घरमनोरंजननालासोपाराच्या ग्रुपने जिंकला 'वर्ल्ड ऑफ डान्स' हा रिअॅलिटी शो

नालासोपाराच्या ग्रुपने जिंकला ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ हा रिअॅलिटी शो

Subscribe

द किंग्स' ग्रुपने 'वर्ल्ड ऑफ डांस' च्या फिनालेमध्ये बाहूबली हा अॅक्ट केला. त्यांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स बघून जज आणि प्रसिध्द सिंगर-अभिनेत्री जेनिफर लोपेज एकटक डान्स बघत होते.

‘वर्ल्ड ऑफ डान्स’ हा अमेरिका डांस रियॅलिटी शो मुंबईच्या ‘द किंग्स’ या हिप हॉप डांस ग्रुपने जिंकला आहे. या ग्रुपने फिनालेमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला. त्यांच्या या परफॉर्मन्समुळे जज आणि उपस्थितांनी तोंडात बोटं घातली. त्यांच्या या परफॉर्मन्सवरून कोणाचीच नजर हटत नव्हती.

- Advertisement -

‘द किंग्स’ ग्रुपने ‘वर्ल्ड ऑफ डांस’ च्या फिनालेमध्ये बाहूबली हा अॅक्ट केला. त्यांचा हा धमाकेदार परफॉर्मन्स बघून जज आणि प्रसिध्द सिंगर-अभिनेत्री जेनिफर लोपेज एकटक डान्स बघत होते. हा डान्स बघताना जेनिफर अक्षरश: किंचाळली. असा एकदम कडक परफॉर्मन्स करत या ग्रुपने मुंबईचं नावं रोशन केलं. आणि विजय आपल्या नावावर केला.

- Advertisement -

या डान्स ग्रपुचे कोरिओग्राफर आहेत सुरेश मुकूंद. या विजेतेपदाविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘वर्ल्ड ऑफ डान्स’ जिंकल्यानंतर आता १२ सदस्य डान्स स्पर्धेत भाग घेणार नाहीये. आम्ही दोन वर्षापूर्वी भारतात बाहुबली चा एॅक्ट केला होता. तो व्हीडीओ खूप व्हायरल झाला. मला खात्री होती की या डान्समध्ये स्लो मोशन धम्माल उडवून देईल. म्हणून मी हा डान्स फिनालेसाठी ठेवला. हा शो जिंकल्यावर १० लाख डॉलर बक्षीस म्हणून मिळाले आहेत.

मुंबईच्या नालासोपारामधील ‘द किंग्स’ हा ग्रुप आहे. ‘वर्ल्ड ऑफ डांस’ हा रिअॅलिटी शो जिंकल्यामुळे या ग्रुपने भारताबरोबर मुंबईचं नावही रोशन केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -