घरताज्या घडामोडी‘झोंबिवली’चे शूट पूर्ण, दिग्दर्शकाने सांगितला शूटिंगचा अनुभव

‘झोंबिवली’चे शूट पूर्ण, दिग्दर्शकाने सांगितला शूटिंगचा अनुभव

Subscribe

हॉरर-कॉमेडी जॉनरचा ‘झोंबिवली’ हा मराठी सिनेमा पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे. अर्थात मराठीमध्ये झोंबीज पाहायला मिळणार तर चर्चा तर होणारच ना. तसेच अॅक्शन-सस्पेन्स पडद्यावर उत्तम प्रकारे मांडणारे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर यांसारखी तगडी स्टारकास्ट यांची साथ या सिनेमाला लाभली आहे. तर सिनेमा कधी प्रदर्शित होतोय असं अनेकांना नक्कीच वाटत असणार. सध्याच्या परिस्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती महत्त्वाची काळजी घेऊन ‘झोंबिवली’चे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. नवीन वर्ष आता लवकरच येतंय आणि नवीन वर्षात हा सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे त्यामुळे आता फक्त काही क्षणांची प्रतिक्षा करावी लागेल.

या सिनेमाच्या चित्रिकरणाबाबतीत सांगताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी सांगितले की, ‘२६ जुलैला झोंबिवलीचे शूट सुरू झाले होते. जेव्हा अनलॉक नुकताच सुरू झालेला आणि शूटिंगला परवानगी मिळाली होती. नुकतेच १२ नोव्हेंबरला शूट संपले. संपूर्ण युनिटने एकत्र येऊन सिनेमाचे शूटिंग सुरू केले होते आणि आता शूट संपले तर आजूबाजूची परिस्थिती बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आली आहे. दोन-तीन महिन्यांच्या काळामध्ये शूट करताना बरेच चॅलेंजेस आले होते, मुळात कोरोना हे मोठे चॅलेंज होते. अशावेळी शूट सुरू केले ज्यावेळी पावसाळा होता, सिनेमाचे शूट दरवेळी इनडोअर होऊ शकत नाही. पाऊस आणि कोरोना या दोन्ही गोष्टींवर मात करायची असेल तर अशा ठिकाणी जायला लागेल जिथे आपल्याला पाऊस पण कमी लागेल आणि कोरोना केसेस पण बऱ्याच कमी असतील असा विचार करून आम्ही लातूर शहर निवडले. मुंबईतून शूटची सुरुवात केली आणि नंतर लातूरला रवाना झालो. सिनेमाचे अर्ध्या अधिक शूट हे लातूरमध्ये झाले आहे. भर पावसाळ्यात आम्हाला वातावरणाने खूप साथ दिली. तसेच तेथील स्थानिक लोकांनी सुध्दा खूप साथ दिली.’

- Advertisement -

५० टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे आणि सिनेसृष्टीचा एक भाग म्हणून या सध्याच्या परिस्थितीवर मत मांडताना आदित्य म्हणाला की, ‘थिएटर्स सुरू झाले ही खूप पॉझिटिव्ह साईन आहे. माझ्यामते डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून थिएटर्स जरा चांगल्या पध्दतीने सुरू होतील. सध्या या काळात आपला प्रेक्षक वर्ग आपल्याला कशी साथ देतोय, हे कुठेतरी आपल्याला बघायला लागेल. कारण आम्ही आता दोन्ही बाजूने बघतोय की, एक प्रेक्षक म्हणून मी थिएटरला कितपत जाईन आणि फिल्म मेकर म्हणून लोकांकडून थिएटरला येण्याची कितपत अपेक्षा ठेवेन. या दोन्ही गोष्टी बघितल्या तर एकत्रच आहेत. आपण सिनेमा थिएटरमध्ये बघायला जाण्याची मानसिक तयारी करू.’


हेही वाचा – ‘रुद्रकाल’ रहस्यमय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -