घरमनोरंजनतुझी बायको लहान मुलगी वाटते... व्हायरल व्हिडीओमुळे अरबाज खान होतोय ट्रोल

तुझी बायको लहान मुलगी वाटते… व्हायरल व्हिडीओमुळे अरबाज खान होतोय ट्रोल

Subscribe

बॉलिवूड अभिनेता अरबाज खान 24 डिसेंबर 2023 रोजी शूरा खानसोबत विवाह बंधनात अडकला होता. अरबाज आणि शूराचं लग्नाझाल्यापासून ते दोघेही सतत चर्चेत असतात. पापराझी अनेकदा त्यांना स्पॉट करतात. दरम्यान, नुकतेच हे दोघे एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्याचवेळचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये हे दोघेही रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

अरबाज आणि शूरा एअरपोर्टवर रोमँटिक अंदाजात

 

View this post on Instagram

 

A post shared by Snehkumar Zala (@snehzala)

लग्न झाल्यापासून अरबाज आणि शूरा सोशल मीडियावर खूप चर्चेत असतात. कधी डेनर डेटवर तर कधी पार्टीमध्ये दोघांना स्पॉट केलं जातं. नुकतंच या दोघांना एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आलंय. यावेळी दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन चालत होते. या व्हिडिओमध्ये शूरा खानने काळ्या रंगाच्या टॉपसोबत निळ्या रंगाची पँट घातलेली दिसत आहे. तर अरबाजने शर्ट आणि पँट घातली होती. अरबाज खान आणि शूरा खानचा हा रोमँटिक अंदाजातील व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. यावर चाहते अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

- Advertisement -
कोण आहे शूरा खान?

अरबाजची नवी गर्लफ्रेंड शूरा खान एक व्यावसायिक सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आहे. ती इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत काम करते. अरबाज आणि शूराची पहिली भेट अरबाजच्या आगामी ‘पटना शुक्ला’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले होते.

मलायकासोबत झालं होतं पहिलं लग्न

मलायका आणि अरबाज खानचं लग्न 1998 मध्ये झालं होतं. 19 वर्षानंतर 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर मलायका आणि अरबाज अनेकदा मुलासोबत एकत्र दिसून येतात. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा :

रामचरणसोबत ‘RC 16’ चित्रपटामध्ये दिसणार जान्हवी कपूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -