घरफिचर्स'आई माझी काळूबाई' ठरली अखेरची मालिका...!

‘आई माझी काळूबाई’ ठरली अखेरची मालिका…!

Subscribe

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे वयाच्या ७९ व्या वर्षी कोरोनाच्या आजारामुळे निधन झाले. कोरोनाच्या संकट काळात सर्वच मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण थांबवले होते. मात्र अनलॉकच्या प्रक्रियेत हळूहळू या चित्रीकरणांना सुरूवात झाली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या आई माझी काळुबाई या मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले. सुरुवातीला ६० वर्षांवरील कलाकारांना चित्रीकरणा जाण्याची परवानगी सरकारने नाकारली होती. याला अनेक ज्येष्ठ कलाकारांनी विरोध केला होता. मात्र नंतर सर्व कलाकारांना चित्रीकरणासाठी जाण्याची परवानगी देण्यात आली. त्यामुळे आई माझी काळूबाई या मालिकेचेही चित्रीकरण सुरू झाले व त्याकरत सर्व ज्येष्ठ कलाकार साताऱ्यात दाखल झाले. मात्र या मालिकेच्या सेटवर कोरोनाने धाड टाकली. साताऱ्यात या मालिकेचे चित्रिकरण सुरू असताना या सेटवरच्या तब्बल २७ जणांना कोरोनाची लागण झाली. या मालिकेत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर महत्वाची भूमिका साकारत होत्या. त्यांनाही कोरोनाची लागण झाली. गेल्या चार दिवसांपासून त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनानंतर कलाकारांच्या आग्रहाखातर चित्रीकरण सुरू केले. मात्र सेटवर कोरोनाची लागण होऊन कलाकार दगावल्याची ही पहिलीच घटना आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.

आशालता वाबगावकर यांची कारकिर्द 

अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी अनेक नाटक, चित्रपट, संगीत नाट्य आणि मालिकांमधून विविध भूमिका साकारल्या आहे. अभिनेता अशोक सराफ आणि अभिनेत्री रंजना यांच्या कॉमेडी चित्रपट गुपचुप गुपचुकमधील गोवन आँटीची भूमिका असो वा अंकुश चित्रपटातील इतनी शक्ति हमें दे ना दाता… ही त्यांच्यावर चित्रीत केलेली प्रार्थना प्रत्येक भूमिका त्या जगल्या. त्यांनी आश्चर्य नंबर १० (१९७१), गरुड झेप (१९७३), गुड बाय डॉक्टर (१९७६), गुंतता हृदय हे (१९७४), गोष्ट जन्मांतरीची (१९७८), छिन्न (१९७९), देखणी बायको दुसऱ्याची (१९९२), मत्स्यगंधा (१९६४), रायगडाला जेव्हा जाग येते (१९६२), विदूषक (१९७३) या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच तिन्ही सांजा (२००९), पकडापकडी (२०११), मणी मंगळसूत्र (२०१०), लेक लाडकी (२०१०), वन रूम किचन (२०११) ही त्यांची आताच्या काळातील काही चित्रपटे. त्यांनी संगीत नाटकांमध्ये नाट्यगीतेही गायली होती.

- Advertisement -

हेही वाचा –

Bhiwandi Building Collapse : इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १८; बचावकार्य सुरू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -