घरफिचर्सतिबोटी खंड्या

तिबोटी खंड्या

Subscribe

एक पर्यटक प्रत्येक पावसाळ्यात सह्याद्रीला भेट द्यायला येत असतो. तो म्हणजेच तिबोटी खंड्या. हा पक्षी त्याच्या रंगसंगतीमुळे जेवढा देखणा तेवढीच त्याची ती तीक्ष्ण नजर आणि चपळाई पाहण्यासारखी. अप्रतिम रंगाने नटलेला, हा खंड्या जातीतील सर्वात छोटा पक्षी. गर्द निळी पाठ आणि पंख व पिवळसर पोट त्यास एक वेगळी ओळख देते. दाट हिरव्या झाडीतसुद्धा हा रंग उठून दिसतो. त्याचे लालसर मुकुट व गडद लाल चोच त्याला अधिक सुंदर बनवते. शरीराच्या आकारापेक्षा त्याच्या चोचीचे प्रमाण मोठे त्यामुळे खेकड्यांसारखी कठीण शिकार अगदी सहजतेने त्याला पकडता होते.

पावसाळा सुरु होताच ट्रेकर्स आणि पिकनिक ग्रुप्स सह्याद्रीत सक्रिय होतात. इंस्टाग्राम व फेसबुकसारख्या ठिकाणी पाहिलेल्या पोस्ट्स प्रत्येकाला सह्याद्रीकडे ओढत असतात. लॉकडाऊन संपल्यावर 6 महिने घरात बसलेला माणूस आता बाहेर पडतोय. त्यामुळे मान्सून ट्रेकच्या कंपन्यासुद्धा सोसाट्याने वाढत चालल्या आहेत.

गडकिल्ले, धबधबे आणि पावसाळ्यातील पिवळ्या सोनकीच्या फुलांचे छायाचित्र पहिले की आपण कधी जाऊ हाच विचार मनात सारखा फिरत असतो. तेवढ्यात एखाडी ट्रॅव्हल कंपनीची अ‍ॅड नजरेस पडते आणि आपण वीकेंडला कोणत्या तरी गडावर असतो. कास पठार, माळशेज घाट व लोणावळ्यातील गडकिल्ले संपूर्ण पर्यटकांनी सजलेले असतात. सह्याद्रीचे एकूण अंतर 1600 किमी. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून आपली सह्याद्री केरळपर्यंत पसरलेली आहे. एकूण 39 संरक्षित वने, अभयारण्ये व राष्ट्रीय उद्याने आपल्या सह्याद्रीत स्थित आहे. त्यामुळे इथली जैवविविधता ही तितकीच उच्च दर्जाची.

- Advertisement -

असाच एक पर्यटक प्रत्येक पावसाळ्यात सह्याद्रीला भेट द्यायला येत असतो. तो म्हणजेच तिबोटी खंड्या. हा पक्षी त्याच्या रंगसंगतीमुळे जेवढा देखणा तेवढीच त्याची ती तीक्ष्ण नजर आणि चपळाई पाहण्यासारखी.

अप्रतिम रंगाने नटलेला, हा खंड्या जातीतील सर्वात छोटा पक्षी. गर्द निळी पाठ आणि पंख व पिवळसर पोट त्यास एक वेगळी ओळख देते. दाट हिरव्या झाडीतसुद्धा हा रंग उठून दिसतो. त्याचे लालसर मुकुट व गडद लाल चोच त्याला अधिक सुंदर बनवते. शरीराच्या आकारापेक्षा त्याच्या चोचीचे प्रमाण मोठे त्यामुळे खेकड्यांसारखी कठीण शिकार अगदी सहजतेने त्याला पकडता होते. घनदाट जंगल व झरे आणि ओढे हे त्याचे अधिवास. फांदीवर अगदी स्थिर बसलेला हा पक्षी, एकाग्रचित्ताने त्याचे भक्ष्य शोधण्यात मग्न असतो. पाली, खेकडे, बेडूक असे काहीही दिसताच हे समाधी लावलेले ध्यान अचानक जमिनीच्या दिशेने सूर मारत सावज टिपते आणि त्याला घेतच पुन्हा फांदीवर बसते.

- Advertisement -

दक्षिण भारतात पावसाळा सुरु होताच हे पक्षी सक्रिय होतात व आपले घरटे बनवण्यास सुरुवात करतात. मातीचे ढासळलेले उभे भाग हे त्यांच्या घरट्यासाठी अगदी सोयीचे ठिकाण. एक मीटर इतके लांब खणलेले भुयार व त्या पुढे एक पोकळ अंड्याच्या आकाराचे तो घरटे बनवतो. त्याचा प्रजनन काळ ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत असल्यामुळे घरट्याचा असा आकार त्याचे पावसापासून संरक्षण करतं. अरुंद बिळामुळे वार्‍यापासूनदेखील बचाव होतो. अंडी घातल्यावर साधारण दोन आठवड्यात पिल्ले बाहेर येतात व पुढील अजून दोन ते तीन आठवडे त्यांना भरवावे लागते. पुन्हा उडून जाण्याआधी ही पिल्ले शिकार शिकून घेतात. उडून गेलेले जोडपे पुढील पावसाळ्यातसुद्धा याच घरट्याकडे परतते. वाढत्या जंगलतोडीमुळे यांच्या ही अधिवासाची मोठ्या संख्येत घट आढळतेय. त्यामुळे काळासोबत त्यांची घरटीसुद्धा नष्ट होत चालली आहेत. एके काळी मोठ्या संख्येत दिसणारा हा पक्षी हल्ली मुंबईच्या मोजक्या काही भागामध्ये आढळतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -