खऱ्या बातम्या लिहा, डोनाल्ड ट्रंपच्या स्टाइलमधील बातम्या नको…ललित मोदींचे ट्रोलर्सना सडेतोड उत्तर

गुरूवारी ललित मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची घोषणा केली. याबातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, तेव्हा पासून सोशल मीडियावर अनेकजण त्या दोघांना ट्रोल करत आहेत, त्यामुळेच त्या ट्रोलर्सना प्रत्युत्तर देण्यासाठी ललित मोदींनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

आईपीएल ते माजी चेअरमन ललित मोदी यांनी गुरूवारी त्यांच्या आणि सुष्मिताच्या नात्याची सोशल मीडियाद्वारे घोषणा केली.

मागील काही दिवसांपासून भारतात अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आईपीएल ते माजी चेअरमन ललित मोदी यांच्या नात्याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकजण सुष्मिता आणि ललित मोदींच्या नात्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. याचं दरम्यान आता ललित मोदी यांनी आपली बाजू मांडत आपल्या सोशल मीडियावर भली मोठ्ठी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवाय युजर्स त्यांना ट्रोल करत असल्यामुळे त्यांनी आपली नाराजी देखील व्यक्त केली आहे.

गुरूवारी ललित मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची घोषणा केली. याबातमीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला, तेव्हा पासून सोशल मीडियावर अनेकजण त्या दोघांना ट्रोल करत आहेत, त्यामुळेच त्या ट्रोलर्सना प्रत्युत्तर देण्यासाठी ललित मोदींनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्यांनी एका फोटोसोबत भलं मोठ्ठ कॅप्शन लिहिलेलं आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “मीडियामध्ये मला ट्रोल करण्यासाठी लोक इतके का पागल झाले आहेत? मला जाहीर रित्या चार चूकीच्या पद्धतीने टॅग केले जात आहे. मला वाटतं की आपण आता मध्य युगात राहतो. जिथे दोन लोक चांगले मित्र असू शकत नाहीत का? अशात त्या दोघांची केमिस्ट्री आणि वेळसुद्धा चांगली असेल तर अशी जादू होऊ शकते. माझा तुम्हाला सल्ला आहे की, जगा आणि जगू द्या.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Lalit Modi (@lalitkmodi)

त्यानंतर त्यांनी पुढे लिहिलंय की, “खऱ्या बातम्या लिहा, डोनाल्ड ट्रंपच्या स्टाइलमधील बातम्या नको आणि जर तुम्हाला ठाऊक नाही, तर मी माझ्या आयुष्यातील सगळ्या दिवंगत प्रेमाचा उजाळा करतो. मीनल मोदी, १२ वर्ष माझी चांगली मैत्रिण होती. मात्र, त्यांचे लग्न झाले होते. ती माझ्या आईची मैत्रिण नव्हती. ही एक अफवा विणाकारण पसरवण्यात आली होती. या छोट्या विचारांतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आशा आहे तुम्ही याचा अर्थ समजून घ्याल. जेव्हा कोण सुखी असेल तर त्याचा आनंद माना.”

ललित मोदी पुढे म्हणाले की, “तुम्ही मला पळपुटा म्हणता, मग तुम्ही मला सांगा कोणत्या कोर्टाने मला दोषी ठरवलं आहे. मी तुम्हाला काही सांगणार नाही. प्रत्येकाला माहित आहे की, भारतातील १२-१५ शहरांमध्ये व्यवसाय करणं किती कठीण आहे. मी २००८ मध्ये म्हणालो होतो आईपीएल हे मंदीचे साक्षीदार आहे. त्यावेळी सर्वजण माझ्यावर हसले होते.”


हेही वाचा :सुष्मिता सेन आणि ललित मोदीच्या अफेयरच्या बातमीवरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस