घरफिचर्स'ऑगस्ट क्रांती दिन' स्वातंत्र्याची नवी पहाट!

‘ऑगस्ट क्रांती दिन’ स्वातंत्र्याची नवी पहाट!

Subscribe

९ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रजांनी देश सोडून जावे म्हणून गांधीजींनी 'छोडो भारत' आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाने देशात क्रांतीची मशाला पेटली होती. या आंदोलनामध्ये हजारो आंदोलकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या बलिदानाने स्वातंत्र्याची नवी पहाट देशात उजाडली होती.

क्रांतीची धगधगती मशाल हातात घेऊन देशात स्वातंत्र्याचा प्रकाश आणण्यासाठी ज्या हजारो हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांचा स्मृतीदिन म्हणून जो दिवस साजरा केला जातो त्याला ‘ऑगस्ट क्रांती दिन’ असे म्हणतात. ९ ऑगस्ट १९४२ रोजी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची गर्जना केली होती. याच दिवशी गांधीजींचा ‘करेंगे या मरेंगे’ हा मंत्र देशातील हजारो तरुणांच्या नसानसात भिनला होता. गांधीजींनी हे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करावे, असे आवाहन केले होते. “आता कार्यकर्ता नाही तर नेता बना”, असे आवाहन देखील गांधीजींनी देशातील नागरिकांना केले. स्वातंत्र्य संग्रामाला हिंसक वळण लागले होते. स्वातंत्र्य संग्रामातला हा शेवटचा करो या मरोचा लढा मानला जातो. इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य देऊन चालते व्हावे, यासाठी गांधीजींनी ‘चले जाव’चा नारा दिला. गांधीजींच्या आदेशाप्रमाणे प्रत्येकजण नेता झाला होता. स्वातंत्र्यासाठी ज्याला जे पटेल ते तो करत होता.

ऐतिहासिक जनआंदोलन

९ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालीया टँक येथे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे महाअधिवेशन भरले होते. या अधिवेशनात महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’ आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनातून ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याचा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाची सुरुवात ‘गवालीया टॅंक’ म्हणजे आजच्या ‘ऑगस्ट क्रांती मैदाना’तून झाली आणि नंतर या आंदोलनाचा भडका संपूर्ण देशभरात पसरला. इंग्रजी सत्तेविरुद्ध संपूर्ण देश पेटून उठला. धर्म, जात, वंश इत्यादी बाबी बाजूला सारत लाखो लोक या जनआंदोलनात सामील झाले. इंग्रजांना परिस्थिती हाताळताना नाकी नऊ आले.

- Advertisement -

छोडो भारत आंदोलनाचा थरार

इंग्रजांनी इतक्या लोकांना अटक केले की, जेलमध्ये जागाच शिल्लक राहिली नाही. इंग्रज कोणत्याही व्यक्तीला अटक करुन कुटूंबात डांबत होते. या आंदोलनात लोकांनी पोलिस ठाणे देखील नेस्तनाबूत केले. टेलिफोन सुविधा बंद केल्या. त्यामुळे भांबवलेल्या ब्रिटिश सरकारने आंदोलकांवर गोळीबार सुरु करण्याचा आदेश दिला. मात्र, लोकांनी ब्रिटिशांच्या गोळीबाराला, लाठी हल्ल्याला न घाबरता आंदोलन सुरु ठेवले. ब्रिटिशांनी या प्रकरणी महात्मा गांधी आणि कॉंग्रेसच्या सर्व नेत्यांना अटक केली. ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांची रवानगी पुण्यातील गुप्त ठिकाणी केली. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या इतर नेतेमंडळींनाही गुप्त जागी ठेवण्यात आले. परंतु, ही बातमी फुटली. नेतेमंडळींना अटक झाल्यानंतर हे आंदोलन लोकांच्या ताब्यात गेले. लोकांनी ब्रिटिश सरकार विरोधात प्रचंड हिंसक आंदोलने केले. ब्रिटिशांनी सर्वच आंदोलकांना ताब्यात घेत परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे जरी प्रचंड उद्रेक झाला असला तरी स्वातंत्र्याची पहाट या जनआंदोलनामुळेच उगवली, हे विसरता येणार नाही.

स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांना आंदराजंली…!!!

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -