Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स वाई : दक्षिण काशी

वाई : दक्षिण काशी

वाई शहर पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येण्यामागे येथील प्राचीन मंदिरे कारण आहेत. या प्राचीन मंदीराचा आम्ही थोडक्यात घेतलेला आढावा.

Related Story

- Advertisement -

वाई शहर पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येण्यामागे येथील हीच प्राचीन मंदिरे कारण आहेत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे पेशवेकाळाची साक्ष देतात. पुरातन मंदिरे म्हटली की, प्राचीन कालीन, हेमाडपंथी, दगडी बांधकाम असलेली, स्वयंभू अशी त्यांची वैशिष्ट्ये असतात. वाई शहरातील बहुतांश मंदिरांमध्ये ही वैशिष्ट्ये आढळून येतात. म्हणून वाईला दक्षिण काशी म्हणून संबोधित करण्यात येते. वाई शहर पर्यटन स्थळ म्हणून नावारुपाला येण्यामागे येथील हीच प्राचीन मंदिरे कारण आहेत. पेशव्यांचा या शहरामध्ये धार्मिक कार्यासाठी मोठ्या प्रमाणावर वावर होता त्यामुळे येथील मंदिरांचे आराखडे पेशवेकाळाची साक्ष देतात.

श्री महागणपती मंदिर

गणपतराव भिकाजी रास्ते यांनी कृष्णा नदीच्या नदीपात्रातच बांधले आहे. मदिरातील मूर्तीची स्थापना वैशाख शु. 13 शके 1691 ला करण्यात आली. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ढोल्या गणपती असे परिचित नाव आहे. अर्धा मीटर उंच चौथर्‍यावर गजाननाची रेखीव बैठी स्वरूपाची एक मीटर 80 सेमी उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मूर्ती आहे. या मंदिराच्या मागील भिंतीची रचना जाणीवपूर्वक बोटीप्रमाणे करण्यात आली आहे. ज्यामुळे नदीच्या पुराचे पाणी आपोआप दुभंगते आणि पाण्याच्या प्रवाहाचा दाब कमी होतो, मंदिर सुरक्षित राहते. या मंदिराच्या गर्भगृहाचे छत ही जणू तत्कालीन स्थापत्यशैलीची किमयाच म्हणावी लागेल.

श्री लक्ष्मी मंदिर

- Advertisement -

वाईतील श्री लक्ष्मीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. उपलब्ध पुराव्यानुसार हे मंदिर आनंदराव रास्ते यांनी 1778 मध्ये बांधले. रास्त्यांनी लक्ष्मीला दागदागिन्यांनी मढविले एवढेच नाहीतर पूजाअर्चा व उपचारांची कायमची सोय करून ठेवली. मंदिराच्या प्रवेशाचा दरवाजा पश्चिमाभिमुख आहे. यानंतर येतो प्रशस्त सभामंडप. पाच स्तंभ असलेल्या या सभामंडपाला काहीशा निमुळत्या असलेल्या छतामुळे गुहेसारखा आकार आलेला आहे . मंदिराच्या मुख्य शिखराला साठ उपशिखरे आहेत. या शिखरांवरचे नक्षीकाम मराठा स्थापत्य शैलीचे उत्तम उदाहरण होय. गाभार्‍यामध्ये लक्ष्मीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. या लक्ष्मीची सोनेरी पैठणी, नक्षीदार सोन्याचा मुकुट आणि प्रभावळ पेशव्यांच्या काळातील कलात्मकतेच दर्शन घडविते.

प्रवासाचा मार्ग : दादर ते वाई (रस्ते), अंतर – 236 कि.मी. प्रवासाचा वेळ – 4 तास 47 मिनिटे

- Advertisement -