घरमनोरंजनYami Gautam: कुणीतरी येणार येणार गं! यामी गौतमने दिली गुडन्यूज

Yami Gautam: कुणीतरी येणार येणार गं! यामी गौतमने दिली गुडन्यूज

Subscribe

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री यामी गौतम सध्या चर्चेत आली आहे. यामी गौतमसाठी हे वर्ष खास आनंदाचे असणार आहे. यामी गौतमने नुकतीच चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. यामी गौतम आणि आदित्य धर यांच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. यामी गौतम आई होणार असून, या वर्षीच ती बाळाला जन्म देणार आहे. लग्नाच्या दोन वर्षांनंतर तिनं आनंदाची बातमी दिली आहे. तिच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यामी ही गरोदर असल्याचं आता समजत आहे.

यामी गौतम प्रेग्नेंट?

यामी आणि आदित्यने आतापर्यंत या प्रेग्नन्सीच्या चर्चांवर मौन बाळगले होते. मात्र “आर्टिकल 370” या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान यामी बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली. आगामी आर्टिकल 370 च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान आदित्य म्हणाला, “आमच्या आयुष्यात ‘बाळ लवकरच येणार आहे’ त्यामुळे हा एक अद्भुत क्षण आहे.” आता यामीच्या प्रेग्नेंसीची बातमी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आर्टिकल 370’मध्ये यामी गौतम मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती आदित्यनं केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 23 फेब्रुवारीला प्रदर्शित होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

- Advertisement -
यामी गौतमचा विवाह

यामी गौतम आणि आदित्य धर यांचा विवाह 4 जून 2021 रोजी झाला होता. यामी गौतम आणि आदित्य यांच्या लग्नाला 3 वर्ष झाली आहेत. यामी आणि आदित्य यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दोघांनी 2 वर्षे डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. आदित्यनं दिग्दर्शित केलेल्या उरी या चित्रपटात यामीनं काम केलं.

दोघेही ‘उरी: सर्जिकल स्ट्राइक’च्या सेटवर भेटले आणि तिथेच एकमेकांच्या प्रेमात पडले. आता लग्नाच्या 3 वर्षानंतर हे जोडपं आई-वडील होणार आहेत. यामी गौतम कलम 370 मध्ये एनआयए अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट जम्मू-काश्मीर राज्याला कलम 370 दिलेला विशेष दर्जा रद्द करण्याच्या मागणीवर आधारित आहे. चित्रपटाच्या प्रोमोमध्ये एक झलक देखील याबद्दल दाखवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा शोध घेताना यामी या चित्रपटात दिसणार आहे. यात साऊथ अभिनेत्री प्रियामणीचीही महत्त्वाची भूमिका आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा : उर्फीचा विचित्र ड्रेस पाहून ट्रोलर्सला आलं हसू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -