्‍तविक जीवनातील पतीसोबत शूटिंग करण्‍याच्‍या अनुभवाबाबत सांगताना ती म्‍हणाली, “जया प्रबळ महिला आहे, पण तिची शक्‍ती मनातच लपलेली आहे. ती सुरूवातीपासून प्रत्‍येक गोष्‍टीसाठी तिच्‍या पतीवर खूपच अवलंबून असते. पण ती उपचारासाठी केरळला जाते आणि स्थिती तिच्‍यासाठी बदलू लागते. माझ्यासाठी ही भूमिका अद्वितीय असण्‍यामागील कारण म्‍हणजे वास्‍तविक जीवनातील माझ्या पतीनेच या चित्रपटामध्‍ये माझ्या पतीची भूमिका साकारली आहे. यासाठी मी अंजली मेनन यांचे आभार मानते. माझे पती संदेश कुलकर्णीसोबत काम करण्‍याचा अनुभव अत्‍यंत वेगळा होता. आम्‍ही दोघे एकमेकांना खूप काळापासून ओळखतो. चित्रपटामध्‍ये आम्‍हाला एकत्र काम करताना पाहून प्रेक्षकांना पडद्यावर आमची परिपूर्ण केमिस्‍ट्री पाहायला मिळेल. आम्‍ही सोनी लिव्‍हवर या चित्रपटाला अद्भुतरित्‍या सकारात्‍मक प्रतिसाद मिळताना पाहण्‍यास उत्‍सुक आहोत.’’

अंजली मेनन यांचे लेखन व दिग्‍दर्शन आणि आरएसव्‍हीपी फ्लाईंग युनिकॉर्न एंटरटेन्‍मेंटसह लिटल फिल्‍म्‍स प्रॉडक्‍शन्‍स निर्मित या चित्रपटामध्‍ये नित्‍या मेनन, पार्वती थिरूवोथू, अमृता सुभाष, नदिया मोयडू, पद्मप्रिया जनकिरमन, सायानोरा फिलिप, अर्चना पद्मिनी प्रमुख भूमिकेत आहेत. या महिलांच्‍या कथेचे इंग्रजीमध्‍ये चित्रीकरण करण्‍यात आले आहे, ज्‍यामध्‍ये हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू, मल्‍याळम व कन्‍नड या भाषा देखील आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

दीपिका पादुकोणने लाँच केला तिचा सेल्फ केअर ब्रँड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -