Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स १९७२ नंतर पुन्हा भीषण दुष्काळ

१९७२ नंतर पुन्हा भीषण दुष्काळ

भीषण दुष्काळाचे उदाहरण द्यायचे झाल्यास १९७२ च्या दुष्काळाचा दाखला दिला जातो. मात्र आज त्याचप्रकारचा दुष्काळ महाराष्ट्र अनुभवत आहे.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात १९७२ साली भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हाच्या दुष्काळाची दाहकता आज पुन्हा जाणवायला लागली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या कुशीत काही प्रमाणात पाऊस झाला तर काही ठिकाणी पावसाचा थेंबही पडला नाही. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे कर्जाचा डोंगर डोक्यावर घेतलेला कष्टकरी बळीराजा संकटात सापडला आहे.

खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ परिसरात अखेरच्या टप्प्यात भातपिकाला पावसाने दगा दिल्याने उप्तन्नात तीस ते चाळीस टक्के घट येण्याची शक्यता आहे. पावसाअभावी तोंडावर आलेला रब्बी हंगामही वाया जाणार आहे. मागील चार दिवसांपासून भात काढणीची कामे सुरु झाली, मात्र भाताचे उत्पादन कमी मिळण्याची भिती वाटत असल्याने आता बळीराज्याच्या डोळ्यात पाणी यायला लागले आहे.

हे वाचा – राज्यात भीषण दुष्काळ?

- Advertisement -

यावर्षी भाताच्या ओंब्या पुर्णपणे भरल्या नाहीत. त्यात पाकड (न भरलेले दाणे) जास्त आहेत. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांमध्ये चिंता वाटत आहे. भात पिक चांगले आले तरच सह्याद्रीच्या कुशीतील आदिवासींचे संपुर्ण वर्ष चांगले जाते. यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत उत्पादन कमी होणार आहे. भातसाळींचा दर्जाही चांगला नाही.

खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ या भागात इंद्रायणी, रायभोक आणि खडक्या या प्रसिद्ध सुवासिक जातींचे उत्पादन घेतले जाते. भातकाढणीनंतर रब्बी हंगामात वाटाणा, हरभरा, मसूर यासारखी कडधान्याची पिके खाचरातील पाण्याच्या ओलीवर घेतली जातात. यावर्षी ही पिके घेतली जाणार नाहीत, भात पीक असमाधानकारक आल्याने आदिवासी बांधवात नाराजी आहे. दरम्यान पुणे जिल्हात १३ ही तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होत झाली आहे मात्र शासकिय कागदावर खेड व जुन्नर तालुका यातुन वगळण्यात आल्याने येथील शेतकऱ्ंयाचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

राज्यात भीषण दुष्काळी परिस्थिती; मुख्यमंत्री गप्प का? धनंजय मुंडे

- Advertisement -