जेव्हा मराठी अभिनेत्रीच्या इन्स्टा लाईव्हमध्ये ‘युजवेंद्र चहल’ कमेंट करतो…!

युझवेन्द्र चहल

लॉकडाऊन च्या काळात प्रत्येकजण घरी असल्याने आपल्या स्मार्टफोन किंवा डिजिटल गॅझेटवर सोशल मीडिया चा सर्रास वापर करताना दिसत आहे. या लॉकडाऊनचा फायदा घेत अनेक मराठी तसेच बॉलिवूड सेलेब्रिटी आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी लाईव्ह येत असतात पण सध्या मराठी अभिनेत्री रीना अगरवाल च्या “इंस्टा लाईव्ह” ची जोरदार चर्चा आहे.

अभिनेत्री रीना अगरवाल लॉकडाऊन च्या काळात आपल्या चहेत्यांसाठी बॉलिवूड तसेच मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध लोकांसह वेगवेगळे विषय घेत इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन करत आहे. आजपर्यंत इन्स्टाग्राम लाईव्ह वर रीना सोबत बॉलिवूड सिनेसृष्टीत काम करणारे चेहरे जसे की अहाना कुमरा, गणेश हेगडे, डब्बू रतनानी,किरण कोटरीयाल, रुपाली गांगुली, नीता लुल्ला तसेच मराठीतील शरद केळकर, स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग या प्रसिद्ध सेलेब्रिटींची पाहुणे म्हणून वर्णी लागली आहे.

सध्या तिच्या “इन्स्टार्स” या नावाने सुरू असलेल्या इन्स्टाग्राम लाईव्ह ची खूप चर्चा आहे, काल रीना चे युट्युब स्टार धनश्री वर्मा सोबत लाईव्ह चालू असताना भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहल याची प्रेक्षक म्हणून उपस्थित असून कमेंट सेक्शन मध्ये आपले अभिप्राय देताना दिसले. युजवेंद्र चहल त्याच्या क्रिकेटमधल्या कौशल्यामुळे तरुणांमध्ये कमालीचा प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणेच सोशल मीडियावर आपल्या मित्रमैत्रिणींच्या लाईव्ह वर आवर्जून हजेरी लावून मजेदार कमेंट्स देण्यामुळे देखील तो चर्चेत असतो. यंदा यूएई मध्ये होणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्यांमध्ये युजवेंद्र चहल खेळणार असल्याचे वृत्त आहे. पण या लॉकडाऊन च्या काळात युजवेंद्र सारखे आपले अन्य खेळाडूदेखील सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असताना आपल्याला पाहताना मिळत आहे.

अभिनेत्री रीना अगरवाल नेहमीच आपल्या इंस्टा लाईव्ह मधून पडद्यावरच्या तसेच पडद्यामागच्या कलाकारांसोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असल्यामुळे नेहमीच इंस्टा लाईव्ह वर अनेक सेलेब्रिटी जसे की अहाना कुमरा, अर्चना पुरण सिंह, पुष्कर जोग, रुपाली गांगुली, किरण कोटरीयाल हे खासकरून प्रेक्षक म्हणून हजेरी लावतात  “इन्स्टार्स” या इंस्टा लाईव्ह वर भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहल याची उपस्थिती तसेच रीनाच्या प्रश्नांवर आपल्या शैलीत दिलेल्या कमेंटरूपी उत्तरांनी रीनासोबत इतर प्रेक्षकांनादेखील सुखद धक्का बसला.