घरमनोरंजनतू फक्त माझी...अर्जुनने मलायकाला केलं खास अंदाजात बर्थ डे विश

तू फक्त माझी…अर्जुनने मलायकाला केलं खास अंदाजात बर्थ डे विश

Subscribe

बॉलिवूडमधील बोल्ड अॅण्ड ब्यूटीफुल अभिनेत्री मलायका अरोराचा आज 49 वा वाढदिवस आहे. याचं दिवसाचे औचित्य साधत मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने तिला शुभेच्छा देत खास पोस्ट शेअर केली आहे.

अर्जुन कपूरने आपल्या लाडक्या गर्लफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक रोमाँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अर्जुन, मलायकाकडे प्रेमाने पाहत आहे. त्यांच्या हा सुंदर मिरर फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोखाली अर्जुनने लिहिलंय की, “द यिन टू माय यांग. हॅप्पी बर्थडे बेबी.” जे तू आहेस तेच राहा. आनंदी राहा. नेहमी माझी राहा.

- Advertisement -

चाहत्यांना पडली अर्जुन-मलायकाची भुरळ
मलायकासाठी अर्जुनने केलेल्या या शुभेच्छा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचे चाहते त्यांची ही केमिस्ट्री पाहून खूश झाले आहेत. चाहत्यांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत सगळेच मलायकाला खास अंदाजात शुभेच्छा देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

मलायका आणि अर्जुन बॉलिवूडमधील रोमाँटिक कपल आहे. दोघांनी आपल्या नात्याला जेव्हापासून ऑफिशियल केलं आहे. तेव्हापासून एकमेकांवरच प्रेम व्यक्त करत असतात. दोघेही प्रत्येक कार्यक्रमांमध्ये तसेच विदेशी टूरवर एकत्र जातात.

- Advertisement -

या चित्रपटात झळकणार अर्जुन
दरम्यान, अर्जुन कपूर येत्या काळात ‘कुत्ते’ आणि ‘द लेडी किलर’ हे चित्रपट सुद्धा आहेत. याआधी अर्जुन कपूरचे बरेच चित्रपट रिलीज झाले आहेत. मात्र, ते बॉक्स ऑफिसवर खास कमाई करू शकले नाहीत.


हेही वाचा :

भाजपा आयोजित दीपोत्सवात राहुल देशपांडेंचा अपमान !

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -