घरमनोरंजनमोठ्या कलाकारांबरोबर काम करणं दडपणाचं - प्रतीक बब्बर

मोठ्या कलाकारांबरोबर काम करणं दडपणाचं – प्रतीक बब्बर

Subscribe

आपल्या स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांचा उपयोग करत 'मुल्क' चित्रपटातील भूमिका प्रतीक बब्बर साकारत आहे. अनेक मोठ्या कलाकारांबरोबर काम करण्याचं दडपण असल्याचं त्यानं म्हटलं आहे.

सध्या ‘मुल्क’ चित्रपटाच्या चर्चा सगळीकडेच आहेत. प्रतीक बब्बर पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. मात्र, या चित्रपटातील स्टारकास्ट खूपच तगडी आहे. ऋषी कपूर, आशुतोष राणा, नीना गुप्ता यांच्यासारख्या मातब्बर कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय दडपणाचं आणि तितकाच उत्साही असल्याची भावना अभिनेता प्रतीक बब्बरनं व्यक्त केली आहे. या कलाकारांचं काम इतकं उत्तम आहे त्यामुळं नेहमीच आपलं काम चांगलं करण्याच्या प्रयत्नात असल्याचंही त्यानं म्हटलं आहे. आपलं काम कसं झालं आहे याबद्दल सतत अनुभव सिन्हा यांना विचारणा करत असल्याचंही प्रतीकनं म्हटलं आहे.

‘मुल्क’मध्ये काय आहे प्रतीकची भूमिका?

‘मुल्क’ चित्रपटात प्रतीक बब्बर एका आतंकवाद्याची भूमिका साकारत आहे. आपल्या तरूणपणात जगण्याचा रस्ता हरवलेला हा युवक आहे. शाहीद नामक आतंकवाद्याची भूमिका प्रतीक साकारत असून आपल्या खऱ्या आयुष्यातूनच प्रेरणा घेऊन ही भूमिका साकारल्याचं प्रतीकनं सांगितलं आहे. ही भूमिका साकारण्यापूर्वी आपण मनात एक शाहीदची छवी साकारून आपल्या जीवनातूनच प्रेरणा घेतल्याचं प्रतीकचं म्हणणं आहे. ‘तरूण वयात जर तुम्हाला चुकीची संगत लाभली तर आयुष्य पूर्णतः भरकटतं माझ्या आयुष्यातदेखील ही वेळ आली होती. तुमच्या मनावर अशा अवस्थेत खूपच प्रभाव पडतो आणि अशा मनस्थितीमध्ये तुम्हाला चांगलं आणि वाईट याची जराही कल्पना नसते. या सर्व गोष्टींमुळेच ही भूमिका साकारणं माझ्यासाठी एक आव्हान होतं,’ अशी प्रतिक्रिया प्रतीकनं दिली आहे.

- Advertisement -

एका मुस्लीम परिवाराची कथा

‘मुल्क’ चित्रपटाची कथा ही एका मुस्लीम परिवाराची असून ३ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रतीकसह तापसी पन्नू, ऋषी कपूर, आशुतोष राणा, रजत कपूर, नीना कुलकर्णी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाचं जास्त चित्रीकरण हे लखनऊमधील गल्ल्यांमध्ये करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -