झी मराठी ही प्रेक्षकांची अत्यंत लाडकी वाहिनी आहे. झीच्या अनेक मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘पारू’ या मालिकांच्या यादीत आता एका रिऍलिटी शोची भर पडणार आहे. झी मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर काही दिवसांपूर्वी एक टिझर रिलीज झाला होता. जो पाहून हा कार्यक्रम नक्की काय आहे, रिऍलिटी शो आहे की नवी मालिका आहे? असे प्रश्न सगळ्यांना पडले होते. तर हा एक असा शो आहे जो मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा बदलणार आहे. लवकरच झी मराठी वाहिनीवर ‘चल भावा सिटीत’ हा नवाकोरा शो सुरु होतोय. (Zee Marathi New Reality Show Chal Bhava Cityt Starting soon)
View this post on Instagram
या शोची संकल्पना पूर्ण वेगळी आहे. हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे. यात स्पर्धकांना अशा आव्हानांना सामोरे जावे लागेल जिथे त्यांना आपल्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं जीवन जगणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधण्यास प्रवृत्त केले जाईल. ग्रामीण आणि शहरी भागातील स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि त्यांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती दर्शवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईलच.
या शोच्या माध्यमातून एक अफलातून संकल्पना समोर येणार आहे. जिचा प्रेक्षकांनी विचारसुद्धा केला नसेल. ‘चल भावा सिटीत’ हा शो झी मराठी वाहिनीवर लवकरच सुरु होणार आहे. जो मराठी टेलिव्हिजनवर रिॲलिटी शोची परिभाषा बदलेल अशी आशा मेकर्सने व्यक्त केली आहे. सध्या तरी झी मराठीच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला प्रोमो व्हायरल होतोय. या नव्याकोऱ्या शोचा सूत्रधार कोण असणार? याचीही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळतेय. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आणि मनोरंजनाचे रंग उधळणारा ‘चल भावा सिटीत’ आता कधी येणार? याची प्रतीक्षा केली जात आहे.
हेही पहा –
Suvrat Joshi : तुझं कौतुक करू की द्वेष? छावा पाहिल्यानंतर सखी गोखलेची पती सुव्रतसाठी पोस्ट