Yuzvendra Chahal Viral Video : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात सारं काही अलबेल नसल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. इतकंच नव्हे तर हे दोघेही घटस्फोट घेणार अशी चर्चा रंगली आहे. धनश्री आणि चहलने एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. यानंतर चहलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील धनश्री बरोबरचे फोटोही डिलीट केले आहेत. त्यामुळे या चर्चांना दुजोरा मिळाला आहे. पण आता चहलचा नशेत असलेला एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
चहलच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत तो मद्यधुंद असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे तो नशेत असल्याने त्याला चालता येत असून तो मित्राचा आधाराने चालत असल्याचे दिसत आहे. एक व्यक्ती त्याला कारमध्ये बसवतानाही दिसत आहे. आता त्याचे चाहते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. पण चहलचा हा व्हिडिओ सध्याचा नाही. हा चहलचा व्हिडिओ काही वर्षांपूर्वी चांगलाच व्हायरल झाला होता. कदाचित त्यावेळी चहलचे लग्नही झालेले नव्हते. पण चहल सध्या चर्चेत असल्यामुळे त्याचा हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांची ओळख करोनाच्या काळात झाली. कोरोना महामारीच्या काळात चहलला आपल्या मोकळ्या वेळेत डान्स शिकायचा होता. याबाबत त्याने धनश्री वर्माशी संपर्क साधला. डान्स क्लास दरम्यान हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढली आणि ते प्रेमात पडले. यानंतर दोघांनी 2020 मध्ये लग्न केले. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे दिसत आहे.