सस्पेन्स थ्रिलर ड्रामा, यामी गौतमच्या A Thursday चा ट्रेलर प्रदर्शित

ट्रेलरमध्ये यामीच्या तोंडी घातलेले डायलॉग सर्वांनाच हैराण करत आहेत. 'पोलिसांनी माझी मागणी पूर्ण केली नाही तर दर तासाला एका मुलाचा जीव जाईल' हे हा डायलॉग यामीच्या तोंडून ऐकून तिच्या चाहत्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत.

yami gautam suspense thriller drama a thursday trailer out
यामी गौतमच्या A Thursday मध्ये सस्पेन्स थ्रिलर ड्रामा, ट्रेलर प्रदर्शित

अभिनेत्री यामी गौतमच्या (yami gautam)  ‘ए थर्स डे’ (A Thursday)  या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यामीच्या या सिनेमाची सर्वत्र चर्चा होती. सिनेमाच्या ट्रेलरची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते गुरुवारी अखेर सिनेमा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. एक सस्पेन्स थ्रीलर कहाणी सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ट्रेलर इतका रंजक आणि उत्कंठावर्धक करण्यात आला आहे की ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्याची आतुरता आणखी वाढली आहे.

अभिनेत्री यामी गौतम या सिनेमातून एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्ये यामी गौमत सोबतच डिंपल कपाडिया, अतुल कुलकर्णी आणि नेहा धूपिया हे कलाकार ही दिसत आहेत. ए थर्स डे मधून यामीच्या नवा अवताराने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

२ मिनिटे २१ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये एका खोलीत १६ लहान मुले आहे ज्यांना यामी गौतम मॉनिटर करत आहे. अचानक यामी एका पोलिसाला फोन करते आणि त्याला सांगते, ‘मी कुलाब्यातील एका प्ले स्कूलमधून बोलत असून १६ मुलांना हॉस्टेज केले आहे’. ट्रेलरमध्ये यामीच्या तोंडी घातलेले डायलॉग सर्वांनाच हैराण करत आहेत. ‘पोलिसांनी माझी मागणी पूर्ण केली नाही तर दर तासाला एका मुलाचा जीव जाईल’ हे हा डायलॉग यामीच्या तोंडून ऐकून तिच्या चाहत्यांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या आहेत.

स्क्रिनवर सतत निष्पाप दिसणाऱ्या चेहऱ्याच्या मागे असलेला एक वेगळा अवतार यामीच्या या व्यक्तिरेखेतून पाहायला मिळत आहे. अभिनेत्री डिंपल कापाडिया या सिनेमात पीएमच्या भूमिकेत असणार आहे. तर नेहा धूपिया एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावणार आहे.


हेही वाचा –  Alia Bhatt: ‘ढोलीडा’वर आलिया जबरदस्त ठुमके! गंगूबाईचं नवं गाणं रिलीज