2024 हे वर्ष काही दिवसात संपणार आहे. 2025 ची सुरुवात नव्याने होईल. 2024 मध्ये अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढले तर काही सेलिब्रिटी अनेक वर्षांनंतर एकमेकांपासून विभक्त झाले. या वर्षात आतापर्यंत सर्वात जास्त घटस्फोट पाहायला मिळाला, त्यामुळे चाहत्यांसाठी हे वर्ष कठीण गेले. एवढेच नाही तर आता 20 ते 29 वर्षे जुने असलेली नाती जेव्हा तुटली तेव्हा सर्वांनाच वाईट वाटले.
घटस्फोट मागणाऱ्यांमध्ये क्रिकेटपटू, गायक आणि अभिनेते यांचा समावेश आहे. धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल आणि साऊथ स्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या यांचा घटस्फोट झाला. या तुटलेल्या नात्यांचं दु:ख तर त्यांना होतंच, पण त्यांना नात्याने धडाही शिकवला. कुणी नात्यांचा खरा अर्थ सांगितला, तर कुणी नात्यात येणाऱ्या अडचणींबद्दल इशाराही दिला.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिक :
2024 वर्षाची सुरुवात घटस्फोटाच्या बातम्यांनी झाली. जेव्हा भारतातील सर्वात लोकप्रिय महिला टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी जानेवारीत घटस्फोटाच्या बातम्यांना पुष्टी दिली. सानिया आणि शोएब गेल्या 2 वर्षांपासून वेगळे राहत होते. घटस्फोटाचे कारण विवाहबाह्य संबंध मानले जात होते. आणि काही काळानंतर शोएबने सनासोबत लग्न करून या अफवा खऱ्या ठरवल्या. अशा वेळी नात्यात फसवणुकीला जागा नसते हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.
ईशा देओल आणि भरत तख्तानी :
अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना ईशा देओल आणि उद्योगपती भरत तख्तानी यांनी 2024 च्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये घटस्फोटाची बातमी देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. 11 वर्षांनंतर लग्न तुटण्याचे कारण ईशाच्या बाजूने पर्सनल स्पेस न मिळाल्याचे सांगितले जात होते. या बदलत्या काळात प्रत्येक व्यक्तीला पर्सनल स्पेसची गरज आहे. अशा परिस्थितीत, जोडप्याने त्यांच्या नात्यात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जेणेकरून दोघेही त्यांचे आयुष्य मुक्तपणे जगू शकतील आणि आनंदी राहू शकतील.
हार्दिक पांड्या आणि नताशा :
यंदा आयपीएल सामन्यादरम्यान हार्दिक आणि नताशा यांच्यातील नात्याची सर्वात मोठी चर्चा झाली. सर्व अफवांच्या दरम्यान, या जोडप्याने जुलैमध्ये वेगळे होण्याची घोषणा केली. इथेही तिसरी व्यक्ती कारण असल्याचे मानले जात होते, तसेच नताशाने पैशांची मागणी केल्याचेही म्हटले जात होते परंतु या केवळ अफवा होत्या आणि कशाचीही पुष्टी झाली नाही. मात्र घटस्फोटाची बातमी चाहत्यांसाठी धक्कादायक होती. कारण नताशा-हार्दिकची जोडी एकेकाळी लोकांना खूप आवडली होती. मुलाचे एकत्र संगोपन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. अशा परिस्थितीत जर नात्यात परस्पर समंजसपणा जुळत नसेल किंवा दुरावा वाढू लागला असेल तर योग्य वेळी वेगळे होणे फार महत्वाचे आहे . जेणेकरून प्रेमाचे द्वेषात रूपांतर होणार नाही.
ए आर रहमान आणि सायरा बानो :
एआर रहमान आणि सायरा बानो यांनी 29 वर्षांच्या लग्नानंतर 19 नोव्हेंबर 2024 रोजी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामागील कारण इमोशनल स्ट्रेस असल्याचे सांगितले जात होते. या सुंदर जोडप्याचे ब्रेकअप झाल्याचे पाहून सर्वांनाच दुःख झाले. पण घटस्फोटाच्या अवघ्या आठवड्यानंतर सायरा बानोने सांगितले की, नातेसंबंध संपले तरी एकमेकांचा आदर करणे आम्ही कधीही थांबवणार नाही.
ऐश्वर्या रजनीकांत आणि धनुष यांचा घटस्फोट :
27 नोव्हेंबर 2024 रोजी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घटस्फोटाला चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयाने मंजुरी दिली. मात्र, दोघांनी 2022 मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाच्या 20 वर्षानंतर नातेसंबंध संपुष्टात येण्याचे कारण धनुष हा वर्कहोलिक असल्याचे सांगण्यात आले. कुटुंबाला वेळ न दिल्याने धनुष आणि ऐश्वर्यामध्ये भांडणे होत होती. त्यामुळेच करिअर आणि कुटुंब वेगळे ठेवावे, असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, आयुष्यभर टिकणारी नाती जपण्यासाठी त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. आयुष्य जगण्यासाठी करिअर करणं गरजेचं आहे, पण त्यात एवढं गुंतून जाऊ नका की तुमचं कुटुंब तुमच्यापासून दूर जाईल आणि वर्षानुवर्षे जुनी असलेली नाती तुटतील.
हेही वाचा : Christmas 2024 : मुंबईसह देशात नाताळ उत्साहात साजरा
Edited By – Tanvi Gundaye