घरताज्या घडामोडी'ये हैं मोहब्बते' फेम अभिनेता अडकला विवाह बंधनात, पहा फोटो

‘ये हैं मोहब्बते’ फेम अभिनेता अडकला विवाह बंधनात, पहा फोटो

Subscribe

२६ जानेवारी रोजी अभिषेक आणि सुहानी यांचा साखरपुडा झाला

‘ये हैं मोहब्बते’ (yeh hai mohabbatein) फेम अभिनेता अभिषेक मलिक नुकताच विवाह बंधनात अडकला आहे. अभिषेकने दिल्लीची स्टाइलीस्ट सुहानी चौधरी हिच्याशी विवाह केला. सुहानीसोबत सात फेरे घेतानाचे काही खास फोटो अभिषेकने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी दोघांनी विवाह केला. दोन- तीन दिवस दोघांचे लग्नविधी सुरू होते. सोशल मीडियावर सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. ज्यात दोघेही फारच सुंदर दिसत आहेत. मिस्टर अँड मिसेस मलिक असे कॅप्शन देत सुहानीने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

- Advertisement -

२६ जानेवारी रोजी अभिषेक आणि सुहानी यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर हे दोघे लग्न कधी करणार याच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. अभिषेकने लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात सुहानीने आईवरी कलरचा ब्राइडल लेहंगी घातला आहे. ज्यात ती खुपच सुंदर दिसत आहे तर अभिषेकने मॅचिंग शेरवानी घातली आहे. अभिषेक आणि सुहानी यांनी लग्न मंडपात एंट्री केल्यापासून ते एकमेकांना वरमाळा घालणे, सात फेरे ते सिंधूर भरण्यापर्यंतच्या सगळ्या विधींचे फोटो शेअर केले आहे.

- Advertisement -

अभिषेक आणि सुहानी याआधी त्यांच्या साखरपुड्याला शानदार आउटफीटमध्ये दिसले होते. साखरपुड्याला देखील अभिषेकने ब्लॅक कलरचा सूट घातला होता तर सुहानीने पिंक कलरचा गाउन घातला होता. सुहानी चौधरी ही लाइफ स्टाइल आणि फॅशन ब्लॉगर असून तिचे एक बुटीक देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुहानी आणि अभिषेक एकमेकांना डेट करत होते आणि अखेर दोघांनी एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली.


हेही वाचा – सलमानच्या ‘अंतिम’मुळे मराठमोळ्या ‘जयंती’ला फटका

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -