घरताज्या घडामोडीयशोमान गाणं विसरला, पहिल्याच आठवड्यात होणार एलिमिनेट?

यशोमान गाणं विसरला, पहिल्याच आठवड्यात होणार एलिमिनेट?

Subscribe

‘सिंगिंग स्टार’ या सोनी मराठीवरल्या कार्यक्रमाला २१ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. छोट्या पडद्यावरचा चॉकलेट बॉय यशोमान आपटे हा या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून उतरला आहे. यशोमाननं गाण्याचं कोणतंही शास्त्रोक्त शिक्षण घेतलेलं नाही, पण तो उत्तम गातो. याआधीही त्यानं एका मालिकेत स्वतःसाठी पार्श्वगायन केलं आहे.

- Advertisement -

कार्यक्रमाच्या पहिल्या आठवड्यात यशोमाननं उत्तम सादरीकरण केलं होतं आणि त्याच्या गाण्याला परीक्षकांची दादही मिळाली. येत्या आठवड्यात यशोमान ‘माझे राणी माझे मोगा’ हे गाणं गाणार आहे, पण नुकतीच जाहिरात पाहून तो हे गाणं विसरला आहे, असं वाटतंय. या आठवड्यापासून बाद फेरी सुरू होणार आहे. ‘सिंगिंग स्टार’मध्ये बाद होणारा पहिला स्पर्धक यशोमान असेल का, अशी भीती त्याच्या चाहत्यांना वाटू लागली आहे.

पहिल्या आठवड्यात एलिमिनेट होणारा स्पर्धक यशोमान असेल की दुसरा कोणी, यासाठी पाहा, ‘सिंगिंग स्टार’, शुक्रवार-शनिवार रात्री ९ वा. फक्त आपल्या सोनी मराठीवर. गाणे ताऱ्यांचे, गाणे साऱ्यांचे.

- Advertisement -

हे ही वाचा – बेस्टच्या हजाराहून अधिक कर्मचार्‍यांची कोरोनावर मात!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -