घरफिचर्सअजि सोनियाचा दिनु

अजि सोनियाचा दिनु

Subscribe

शेवटी अखेर तो दिवस उजाडलाच…सकाळपासून रावसाहेब अस्वस्थपणे इकडून तिकडे येरझार्‍या घालत होते.खरं तर रावसाहेब त्यांच्या पक्षाशी गेली अनेक वर्षे एकनिष्ठ होते.गेली 10 वर्षे ते मतदारसंघाचे सिटींग आमदार पण होते. त्यामुळे यंदा देखील आपल्याला तिकीट मिळेल या आशेवर ते होते.परंतु,युती झाली आणि रावसाहेबांच्या सर्व आशा-आकांशा धुळीस मिळाल्या होत्या.त्यामुळे नाईलाजास्तव त्यांना अपक्ष म्हणून फॉर्म भरावा लागला होता. गेला आठवडाभर रावसाहेबांनी रेटून प्रचार केला होता.परंतु,निवडणूक पार पडल्यापासून आणि रावसाहेबांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. अगदी आपल्या मुलाच्या दहावीच्या रिझल्टवेळी पण ते एवढे कावरेबावरे झाले नव्हते.अगदी तुझा बाप आहे मोठा कसला तोटा पडणार नाही ते अगदी मुलाला 35.36 टक्के पडल्यावर देखील संपूर्ण पंचक्रोशीत पेढे आणि मुलाला रावसाहेबांनी बुलेट पण घेऊन दिली होती.परंतु,इतर वेळी निर्धास्त असणार रावसाहेबांच्या छातीत सकाळपासूनच धडधड होत होती. खरं तर दोन दिवस त्या एक्झिट पोलने त्यांची झोप उडवली होती.

रात्रभर ते नुसता प्रचाराच्या आठ दिवसांचा विचार करत होते.अरे…या गल्लीत तर जायंच राहिलं नाही ना? त्या वाडीत आपल्या जातीची किती बरं मतं मला पडतील? गेल्या वेळी या भागात 2000 मते होती,यावेळी किती असतील? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनात राडा घालत होते..गेल्या 10 वर्षांत आमदार असताना रावसाहेबांनी जोरदार प्रचार केला होता…मतदारसंघातील अनेक खड्डेरहित वाटा ते गेली दहा वर्षे तुडवत होते…जातीची दंगल झाली तर सोडवायला ते पहिले असायचे..अशा अनेक दंगली त्यांनी हाताळल्या होत्या. दर महिन्याला अनेक नागरिक त्यांच्याकडे समस्यांचा पाडा वाचायचे…परंतु,आपल्या बांधकामाच्या व्यवसायातून त्यांनी शक्य तेवढा वेळ आपल्या मतदारांना दिला होता.त्यांच्या याच कर्तबगारीवर पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला होता.

- Advertisement -

परंतु,आता वातावरण बदलत चालले होते…रावसाहेबांविरूद्ध लोक उघड उघड तक्रार करताना दिसत होते..पक्षप्रमुखांच्या कानावर अशा गोष्टी जात होत्या…कोणताही पक्ष वाईट किंवा चांगला माणूस बघत नाही..त्याची निवडून येण्याची क्षमता बघतो.त्याप्रमाणे रावसाहेबांच्यात पक्षाला आता ती क्षमता दिसत नव्हती..त्यामुळेच त्यांचा पत्ता कापला होता.त्यावरही मात करत आपल्या गोतावळ्याला सोबत घेत रावसाहेबांनी प्रचार केला होता…त्यामुळे निकालाच्या दिवसापासूनचं त्यांच टेन्शन वाढत चालंल होतं.अखेर ती बातमी आलीच रावसाहेबांचा विजय झाला होता…प्रचारादरम्यान हाताळलेले अनेक फंडे त्यांच्या कामी आले होते.विजयी झाल्याची गोड बातमी मिळताच त्यांच्या जुन्या पक्षाकडून त्यांना पुन्हा फोन आला…नव्या ऑफरसह.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -