घरट्रेंडिंगबिईंग मराठी ते 'मनी मेकिंग' मराठी

बिईंग मराठी ते ‘मनी मेकिंग’ मराठी

Subscribe

आपल्यापैकी बहुसंख्य लोक फेसबुकवर आहेत. अनेक लोक दिवसाचे तासनतास फेसबुकवर घालवतात. कधी मित्रांचे प्रोफाईल न्याहाळण्यात तर कधी पेजेसला लाईक करण्यात… सेलिब्रिटी, खेळाडू, राजकारणी आणि कम्युनिटी पेजेस अशी लाखो पेजेस फेसबुकवर आहेत. युजर्सला आपल्याकडे वळवण्यासाठी सध्या प्रोफेशनल पद्धतीने पेजेस चालवले जातात.  बिईंग मराठी यापैकीच एक. ग्रामीण भागातील काही मुलांनी एकत्र येत चालू केलेले हे पेज आता त्यांचे उत्पन्नाचे साधन बनलं आहे. साधारणतः दोन वर्षापूर्वी वैभव कोकाट, अक्षय धंदर, राहुल ढवळे, आकाश अमृवार आणि मल्हार टाकळे या तरुणांनी एकत्र येत फेसबुक पेज काढण्याचा विचार केला आणि बिईंग मराठी हे पेज चालू केलं.

पेज लिंक – https://www.facebook.com/BeingMarathi.in
पेज अॅडमिन – वैभव कोकाट, अक्षय धंदर, राहुल ढवळे, आकाश अमृवार आणि मल्हार टाकळे
वय – सर्व अॅडमिन २२ ते २८ वयोगटातील
लाईक्स – ७ लाख १८ हजार
फॉलोअर्स – १० लाख २१ हजार

 

- Advertisement -

पेजच्या सुरुवातीच्या प्रवासाविषयी सांगताना वैभवने सांगितले की, आम्ही खूप विचार केला की पेजचे नाव हे लोकांना आपलं वाटलं पाहिजे. मग चार पाच नावातून आम्ही बिईंग मराठी नाव फायनल केलं. सुरुवातील आम्ही खूप माहिती शोधून पेजवर टाकायचो. लोकांच्या सक्सेस पोस्टला चांगला प्रतिसाद मिळत होता. सकारात्मक पोस्ट टाकून आम्ही पहिल्या तीन महिन्यात तीन लाख लाईक्सचा टप्पा पूर्ण केला. पण फेसबुकच्या गाईडलाईनचे उल्लंघन किंवा इतर काही तांत्रिक कारणास्तव ते पेज फेसबुकने बंद केले. त्यानंतर आम्हाला चार-पाच दिवस झोपच येत नव्हती. टीमही वेगळी झाली. एक-दोन महिने अशीच गेल्यानंतर आम्ही पुन्हा पेज तयार करण्याचे ठरवले.

नवीन पेज केल्यानंतर पेजला लाईक्स सहजासहजी मिळत नव्हते. साधारणतः सुरुवातीच्या २५ हजार लाईक्स मिळेपर्यंत खूप मेहनत करावी लागली. करण कोणतीही पोस्ट टाकली तरी तिला ऑरगॅनिक ग्रोथ मिळत नव्हता. मग आम्ही पुन्हा आमचे ग्राफिक डिझायनर मित्रांना एकत्र केलं. प्रत्येक पोस्टला विशिष्ट पद्धतीने डिझाईन करुन पोस्ट करायला सुरुवात केली. याचा आम्हाला बराच फायदा झाला. बघता बघता आमचे नवीन पेज ५० हजारावर गेले.

- Advertisement -

Posted by Being Marathi on Friday, 4 May 2018

चित्रपटाच्या प्रमोशनमधून पैसे मिळू लागले

आपल्या प्रमोशनल अॅक्टिव्हिटी संदर्भात अधिक माहिती देताना पेजचे अॅडमिन सांगतात की, फॉलोअर्सच्या संख्येमुळे हळूहळू आमच्याकडे चित्रपट प्रमोशनची कामं यायला लागली. बॉईज हा आम्हाला मिळालेला सर्वात पहिला चित्रपट एका पीआर एजन्सीने मिळवून दिला होता. त्याच्या प्रमोशनचे आम्हाला पाच हजार रुपये मिळाले होते. सुरुवातील आम्हाला ते खुप जास्त वाटले. कारण छंद म्हणून चालू केलेले पेज आम्हाला पैसे मिळवून देईल, असं कधी वाटलंच नव्हतं. या चित्रपटाच्या माध्यम प्रायोजक यादीतही आमचा लोगो वापरला गेलाय. बॉईजमुळे सोशल मीडिया पार्टनर म्हणून आम्हाला ओळख मिळाली. आम्ही सर्वजण चित्रपट सिनेमागृहात पाहायला गेल्यावर त्या ७० एमएमच्या पडद्यावर आमचा लोगो पाहून खूपच भारी वाटलं.

बिईंग मराठीने आतापर्यंत जवळपास २५ ते ३० चित्रपटांचे काम केले आहे. सध्या आम्ही तीन ते चार एजन्सी सोबत काम करत आहोत. त्यासोबतच आम्ही शॉर्टफिल्म प्रमोशन, चित्रपटांचे टिझर, ट्रेलर आणि साँग प्रमोशनचे कामं घेतो. मराठी चित्रपटांनी आता मार्केटिंग स्ट्रेटेजी बदलल्याचे अॅडमिनपैकी एक आणि स्वतः कॉम्प्युटर इंजिनीअर असलेला मल्हार टाकळे सांगतो. स्वतः चित्रपटाचे पेज बनवण्यापेक्षा निर्माता दुसऱ्या एका मोठ्या पेजचा आधार घेऊन प्रमोशन करण्यावर भर देत आहेत. याचा त्यांना दुहेरी लाभ होतो. सोशल मीडियावरचा अनावश्यक खर्चही टाळता येतो आणि कमी पैशात जास्त रीचही (किती लोकांनी पोस्ट पाहिली त्याचा आकडा) मिळतो. यापुढे आमच्या कामात अधिक प्रोफेशनलिझम वाढवण्याचा आमचा मानस असल्याचे बिईंगची टीम सांगते.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -