balika vadhu 2 : शिवांगी जोशी साकारणार ‘बालिका वधू’ मालिकेतील ‘आनंदी’ची भूमिका

balika vadhu 2 : शिवांगी जोशी साकारणार 'बालिका वधू'मधील आनंदीची भूमिका
balika vadhu 2 : शिवांगी जोशी साकारणार 'बालिका वधू'मधील आनंदीची भूमिका

शिवांगी जोशी ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिवांगी यापूर्वी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत झळकली होती. या मालिकेमुळेच शिवांगी जोशी हे नाव घराघरात पोहचले. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवांगी मालिका विश्वापासून दूर होती. यामुळे चाहत्यांना शिवांगी कोणत्या मालिकेत दिसणार याची उत्सुकता लागून होती. अशातच शिवांगीने चाहत्यांसाठी गोड बातमी समोर आली आहे. शिवांगी लवकरच लोकप्रिय मालिका ‘बालिका वधू 2’ मध्ये झळकणार आहे. या मालिकेतील ‘आनंदी’ हे मुख्य आणि लोकप्रिय पात्र ती साकारणार आहे.

‘बालिका वधू 2’ मधील मोठ्या आनंदीच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी अनेक नावांचा विचार केला, परंतु आतापर्यंत त्यांना  शिवांगी जोशी हेच नाव सर्वात परफेक्ट वाटल्याचे म्हटले जातेय. या लोकप्रिय मालिकेचा हा दुसरा भाग असणार आहे. अशा परिस्थितीत शोचे निर्माते या मालिकेतील मुख्य भूमिकेबाबत कोणतीही रिस्क घेऊ इच्छित नाही. ‘बालिका वधू 2’ ही मालिका नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला सुरु होईल असे सांगितले जात आहे. यानंतरच शिवांगी जोशीची ‘आनंदी’ म्हणून एन्ट्री होणार आहे.

शिवांगी सध्या डेहराडूनमध्ये तिच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. काही आठवड्यांपूर्वीच शिवांगी जोशीने ‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा निरोप घेतला. त्यामुळे चाहत्यांनाही शिवांगीला नव्या भूमिकेत पाहण्याची उत्सुकता आहे. ‘बालिका वधू 2’ मालिकेत शिवांगी जोशी रणदीप रायसोबत दिसणार आहे. ‘ये उन दिनों की बात है’ या मालिकेतून रणदीपला लोकप्रियता मिळाली. या शोमध्ये रणदीपने आशी सिंहसोबत काम केले होते. त्यामुळे ‘बालिका वधू 2’ मध्ये शिवांगी जोशी आणि रणदीप राय यांची जोडी पाहणे रंजक असणार आहे.

मालिका विश्वातील टॉपची अभिनेत्री

शिवांगी जोशीची तुलना टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींबरोबर केली जाते. शिवांगी जोशीचे महिन्याचे उत्पन्न सुमारे १० लाख रुपये इतके आहे. तसेच टीव्हीवरील प्रेक्षकांमध्ये शिवांगीची लोकप्रियता सर्वाधिक आहे. यामुळे
‘बालिका वधू 2’ च्या निर्मात्यांनी शिवांगी जोशीला या शोमध्ये येण्यासाठी मोठ्या रकमेची ऑफर दिली असावी असे म्हटले जातेय.