तू खूप हॉट… सुष्मिताच्या व्हिडीओवर ललित मोदीची प्रतिक्रिया

अभिनेत्री सुष्मिता सेनने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सर्दीनियाच्या अथांग निळ्या समुद्रामध्ये पोहताना दिसत आहे

मागील अनेक दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन आणि आयपीएल चेअरमॅन ललित मोदी यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू आहे. ललित मोदीने आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्याच्या नात्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं होतं. तर बॉलिवूड कलाकारांकडून सुष्मिताला पाठिंबा देण्यात आला होता. तेव्हापासून दोघेही वारंवार चर्चेत असतात. दरम्यान, आता पुन्हा एकदा सुष्मिता आणि ललित चर्चेत आले आहेत.

सुष्मिता सेनने शेअर केला सर्दीनिया ट्रिपचा व्हिडीओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

अभिनेत्री सुष्मिता सेनने तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती सर्दीनियाच्या अथांग निळ्या समुद्रामध्ये पोहताना दिसत आहे. या व्हिडीओखाली सुष्मिता सेनने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,”सरळ उभे राहा, थांबा, श्वास घ्या आणि पुन्हा सोडा, मी समुद्राला मिठी मारत हा धडा शिकला. त्यानंतर तिने पुढे लिहिलं की, जिथे आयुष्याची खोली आहे, तिथे मी सर्वत्र आहे.”

सुष्मिताच्या व्हिडीओ ललित मोदीने दिली प्रतिक्रिया
सुष्मिताच्या या पोस्टवर ललित मोदीने कमेंट केली आहे. त्यामध्ये त्याने लिहिलंय की, “सर्दीनिया मध्ये हॉट दिसत आहेस. याव्यतिरिक्त ललित मोदीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटला एक पोस्ट देखील शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने लिहिलं होतं की, आणि मी म्हटले की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.”

दरम्यान, मागच्या महिन्यात ललित मोदी यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून सुष्मिता सेन सोबतच्या नात्याची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी काही फोटो शेअर केले होते.

कोण आहे ललित मोदी?

ललित मोदी हे आयपीएलचे पहिले अध्यक्ष होते. जवळपास तीन वर्षे ते आयपीच्या अध्यक्षपदी होते. तसेच, चॅपिअन्स लीग टी२० च्या अध्यक्षपदीही ते होते. शिवाय, बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा कारभारही त्यांनी पाच वर्षे सांभाळला आहे. तर, राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदीही ते होते.


हेही वाचा :‘नवा गडी नवं राज्य’ चा पार पडला भव्य प्रीमियर सोहळा