घरफिचर्सचिनी बगीच्याची शिकवण

चिनी बगीच्याची शिकवण

Subscribe

उचीयामा तसे अमेरिकेतल्याओरेगोन राज्यातील पोर्टलँड नावाच्या शहरात असलेल्या भल्या मोठ्या बगीच्याचे मुख्य क्युरेटर अर्थात अभिरक्षकआहेत.

या बगीच्यात तुम्हाला काही बदल करायचा असल्यास तुम्ही कोणता बदल घडवून आणाल?

माझ्या ‘शुशी यीन’ या चीनी मित्राने सदाफुमी उचीयामा या जपानच्या अत्यंत नावाजलेल्या ‘गार्डन क्युरेटर’लाविचारलेला प्रश्न काहीसा खोडकर होता. उचीयामा तसे अमेरिकेतल्याओरेगोन राज्यातील पोर्टलँड नावाच्या शहरात असलेल्या भल्या मोठ्या बगीच्याचे मुख्य क्युरेटर अर्थात अभिरक्षकआहेत. जपानचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक पदर असलेलाहा महत्वाचा वारसा त्यांना त्यांच्या आजोबाकडून मिळालाय. वयाच्या दहाव्या वर्षी ते झाले. त्यांच्या आजोबांकडून त्यांनी बगीच्याची अध्यात्मिक भाषा शिकली. आणि पुढे ते अमेरिकेत वास्तव्यास गेले. साठीत असावेत. सध्या ते आपल्या मायदेशी फिरतीवर आहे.

- Advertisement -

त्यांच्यासोबत गेल्या आठवड्यात झालेली आमची भेट,गप्पा-गोष्टी म्हणजे पर्वणीच! आम्ही टोकियोतील इंटरनॅशनल हाऊस ऑफ जपानच्या अत्यंत सुरेख बगीच्यात श्री उचीयामांकडून जपानच्या बगीच्यांवर बोलत होतो. शांत आणि मंत्रमुग्ध करणारा ही छोटीशी बाग जणू काही नैसर्गिक देणगीच. रोज सकाळी येथे पक्ष्यांची जमघट असते. रंगीबेरंगी मासोळ्या इथल्या छोट्याशा तळ्यात मस्त रममाण असतात. विशिष्ट ठेवणीतले दगड,कोरलेली वेगवेगळ्या उंचीची झाडे,मधूनच वाहणारे झरे,आणि अधे मध्ये उभे असलेले शिल्प,हे सगळे मनाला कमालीची शांती देऊन जातात. पुढल्या महिन्यात जेव्हा झाडांना बहर येईल,तेव्हा हा बगीचा आणखीनच सुंदर दिसेल,उचीयामा आम्हाला सांगत होते. टोकियोच काय,जपानमध्ये कुठेही जा तुम्हाला बगीचा दिसणारच. उचीयामा म्हणाले,दुसर्या जागतिक युद्धानंतर जपानचे जे सैनिक शरण गेले,त्यांनी सुद्धा जिथेते होते तिथेलहान मोठाले बगीचे उभारले. अगदी रक्तरंजित युद्धभूमींवर सुद्धा.

येथील बगीचे म्हणजे नुसतीच कशीबशी लावलेली झाडे आणि झाडांखाली फेकलेला कचरा नव्हे,तर बगीचा म्हणजे प्रतिक;सृष्टीकडे आणि स्वतःकडे बघण्याची येथील लोकांचा दृष्टी. उचीयामा त्याला फिलॉसोफी म्हणतात. भारतातील सगळे महत्वाचे बगीचे (म्हैसूर चे वृंदावन अथवा दिल्लीचे मुगल गार्डन) फुलांचे,आपल्याकडे असलेल्या ऋतूंचे प्रतिक. येथील बगीचे दगडांचे. पाषाण म्हणजे विश्वाच्या अवाढव्य वेळे आणि स्वरुपासमोर माणसाच्या लहानश्या वास्तव्याचे प्रतिक. हजारो वर्षांच्या आणि करोडो-करोड दिवसांच्या वयाच्या दगडांच्या पुढे आपले भूतलावरचे वास्तव्य काहीच दिवसांचे. उचीयामा म्हणतात ‘नथिंग इज पर्मनेंट’. म्हणजे सगळेच नाशवंत. बगीचा म्हणजे आमची निसर्गाकडे बघण्याची दृष्टी आणि निसर्ग हा सुंदर आणि कधी निर्दयी पण असतो. चौदाव्या शतकातील एक दृष्टा ‘केंको’ बोलून गेला त्याप्रमाणे येथील बगिच्यांमध्ये जीवनात असते तशी सुबोधता,सूचकता,नाशवंत प्रवृत्ती,आणि काहीशी अनियमतता सुद्धा असते. केंको म्हणाला होता,की थोडीशी अनियमतता जीवनाला जरासे सुरस बनवते. त्यामुळे उचीयामा म्हणतात जप्नीझ बागेत फिरताना तुम्हाला ती अनियमितता ठिकठिकाणी जाणवेल. ती त्या बागेला आणखीनच सुंदर बनविते.

- Advertisement -

बगीच्यांचे काही नियम सुद्धा असतात. ‘आम्ही झाडे कापत नाही,त्यांची विशिष्ट प्रकारे छाटणी करतो. आणि तीसुद्धा त्या त्या झाडांच्या स्वभावानुसार. म्हणजे जे पुढे होणारच आहे – पानगळ वगैरे,त्याला आधीच करून टाकायचे. एवढेच. प्रत्येक झाडाच्या पानगळीचे नियम आहेत. माळ्याला ते बरोबर कळले पाहिजे. नाहीतर बगीच्यात जीवन उरत नाही. झाडे नुसती उभी राहतील,फुलं पण लागतील,पण बगीच्यात चैतन्य असणार नाही. त्या बगीच्यात शांती असणार नाही. त्यात बसल्यावर-फिरल्यावर जीवनातील संभावना दिसणार नाही.’

ज्या बगिच्यांत फिरल्यावर आपल्याला शांती आणि चैतन्य प्राप्त होते त्या बगीच्याचा माळी कमालीचा साधक असतो,असे उचीयामांशी बोलताना जाणवले. माळी झोपलेला असेल,अथवा झोपण्याचे नाटक करत असेल,तर बगीचा वरून दिसायला हिरवागार पण त्यात अंतर्गत शांती असणारच नाही.

त्यामुळे शुशी यीन या माझ्या मित्राने जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारला की ’ह्या बगीच्यात आता काही बदल घडवून आणायचा असेल तर तुम्ही कोणता बदल कराल? ’त्यावर या बावाजीचे उत्तर काय असेल त्याकडे माझे लक्ष होते. उचीयामा हसले. त्यांनी आम्हाला त्या बगीच्याचा इतिहास सांगितला. ह्या बगिच्याला साधारण दीडशे वर्षांपूर्वी एका ‘मास्टर क्युरेटरने’ घडविले. ह्यात त्याची अनन्यसाधारण दृष्टी आणि तपस्या आहे. मला बदल घडवायचा झाल्यास तो घडविणे सोपी आहे. पण खरा प्रश्न हा,की ह्यात बदल करणे आज क्रमप्राप्त आहे का? फक्त माझ्या अहं ला,माझ्या ’इगो’ला,चांगले वाटेल म्हणून मी तो बदल घडवायचा?मग एक बदल दुसर्या बदलांना जन्म देईल आणि ते सगळे नंतर होणारे बदल चांगले असतीलच ह्याबद्दल आज सांगता येणार नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे पण तो नैसर्गिकच असावा. त्यात अनैसर्गिकता आल्यास होणारे बदल मनाला दुःख पण देऊन जातात, हे विसरायला नको.

मी बदलांऐवजी कधी-कधी बगीच्याची छाटणी करणे जास्त उचित समजतो, उचीयामा म्हणाले. जुन्या बागेला आणि त्या गुरु माळ्याच्यादृष्टीला नष्ट न करता त्यात काही नवीन,चांगले,आणि अधिक सुंदर करता येईल का,हा त्यांचा प्रयत्न असतो.
ते म्हणाले: टू मेनी थिंग्ज आर चेंजिंग फार टू इझिली दीझ डेज मुद्दाम बदल घडवितांना त्यांचे परिणाम कसे होतील याकडे आपले लक्ष नसते.

जुन्या आणि नवीन मधील हा नेहमीचा संघर्ष. त्यामुळे माळ्याची भूमिका आणि दृष्टी महत्त्वाची असते. जुने सगळेच वाईट आणि मी करीन तेच चांगले असे जर माळ्याला वाटत असेल तर ते यथोचित होणार नाही. त्या बगीच्यात सगळ्यांना स्थान आहे का? आज घडवलेले बदल बगिच्याला उद्या कुठले आणि कसे रूप घेईल ते आज नाही कळायचे. नव्या बगिच्याचे स्वरूप काही उन्हाळे-पावसाळे गेल्यावर उमजेल. त्या बगीच्याची मह्ती बागवान नाही ठरवणार,ती ठरवतील तिथे येणारे सगळ्या रंगांचे पक्षी,त्या बगीच्यात भ्रमण करण्यास येणारे तरुण-तरुणी,वयोवृद्ध, सगळ्या धर्मांचे लोक. तेथील चैतन्य त्या बगीच्यात मिळणार्‍या शांतीवर अवलंबून असेल. शांती नसेल आणि प्रवेश फुकट असेल तरी तिथे कोणी भटकणार नाही. तुम्ही कितीही जाहिरात करा! पण शांती असेल, बगीचा बहरलेला असेल,तिथे येणार्‍यांना सगळे भाव मिळेल तर दूर-दुरून लोक येतील, बागेत फिरतील, चैतन्य घेऊन जातील. परदेशांतील पक्षी सुद्धा येतील,बहरलेल्या झाडांवर बसतील,गातील. बगीच्यात शांती असेल तर उचीयामा म्हणतात,कोणास वेगळ्या आमंत्रणाची गरज उरत नाही; लोक आपोआपच त्या चैतन्यात न्हायला येतात!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -