घरफिचर्सनिसर्गाचा उत्सव

निसर्गाचा उत्सव

Subscribe

दिवाळीला फटके फोडण्याची प्रथादेखील सार्वत्रिक नाही. आता हळूहळू ती सर्व भागात पसरत आहे. मराठवाड्यात साधारण ऐंशी व नव्वदीच्या दशकात फटके फोडण्याची प्रथा अगदीच तुरळक होती. वडील बाबाराव यांनी सांगितलं, त्यांच्या लहानपणी दिवाळीला खरीपातील पिवळी ज्वारीची कणसे घेतली जायची. ज्वारीची धाट चुलीत गरम करून ते दगडावर आपटल्यावर त्यातून फाटक्यासारखं आवाज यायचे. या आवाजाच्या आनंदात दिवाळी केली जायची.

चकली, चिवडा, शेव आणि शंकरपाळे असं फराळ आणि गोड धोड खाणं आणि नवीन कपडे घालून फाटक्या फोडणे ही बहुतेकांना माहिती असलेली दिवाळी आहे. सकाळी रांगोळी आणि रात्रीला दिवे लावून घराची सजावट केली जाते. हे दिवे मातीचे असत, आता त्याची जागा लायटीच्या दिव्यांच्या माळा घरावर करून घरांची झगमगाट करून केली जाते. परंपरा म्हणून दोन चार दिवे दाराशी लावले जातात. ही अशी शहरातील माहीत असलेली व बदलत जाणारी दिवाळी आहे. दिवाळी हा सण भारतातील सर्वात मोठा सण मनाला जातो. या दिवशी कामानिमित्त दुसर्‍या राज्यात, दुसर्‍या शहरात राहणारे लोक सर्व घरी पोहचतात, बाहेर शिकायला असलेली मुलं घरी परतात. शाळा कॉलेजला या निमित्ताने पंधरा एक दिवसांची सुट्टीही दिली जाते.

मात्र आपण समजतो तशी ही दिवाळी सर्वांसाठीची सर्वात महत्वाचा सण नाहीय. दक्षिणेतील अनेक राज्यात दिवाळीला एका फक्त एक दोन दिवसाची सुट्टी असते. विशेष काही खाण्याचे पदार्थही केली जात नाहीत. इतर राज्यातील दिवाळीचे महत्व व साजर्‍या करण्याच्या पद्धती या वेग वेगळ्या आहेतच. मात्र महाराष्ट्र म्हणूनही दिवाळी एकसारखी साजरी केली जात नाही. महारष्ट्रातील अनेक ठिकाणी व अनेक समुदायातील लोक दिवाळी साजरीदेखील करीत नाहीत. कोरकू व इतर आदिवासी बांधव हे दिवाळीपेक्षा होळी हा सण साजरा करतात. ज्या भागात दिवाळी साजरी केली जाते. त्यामध्येही खानपान, पूजा विधी यामध्ये फरक आहे.

- Advertisement -

मराठवाड्यात लाव्हाळीच्या काड्या वापरून गाई म्हशी ओवाळण्यासाठी समई तयार करतात. त्यामध्ये शेणाची पणती बनवून ठेवली जाते. पणतीत दिवा लाऊन घरातील मुलं, मूल नसतील तर इतर कोणीही घाई म्हशींची पूजा करून त्यांना ओवाळले जाते. समईमध्ये दिवा ठेऊन दिवाळीच्या म्हणजेच लक्ष्मी पूजेच्या आधीच्या दिवशी चार दिवसपासून दररोज ओवाळले जाते. त्यासाठी दर दिवशीची समई वेगळी असते. त्रिकोणी, चौकोनी, पंचकोनी, आणि रवीसारखे असे चार प्रकारच्या समई बनविल्या जातात. ही समई बनविण्याची कला गावातील बहुतेकांना येत असते. आज क्वचितच काहींना ही कला अवगत असेल. चार दिवस ओवाळून झाल्यावर पाचव्या दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजेच्या दिवशी पहाटे पाच साडेपाचच्या सुमारास गावातील धोबीण किंवा परटीन ताटामध्ये दिवा घेऊन घरघर जाऊन ओवाळते. बलुतं पद्धतीमध्ये प्रत्येक धोबीनीचे निवडलेले घर असते. ती ती धोबीण त्या त्या घरातील लोकांना ओवाळते, बदल्यात थोडफार धान्य व अलीकडे पैसे देण्याची प्रथा रूढ झाली आहे. आई विठाबाई सांगते की दसर्‍याला थंडी गावाच्या वेशीपर्यंत येऊन थांबलेली असते, आणि जेव्हा धोबीण आरती घेऊन येते तेव्हा तिच्या सोबत थंडी घरात येते. या दिवसापासून खरंच थंडी जास्त जाणवायला सुरू होते. धोबीण ओवाळण्याबरोबरच पानाचा विडादेखील खायला देते.

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोलो तालुक्यातील विजया पाडेकर आणि रवी ठोंबाडे यांनी त्या भागातील दिवाळीच्या वेगळ्या प्रथेबद्दल सांगितली. दिवाळीला त्या भागातील ठाकर आदिवासी समुदायातील लोक काहंडळ गवतापासून दिवा ठेवण्याची समई बनवून गावातील घरोघरी जाऊन गाई म्हशी इतर पाळीव जनावरांची ओवाळणी करतात. दिन दिन दिवाळी हे गीत म्हणतात. याच गीतात असलेल्या शेवटच्या कडव्याप्रमाणे, दे माय खोबराची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी, गावकरी ठाकर बांधवाला खोबराची वाटी देतात. त्या बदल्यात ठाकर बांधव त्यांच्या गाई गुरांची वाघ, बिबट यापासून रक्षण करण्याचे शब्द देऊन जातात. याच भागात ठाकर समुदाय वसू बारस या दिवशी वाघ बारस साजरा करतात. आदिवासी बांधवांनी वाघाला देव मानले आहे, गावाच्या वेशीला वाघाच्या मंदिरात जाऊन मोठ्या मनोभावाने पूजा केली जाते व हा सण मोठा उत्सव साजरा करून सर्वांनी एकत्र नवसपूर्ती केली जाते. जंगलातील हिंस्र प्राण्यापासून पाळीव प्राण्यांची गाई गुरांचे रक्षण व्हावे यासाठी कोंबडा, बोकडाचा नैवैद्य दाखवला जातो तसेच काही भागात डांगर, तांदळाच्या खिरीचा नैवद्यही दाखवला जातो.

- Advertisement -

पिढ्यानपिढ्या दिवाळीत गाई म्हशींना ओवाळताना म्हटले जाणारे गाणे

दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गायी कोणाच्या, लक्ष्मणच्या
दे माय खोबराची वाटी
वाघाच्या पाठीत घालीन काठी

मेळघाटात कोरकूं आणि मोठ्या संख्येने गोंड समाजाचे वास्तव्य आहे. गावातील गुरे चरण्यासाठी नेणे आणि आणण्याचे काम पारंपरिकरित्या गोंड समाजातील लोक करतात. गोंड किंवा थाट्या नावाने ओळखले जाणारा हा समाज दिवाळीत सामूहिक पूजन करतो. त्यावेळी पूजनाच्या स्थानी संपूर्ण गावातील पशू आणले जातात. पूजन करणार्‍या गोंडांना टॉवेल, पंचा, साडी, धोतर वगैरे देतात. यावेळीदेखील गोंड महिला आणि पुरूष गोंडी नृत्य सादर करतात. मेळघाटात हरिसाल, चाकर्दा, धारणी, सुसर्दा, सेमाडोह, चिखलदरा येथे घुंगरू बाजार भरत असतात. या बाजारांमध्ये गोंड लोक घुंगरू बांधून नृत्य सादर करतात.

खानपानाच्या पद्धतीमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात विविधता आहे. मेळघाटातील कोरकू व गोंड समुदायातील काही लोकं दिवाळी साजरी करीतच नाहीत तर काही लोकं जमेल तसे घरी जेवण बनवतात. लक्ष्मीपूजेच्या दुसर्‍या दिवशी काही घरांमध्ये या भागात मटनपुरी बनवून खाल्ली जाते. अकोला वाशीम भागातील फासेपारधी समुदायातील लोकं ‘बाजरी ना ठोंबरा’ बनवतात. साहेबराव राठोड हा वडाळा तांड्यावरील तरुण बाजरी ठोंबरा बनविण्याची पद्धतही सांगतो. बाजरी रात्री भिजत घातली जाते. दुसर्‍या दिवशी बाजरीला थोडसे कांढून किंवा कुट्टून घेतले जात. मग ते शिजविण्यासाठी टाकले जाते. शिजत आल्यावर त्यात थोडं शेंगदाण्याचे तेल व गुळ टाकले जाते. हा ‘बाजरी ना ठोंबरा’ खाण्यास खूपच रुचकर लागते. अकोला वाशीम भागातील जमीन, पाऊस पाणीमध्ये तिथे बाजरीला पोषक आहे. म्हणून बाजरीचे वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. याच भागात दिवाळीला बाजरीच्या वड्यादेखील बनवितात. बाजरी भरडून घेतली जाते. त्यात तीळ, तेल व गुळ टाकून कणीक राधांयचे, कणीक तयार झालं की तीळ त्याच्या वड्या करून खातात.

सातपुडा डोंगर रांगात म्हणजे महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा, धडगाव भागात भिल्ल, पवारा, डोंगरी बावा गोसावी, धानका या आदिवासी समुदाय राहतात त्यांच्यासाठी दिवाळी तसा इतर सणांपैकी एक असतो. त्या दिवाळीत पुरणपोळीचे जेवण बनविले जाते. यासोबत हरभर्‍याच्या डाळीपासूनचा रस्सा बनविला जातो. हा रस्सा तसा वेगवेगळ्या सणसमारंभालादेखील बनविले जाते.

दिवाळीला फटके फोडण्याची प्रथादेखील सार्वत्रिक नाही. आता हळूहळू ती सर्व भागात पसरत आहे. मराठवाड्यात साधारण ऐंशी व नव्वदीच्या दशकात फटके फोडण्याची प्रथा अगदीच तुरळक होती. वडील बाबाराव यांनी सांगितलं, त्यांच्या लहानपणी दिवाळीला खरीपातील पिवळी ज्वारीची कणसे घेतली जायची. ज्वारीची धाट चुलीत गरम करून ते दगडावर आपटल्यावर त्यातून फाटक्यासारखं आवाज यायचे. या आवाजाच्या आनंदात दिवाळी केली जायची. सातपुडा आणि मेळघाटातील अनेक आदिवासी गावात आजही अगदी मोजक्या गावातच थोड्या प्रमाणात फटाके वाजवले जातात. पण आपण शहरातील लोकांनी फटके फोडले पाहिजेतच. त्याशिवाय फाटाके कारखान्यात लहान लहान मुलं जी शाळेत गेली पाहिजेत अशी ते कसे काम करणार. दुसरं यासाठी फटाके फोडायला हवं की शहरातील वयस्क माणसं, गर्भवती महिला यांना या आवाजाने खूप मोठे नुकसान होते. अनेक लोकं त्यातून दगावतात.

सजावटीसाठी काढलेल्या रांगोळीवर दुसर्‍या दिवशी कागदी, प्लास्टिक कचर्‍याचा खूप मोठा ढीग तयार होतो. मग याची साफसफाई करण्याची जबाबदारी घरातील कामे आवरण्याची प्राथमिक जबाबदारी असलेली, शेव-चिवडा चकली करून थकलेली आई, बहीणीचीच तर असते. यांनी झाड लोट करून रस्त्यावर टाकलेला कचरा परत महानगर पालिका किंवा पंचायत समित्या यांच्या महिला कामगाराला ते साफ करावे लागते. शिवाय दिवाळीमधील हवेतील २.५ आणि १० मायक्रो ग्राम आकाराचे सुक्ष्म कण प्रचंड वाढून आपले आयुष्य साधारण वीस टक्के इतके कमी करू शकतात. म्हणून इतर भागातील दिवाळी कसी साजरी केली जाते आपण फक्त माहितीचा भाग म्हणून समजून घ्यावा आणि आपले फटाके वाजविण्याचा जन्मसिद्ध अधिकार मात्र सोडता कामा नये. आपलं महानगरच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..!!

– बसवंत विठाबाई बाबाराव:

-‘लेखक पर्यावरण शिक्षण प्रकल्प समन्वयक आहेत’.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -