भारताचा ऑलराउंडर क्रिकेटर युवराज सिंग हा मागिल अनेक वेळेपासून भारतीय क्रिकेट टीम पासून दुर राहिला. यावर्षी युवराज इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल २०१९) मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या वतीने खेळत आहे. युवराज मैदाना बरोबर सोशल मीडियावरही जास्त अॅक्टिव्ह असतो. युवराज आपले कुटुंबीय आणि मित्रांचे फोटो नेहेमीच इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. मात्र नुकताच त्याने शेअर केलेला व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडियोत युवराज बॉलिवूडचा जेष्ठ विलन शक्ती कपूर सोबत दिसत आहे. या व्हिडिओत युवराज शक्ती कपूरला एअरपोर्टवर भेटताना दिसतो आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.
View this post on Instagram
That epic line ! When u get to meet the all time rockstar !!’ Aooooo lalitaaa ??? @shaktikapoor
या व्हिडिओत युवराज शक्ती कपूरला भेटतो आणि म्हणतो की,”माझ्या सोबत ऑल टाईम रॉकस्टार आहे ज्यांचा मी नेहेमीच फॅन राहिलो आहे. शक्ती सर तुमचा ऑल टाइम हिट डायलॉग बोलून दाखवा.” युवराने प्रकट केलेली ही इच्छा शक्ती कपूर यांनी पूर्ण करत आपला ऑल टाइम हिट डायलॉग “आऊ…ललिता” म्हणून दाखवला. याच बरोबर युवराजला आशिर्वाद देत लवकरच सहा चेंडूमध्ये सहा षटकार मारण्याचा विक्रम परत बघायचा असल्याचं शक्ती म्हणाला.