यशराज फिल्म्स ज्या बहुप्रतिक्षित सिंगिंग सेंसेशन, भजन कुमार याला मोठ्या धूमधडाक्यात लॉन्च करणार होती, तो दुसरा कोणी नसून बॉलिवूड स्टार विकी कौशल आहे. यशराजच्या आगामी थिएटरिकल रिलीज द ग्रेट इंडियन फॅमिली (TGIF) मध्ये विकी, भजन कुमार नावाच्या स्थानिक सिंगिंग स्टारची भूमिका करणार आहे. विकीला, भजन कुमार म्हणून समोर आणत यशराजने TGIF चे, कन्हैया ट्विटर पे आजा… नावाचे पहिले गाणे लॉन्च केले, जे विकीचे चित्रपटातील सर्वात मोठे एंट्री सॉन्ग आहे.
विकी कौशल त्यावर सांगतो, “मी ऐका वेगळ्या कौटुंबिक मनोरंजन असलेल्या, द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये भजन कुमार नावाच्या एका गायकाची भूमिका साकारतोय आणि या चित्रपटात हे पात्र साकारत असल्याची वस्तुस्थिती उघड करण्यापूर्वी, आम्ही यशराज, भजन कुमार नावाच्या नवीन गायकाला लाँच करणार आहे अशी प्रसिद्धी करून थोडी गंमत केली”.
तो पुढे म्हणतो, “एक अभिनेता म्हणून मला लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणायला आवडते आणि मला आशा आहे की, ते मी या चित्रपटाद्वारे साध्य करू शकेन. आता सगळे सत्य बाहेर आले आहे. मला आशा आहे की, TGIF मधील माझा नवीन अवतार लोकांना आवडेल. भजन कुमारला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहण्यासाठी मी देखील उत्सुक आहे. मोठ्या पडद्यावर त्याला जिवंत करण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे.”
TGIF हा चित्रपट दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य आणि विकी कौशल यांच्यातील पहिला सहयोग आहे. कन्हैया ट्विटर पे आजा …हे गाणे प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिले आहे. TGIF हा चित्रपट 22 सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होईल.
हेही वाचा- दाक्षिणात्य ‘स्कंदा’ चित्रपटात अजय पूरकर साकारणार खलनायक