घरमनोरंजन'सरोगसी पॅरेंट्स म्हणजे रेडिमेड मुलं', सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या सेलिब्रिटींवर लेखिकेचा निशाणा?

‘सरोगसी पॅरेंट्स म्हणजे रेडिमेड मुलं’, सरोगसीद्वारे पालक बनणाऱ्या सेलिब्रिटींवर लेखिकेचा निशाणा?

Subscribe

प्रियांकाने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. ‘डेली मेल’च्या अहवालानुसार प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी 12 आठवड्यांपूर्वी सरोगसीद्वारे एका बेबी गर्लला जन्म दिला.मात्र यानंतर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन (taslima nasreen) यांनी सरोगसीबाबत केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सरोगसी वरुन सुरू असलेल्या चर्चेदरम्यान लेखिका नसरीन यांनी या प्रक्रियेवर टिका केली आहे.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) आई बाबा झाले आहेत.(Priyanka Nick Jonas) शुक्रवारी  प्रियांका आणि निक जोनसने ही गुड न्यूज सोशल मीडियाद्वारे (Social Media) चाहत्यांसोबत शेअर केली. यानंतर दोघांवरही चाहत्यांसह अनेक बड्या  सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.(Priyanka Chopra and Nick Jonas have become parents) मात्र यानंतर प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन (taslima nasreen) यांनी सरोगसीबाबत केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सरोगसी वरुन सुरू असलेल्या चर्चेदरम्यान लेखिका नसरीन यांनी या प्रक्रियेवर टिका केली आहे. तसेच सरोगसीद्वारे मातृत्व प्राप्त करणाऱ्या जोडप्यांच्या भावनांवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.(Writer taslima nasreen tweet about surrogacy paraents)

 

- Advertisement -

तस्लिमा नसरीन व्हायरल ट्विट – 

तस्लिमा यांनी एक ट्विट शेअर करत सरोगसी बाबत आपलं मत मांडल आहे.”सरोगसीच्या माध्यमातू त्या मातांना त्यांची रेडीमेड मुलं मिळाल्यावर त्यांना कसे वाटते ?, तसेच मुलांना जन्म देणाऱ्या आईप्रमाणेच त्यांच्या मुलांबद्दलच्या भावना आहेत का ? असे नसरीन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, गरीब महिलांमुळे सरोगसी शक्य आहे. श्रीमंत लोकांना त्यांच्या स्वार्थासाठी नेहमीच समाजामध्ये गरीबी पाहायची असते. जर तुम्हाला मुल वाढवायचे असेल तर बेघर, अनाथ मुलांना दत्तक घ्या यासह मुलांना तुमचे गुण वारसा हक्काने मिळायला हवेत. हा निव्वळ स्वार्थीपणा आहे. अहंकारी,अहंकार.” असा संताप नसरीन यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला आहे.

नसरीन यांच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर तेढ निर्माण होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. तसेच यामुळे दोन गट निर्माण झाले आहेत. काहींनी नसरीन यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. तर काहींनी याला विरोध देखील केला आहे. तस्लिमा यांनी ट्विटमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या नावाच उल्लेख केला नाहीये. मात्र त्याेनी केलेलं हे ट्विट प्रियांका आणि निक जोनस यांनी जाहीर केलेल्या सरोगसी पालकांच्या पर्यायाकडे रोख व्यक्त करताना दिसत आहे.

- Advertisement -

 

तस्लिमा नसरीन यांचं ट्विट 

 

 

प्रियांका- निक सरोगसीद्वारे झाले आई बाबा  

प्रियांकाने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे. ‘डेली मेल’च्या अहवालानुसार प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी 12 आठवड्यांपूर्वी सरोगसीद्वारे एका बेबी गर्लला जन्म दिला. प्रियांका चोप्राने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.याशिवाय या अहवालानुसार, या दोघांनी 27 आठवड्यातच एका बेबी गर्लला जन्म दिला आहे. सध्या, नवजात बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियातील रुग्णालयात आहेत. एप्रिलमध्ये बाळाचा जन्म होणार होता मात्र प्री-मॅच्युअर डिलीव्हरीमुळे बाळाला सध्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की प्रियांका आणि निक काही काळ मुलासाठी प्लॅन करत होते परंतु, दोघांच्या व्यस्त शेड्यूलमुळे अडचण येत होती. अशा परिस्थितीत दोघांनी सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा होण्याचा निर्णय घेतला. प्रियांका आणि निक यांनी सरोगेट आईची खूप काळजी घेतली. सोशल मीडियावर प्रियांकाने ही माहिती देत प्रत्येकाने आपली गोपनीयता राखण्याचे आवाहन केलेय. प्रियांकाने सरोगसीद्वारे एका मुलीला जन्म दिला आहे.

सरोगसी म्हणजे नेमकं काय ?

ट्रेडिशनल  (Traditional Surrogacy) आणि जेस्टेशनल  (Gestational Surrogacy) असे दोन प्रकार सरोगसीचे असतात. टेड्रिशनल सरोगसीमध्ये होणाऱ्या पित्याच्या शुक्राणूंच सरोगेट मदरच्या बीजांडाशी मिलन घडवलं जातं. त्यामुळे सरोगेट मदरच्या आधारे जन्माला येणाऱ्या बाळाची जैवीक आई अर्थात बायोलॉजिकल मदर असते. तर जेस्टेशनल सरोगसीमध्ये सरोगेट मदर आणि बाळाचं हे रक्ताचं नातं तयार होतं. होणाऱ्या बाळाच्या आई वडिलांचे क्रमानुसार बीजांड आणि शुक्राणूचा संयोग प्रयोगशाळेत केला जातो.त्यातून तयार झालेल भ्रुण टेस्ट ट्यूबद्वारे सरोगेट मदरच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केले जाते.

 

सरोगसीद्वारे पालक झालेले बॉलिवूड सेलिब्रिटी

दरम्यान बॉलिवूडमध्ये सरोगेट मदर किंवा फादर होण्याचं प्रमाण हे सध्या वाढत आहे.हाय प्रोफाई लाईफस्टाईल, कामाचा वाढता पसारा पाहता अनेक सेलिब्रिटी कपल्स सरोगसीद्वारे पालक बनण्याचा निर्णय घेतात. करण जोहर, तुषार कपूर, सनी लिओनी,शिल्पा शेट्टी यांच्या यादीत आता प्रियांका आणि निक जोनसचा देखील समावेश झाला आहे.

 


हे हि वाचा – Priyanka Chopra : प्रियांका 12 आठवड्याआधीच झाली आई, रुग्णालयात आहे प्री मॅच्युअर बेबी गर्ल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -