घरमनोरंजनतुझे बकवास चित्रपट PR मुळे चालतात.... युझरने शाहरुखला केलं ट्रोल

तुझे बकवास चित्रपट PR मुळे चालतात…. युझरने शाहरुखला केलं ट्रोल

Subscribe

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. 2023 मध्ये शाहरुखचे ‘पठाण’ आणि ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाले जे बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल. दरम्यान, याचं वर्षाच्या शेवटी 21 डिसेंबर रोजी शाहरुखचा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शाहरुखच्या या आगामी ‘डंकी’ चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले असून अभिनेत्री तापसी पन्नू देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दरम्यान, नुकताच शाहरुखने त्याच्या ‘डंकी’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सोशल मीडियावर एक SRK सेशन सुरु आयोजित केले होते. जिथे त्याने त्याच्या चाहत्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. याच दरम्यान एका युझरने ट्वीटरवरुन शाहरुखच्या आधीच्या दोन्ही चित्रपटांवर टीका केली. यावेळी त्या युझरने लिहिलं होतं की, “तुमच्या अत्यंत प्रभावी आणि सक्षम PR टीममुळे, मागील दोन्ही चित्रपट जे बकवास होते ते ब्लॉकबस्टर ठरले. आता तुम्हालाही विश्वास आहे की तुमच्या पीआर आणि मार्केटिंग टीममुळे ‘डंकी’ देखील ब्लॉकबस्टर बनेल आणि बॉलिवूडचा पुढचा गोल्डन खालच्या दर्जाचा चित्रपट ठरेल.”

- Advertisement -

युझरची ही कमेंट वाचून शाहरुखने स्वतः त्याला रिप्लाय देत उत्तर दिलं आहे. शाहरुखने लिहिलंय की, ‘साधारणपणे मी तुमच्यासारख्या अत्यंत हुशार लोकांच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही. पण तुमच्या बाबतीत मी अपवाद करत आहे. कारण मला वाटते की तुम्हाला कफाच्या उपचाराची आवश्यक आहेत. मी माझ्या पीआर टीमला तुमच्यासाठी सोनेरी औषधे पाठवायला सांगतो. आशा आहे तू लवकर बरा होशील.

शाहरुख दिसणार ‘डंकी’ चित्रपटात

शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट कॉमेडी ड्रामा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. डिसेंबर 2023 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

 


हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -