घरदेश-विदेश२१ डिसेंबर : 'का' असतो सर्वात लहान दिवस?

२१ डिसेंबर : ‘का’ असतो सर्वात लहान दिवस?

Subscribe

२१ डिसेंबर या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. त्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरपासून दिवस मोठा होण्यास सुरूवात होते.

२१ डिसेंबर हा संपूर्ण वर्षातील सर्वात लहान दिवस असतो. या दिवसाला ‘विंटर सोलस्टाइस’ म्हणूनही ओळखलं जातं. या खास दिवसाप्रीत्यर्थ आज गुगगलने खास डुडलही तयार केलं आहे. पृथ्वीच्या स्वत:भोवती आणि सूर्याभोवतीच्या  आवर्तनादरम्यान वर्षातील असा एक दिवस येतो जेव्हा दक्षिण गोलार्धात सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर सर्वात जास्त असते. याचाच परिणाम म्हणजे २१ डिसेंबर हा दिवस वर्षातील सर्वात छोटा दिवस असतो. यादिवशी रात्र सर्वात मोठी असते. सोलस्टाईस शब्द सोल्सटाइन या लॅटीन शब्दापासून तयार झाला आहे. ‘सूर्य स्थिर आहे’ असा त्याचा अर्थ होतो. भारतात पावसाळ्यानंतर येणाऱ्या हिवाळ्यात रात्र मोठी असते आणि दिवस लहान होत जातो. २१ डिसेंबर या दिवशी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतो. त्यानंतर पुन्हा २५ डिसेंबरपासून दिवस मोठा होण्यास सुरूवात होते.

छोट्या दिवसामागचं नेमकं कारण काय?

आजच्या तारखेला सूर्य किरण मकर रेषेत लंबवत होतात, त्यामुळे सूर्यास्त आणि परिणामत: अन्य दिवसांच्या तुलनेत लवकर होतो. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातल्या आजच्या दिवशी सूर्य सर्वात कमालीच्या दक्षिण बिंदूवर असतो आणि त्यामुळेच आजचा दिवस लहान आणि रात्र मोठी असते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, आज पृथ्वीचा अक्ष २३.५ अंशाने कललेला असतो आणि याचाच परिणाम म्हणून सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायनचा अनुभवसुद्धा येतो. आजच्या दिवशी कोणत्याही वस्तूच्या सावलीचं निरीक्षण केलं तर सूर्याचे दक्षिणायन आणि उत्तरायण सहज लक्षात येऊ शकतं.

- Advertisement -

‘फेस्टिव्हल’ म्हणून साजरा होतो आजचा दिवस

चीनमध्ये आजचा दिवस हा पॉझिटीव्ह एनर्जीचा दिवस समजला जातो. चीनसोबतच तैवानमध्येही आजच्या दिवशी लोक पारंपरिक अन्नाला प्राधान्य देतात. जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड या देशातील काही भागात आजच्या दिवशी द फिस्ट ऑप जूल फेस्टिव्हल साजरा केला जातो. इतकंच नाही तर पाकिस्तानमधील नॉर्थ वेस्टर्न भागातील आदिवासी जमातीही आज २२ डिसेंबर रोजी खास उत्सव साजरा केला जातो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -