घरताज्या घडामोडीअभिनेत्री यामी गौतम करतेय 'या' आजाराचा सामना, तरीही जपलंय निखळ सौंदर्य

अभिनेत्री यामी गौतम करतेय ‘या’ आजाराचा सामना, तरीही जपलंय निखळ सौंदर्य

Subscribe

त्वचेसंबंधी असलेल्या आजारातही मॉडेलिंग आणि एक्टिंगमध्ये करिअर केले.

फेअर अँड लव्हली गर्ल अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमीच ती तिचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या तजेलदार चमकणाऱ्या त्वचेवर सारेच फिदा आहेत. मात्र यामी गौतमने तिच्या निखळ त्वचेविषयी महत्त्वाचा खुलासा केला आहे. यामी गौमत गेल्या अनेक वर्षांपासून केराटोसिस पिलारिस या त्वचेच्या संबंधीत आजाराचा सामना करत असल्याचे तिने म्हटले आहे. तिने म्हटलंय, मी जेव्हा किशोर वयात होते तेव्हापासून मला हा आजार आहे. या आजारात चेहऱ्यावर छोटे छोटे पिंपल्यसारखे दाणे येतात. त्यामुळे शुटींगवेळी मला मेकअप करताना प्रचंड त्रास व्हायचा असे यामीने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yami Gautam Dhar (@yamigautam)

- Advertisement -

यामी गौतमने तिच्या चेहऱ्याच्या आजारावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले आणि आता ती अगदी उत्तम आहे. यामी तिच्या एका पोस्टमध्ये तिच्या आजारपणाविषयी सांगत तिचे काही फोटो देखील शेअर केले होते. त्यावेळी यामी म्हणाली होती. शुटींगवेळी माझ्या चेहऱ्यावरील दाणे घालवण्यासाठी सेटवर गेल्यावर खूप चर्चा होत असत. एअरब्रश किंवा कंसीलरने चेहऱ्यावरील दाणे लपवता येतील का यासाठी सगळे प्रयत्न करायचे. चेहऱ्याच्या या समस्येमुळे माझा आतापर्यंतचा प्रवास फार आव्हानात्मक होता. यामीला त्वचेसंबंधी असलेल्या आजारातही तिने मॉडेलिंग आणि एक्टिंगमध्ये करिअर केले.

यामी गौतमने वर्षाच्या सुरुवातीलाच हिमाचल प्रदेशमध्ये कुटुंब आणि जवळच्या मित्र मैत्रिणींच्या सानिध्यात दिग्दर्शक आदित्य धर याच्याशी विवाह केला. यामी आणि आदित्य यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -