‘मणिके मागे हिथे’ फेम योहानीची रणवीर सिंह सोबत काम करण्याची इच्छा

योहानी ही एक उत्तम श्रीलंकन रॅपरsri lanka rapper आहे. श्रीलंकेमध्ये तिला 'रॅप प्रिन्सेस' म्हणूनही ओळखले जाते.

हल्ली सोशल मीडियामुळेsocial media कोणतीही व्यक्ती क्षणार्धात प्रसिद्धीच्या झोतात येते. गेल्या वर्षी सोशल सोशल मीडियावर एका तरुणीच्या गाण्याने संपूर्ण जगालाच वेड लावलं. ते गाणं म्हणेज ‘मणिके मागे हिथे'(manike mage hithe) आणि हे गाणं गाणारी श्रीलंकेची(sri lanka) तरुणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. या गाण्याने सर्वांचा वेड लावले अगदी सेलिब्रिटी सुद्धा या गाण्याच्या सुरात सुरू मिसळत होते. अगदीच काय तर बिग बी अमिताभ बच्चन यांनी सुद्धा योहानीचे कौतुक केले. बिग बोसच्या मंचावर सुद्धा हजेरी लावत योहानीने बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानसोबत सुद्धा धमाल केली केली.

हे ही वाचा – ‘टकाटक २’चं मोशन पोस्टर प्रदर्शित, चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये आतुरता

योहानी ही एक उत्तम श्रीलंकन रॅपर(sri lanka rapper) आहे. श्रीलंकेमध्ये तिला ‘रॅप प्रिन्सेस’ म्हणूनही ओळखले जाते. त्याचबरोबर सोशल मीडियावर योहानीचे फॉलोअर्स आणि चाहते सुद्धा आहेत. योहानीने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत तिने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याच्या सोबत काम करणायची इच्छा व्यक्त केली. रणवीर सिंहचा ‘गली बॉय’ हा चित्रपट योहानीने पहिला तो चित्रपट तिला खूप आवडला. त्याचबरोबर ‘गली बॉय'(gully boy) चित्रपटात रणवीर सिंहने साकारलेली रॅपरची भूमिका सुद्धा योहानीला(yohani) विशेष आवडली. रणवीरच्या या भूमिकेचं सुद्धा योहानीने कौतुक केलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yohani (@yohanimusic)

हे ही वाचा – चला हवा येऊ द्याच्या मंचावर शहाजी बापू पाटलांचं ‘ओक्केमध्ये’ स्वागत

त्याच सोबत योहानीला रॅपर बादशहा(badshaha) सोबत सुद्धा रॅप करायला आवडेल असा खुलासा सुद्धा तिने केला. शिवाय ता गाण्यात रणवीर सिंह सोबत काम करण्याची इच्छा सुद्धा तिने व्यक्त केली. ”रणवीर सिंह(ranveer singh) हा ऊर्जेचा स्रोत आहे त्यात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा सामावली आहे. मला वाटंत रॅप सॉंग साठी तोच परफेक्ट आहे.” त्याचासोबत ”श्रीलंकेत मी अनेक रॅप केले आहेत आणि आता हिंदीत सुद्धा रॅप करण्याचा मी विचार करत आहे. मला बादशहा आणि रणवीर सिंह सोबत काम करायला प्रचंड आवडेल” असं योहानी म्हणाली.

हे ही वाचा – ‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या सीजनला ‘या’ दिवशी होणार सुरुवात; शोमध्ये नव्या…

दरम्यान ‘मणिके मागे हिथे'(manike mage hithe) या योहानीच्या गाण्याला सोशल मीडियावर जगभरातच खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हे गाणं अनेक भाषांमध्ये भाषांतरित सुद्धा करण्यात आले. अशातच आता योहानीला रणवीर सिंह(ranveer singh) आणि बादशहा सोबत काम करणायची संधी मिळतेय का ते पाहण्यासाठी चाहते सुद्धा उत्सुक आहेत.

हे ही वाचा – ‘इमरजेंसी’चं टीझर पाहून अनुपम खेर यांनी केलं कंगनाचं कौतुक