‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मधील ‘या’ अभिनेत्रीचे निधन!

yeh rishta kya kehlata hai fem gulabo divya bhatnagar dies passes away
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील 'या' अभिनेत्रीचे निधन!

टेलिव्हिजन विश्वातील एक दुखःत बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटवर जगणारी आणि मृत्यूशी झुंज देणारी अभिनेत्री दिव्या भटनागर हिचे निधन झाले आहे. स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मध्ये ‘गुलाबो’ची भूमिका साकारणारी दिव्या भटनागर हिने अखेरचा श्वास घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दिव्याला कोरोनाची लागण झाली होती, ज्यानंतर तिला गोरेगावच्या एसआरवी रुग्णालयात (SRV Hospital) दाखल करण्यात आले होते. दिव्याची प्रकृती सातत्याने खालवत होती, तिचे ऑक्सिजन लेव्हल कमी होत होते. त्यामुळे तिला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटवर दिव्या आयुष्य आणि मृत्यूशी झुंज देत होते. पण अखेर दिव्या ही लढाई हरली. दिव्याच्या निधनामुळे टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली आहे.

दिव्या भटनागरच्या मित्र युवराज रघुवंशी याने तिच्या निधनाची माहिती दिली. स्पॉटबॉयसोबत बातचित करताना युवराजने सांगितले की, ‘दिव्याचे निधन पहाटे ३ वाजता झाले आहे. ७ हिल्स रुग्णालयात दिव्याला शिफ्ट करण्यात आले होते. रात्री अचानक २ वाजता दिव्याची तब्येत बिघडली होती, तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. ज्यानंतर ३ वाजता डॉक्टरांनी दिव्याचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. हे ऐकूण मला आणि दिव्या कुटुंबियांसाठी धक्का बसला आहे. ईश्वर तिच्या आत्माला शांती देवो!’

टाईम्स ऑफ इंडिया बातचित करताना दिव्याच्या आईने तिच्या पती गगनवर गंभीर आरोप केले आहेत. दिव्याची आई म्हणाले की, ‘दिव्याचा पती गगन फसवणारा (फ्रॉड) आहे. तो तिला सोडून निघून गेला होता आणि त्याने तिच्या आरोग्याविषयी देखील चौकशी केली नाही. दिव्याने आम्हाला न सांगताना लग्न केले होते. आमचा या लग्नाला विरोध होता. दिव्या पहिल्यांदा मीरारोड येथील एका मोठ्या घरात राहत होती. पण लग्नानंतर ती ओशिवारामध्ये एका छोट्याशा घरात राहायला लागली. तिचा पती फ्रॉड होता, तिला तो सोडून गेला.’


हेही वाचा – लग्नाच्या ५ दिवसांनंतर आदित्यने बायकोला माहेरी पाठवण्याची दिली धमकी!