घरफिचर्समाझ्या नजरेतील लध्दाख

माझ्या नजरेतील लध्दाख

Subscribe

अल्ट्रा रन संपवून लेहमध्ये पुन्हा परतल्यावर आशिष इतर टीमसोबत भेटला व सुरुवात झाली कांग यात्झे 2 मोहिमेची. 2 दिवस मोहिमेसाठी लागणारे साहित्य घेऊन तब्बल 5 दिवसांचा मारखा व्हॅलीमध्ये ट्रेक केला. ही जागा हेमिस राष्ट्रीय उद्यानाच्या मागे. तिबेटीयन फॉक्ससारखे दुर्मिळ प्राणी आणि Guldenstadt Redstart सारखे दुर्मिळ पक्षी पाहायला मिळाले. मोहीम फत्ते झाल्यावर चोकदो गावात Snow Leopard च्या वास्तव्याची माहिती मिळाली. थाचुंगतसे गावामध्ये आयबेक्सने दर्शन दिले आणि रोज पिकासारखा धडपडीचा दिवस जाऊ लागला. रोज काहीतरी नवीन दिसल्याने उस्फूर्तता कायम राहिली होती.

मुंबई म्हटले की मरीन ड्राईव्ह, बंगालचे हावडा ब्रीज, राजस्थानची महले, गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक, कर्नाटकचे धबधबे आणि दिल्ली म्हटले की ताजमहल डोळ्यासमोर येतो. परंतु भारताच्या उत्तरेला स्थित राज्य पश्चिम हिमालयाचा भाग असून तेथील स्मारके व जैवविविधता विख्यात का नाहीत? जेम-तेम कुल्लू मनाली, उत्तराखंडमधील उत्तरकाशी आणि काश्मीरमधील वैष्णव देवी मंदिर आणि दल लेक इतक्याच ठीकाणांशी आपली ओळख. लेह-लध्दाखच्या डोंगर रांगा व पठारे बुलेटच्या मिटरसोबत किती पटकन ओलांडली जातात. इथला इतिहास ही बर्फाखाली झाकला जातो. 1679 पासूनच तिब्बत-लध्दाख मुघल युद्धासारखी कित्येक युद्ध या मातीत झाली. 1962 च्या रेझांगला युद्धाची वेगळी माहिती सांगायला नको. तरीही भारताची मान अजून तशीच खंबीर आहे. आपल्याला मात्र सकाळच्या चहा सोबत वर्तमानपत्र नाही मिळालं की आपली चिडचिड होते. बाजारातून महिन्याभरचे सामान एकत्र आणून ते पुरवणे हे त्यांच्यासारखं काही आपल्याला जमणार नाही. इथली जीवनशैली व जैवविविधता इतकी वर्ष पडद्याआड का राहिली असावी?

बहुतेक इतक्या उंचावर स्थित असल्याने माणसाची नजर तिथवर पोहोचू शकली नसावी. तसे 1870 साली फर्डिनांड स्टॉलिक्स्का या ऑस्ट्रियन जीवाश्म शास्त्रज्ञाने या भागात एक अनोखी मोहीम हाती घेतली होती. लध्दाखमधील पशुपक्ष्यांचा अभ्यास, तेही एका छोट्या तुकडीने पार पाडणे, हे एक मोठे धाडस. ही लध्दाखी पर्वतरांग ट्रान्स हिमालय पर्वत क्षेत्राचा भाग आहे. लेहच्या उत्तरेला स्थित ही पूर्वेकडे तिब्बत मधील कैलाश पर्वतरांगेत मिसळून जाते. आज विज्ञानाला माहीत असलेल्या एका गप्पिदास पक्ष्याच्या प्रजातीला याच स्टॉलिक्स्काचे नाव आहे.

- Advertisement -

2014 आणि 2015 साली लेहला माझी कामानिमीत्त फेरी झाली. पण इथले पशुपक्षी पाहण्याची इच्छा नेहमीच अपुरी राहिली होती. तीन वर्षांनी तो मुहूर्त आला. दरवर्षी एक गिर्यारोहणाची मोहीम जुलै किवा ऑगस्ट महिन्यात आखलेली असते. 2018 ची मोहिमही ऑगस्ट महिन्यात ठरली. मर्खा व्हॅलीमधील कांग यत्झे 2 पर्वत हे लक्ष्य. पण मोहीम म्हटले की बाकी काम ही आलच. चढाईचे यंत्र गोळा करणे, त्याची दुरुस्ती, नकाशे व हवामानाचा अंदाज घेणे, शरीरयष्टी तेवढी भक्कम ठेवण्यासाठी व्यायाम करणे यातच जास्त वेळ जातो. मोहिमेच्या सुरुवातीनंतर पूर्ण वेळ आपल्या टीमसोबत असणेही गरजेचे. तेथील जैवविविधता अशी घाईगडबडीत कशी पाहायला मिळेल?

म्हणून 14 दिवसांची मोहीम सुरू होण्याच्या 10 दिवस आधीच मी आणि दिवाकर लेहमध्ये एक वेगळी मोहीम घेऊन दाखल झालो. तांग्लांग ला ते दिस्कितपर्यंतचा 222 किमी चा प्रवास करून, रस्त्यात वाटेल तिथे थांबून हे शक्य होणार होतं. प्रत्येक किलोमीटर मागे एक प्राणी किव्वा पक्षी दिसला तरी चालेल असा विचार. फरक इतकाच की हा प्रवास कोणत्या गाडी ने न करता धावत करायचा असं ठरलं. याला अल्ट्रा रन म्हणतात. नदी-झर्‍याचे पाणी, रस्त्याला एखादा छोटा ढाबा मिळाला तरच जेवण असा विचार करून तांगलांग ला, मिरू, उपशी, लेह, खरदुंग्ला, दिस्कीत असा हा प्रवास. रसिका सायकलिंग करणार म्हंटल्यावर आमचे सर्व साहित्य तिच्या बॅगमध्ये. म्हणून आम्ही दोघे मोकळे.

- Advertisement -

तांगलांगलापासून 7 ला सुरुवात केली आणि पहिल्या 2 तासात 21 किमी पार झाले. इतक्या उंचीवर असल्याने हवेत ऑक्सिजनचे प्रमाण कमी. मुंबईची प्रॅक्टिस इथे तेवढी कामाला येत नसावी हे मला एवढ्या अंतरताच समजले होते. परंतु त्या जागेच्या सौंदर्याने व पशुपक्ष्यांमुळे थोडा दिलासा दिला. रस्त्यानं न धावता आम्ही दर्‍या-खोर्‍यातून धावत होतो. थकवा व उंची कमी जाणवावी म्हणून खाली मान घालून पळण्याची मला सवय.
हे काय धावत आलं रे? असे दिवाकरने सांगताच समोरून जंगली गाढव पाळताना दिसलं.
किअंग म्हणजेच Tibetian wild Ass.

(कान छोटे असल्यामुळे खरंतर हा प्राणी गाढवापेक्षा घोड्याच्या जवळच्या कुळातील आहे. चीन, नेपाळ व पाकिस्तानमध्येही हा प्राणी आढळतो. क्षारांसाठी बहुतेक वेळी हा मिठागराच्या शेजारी वास्तव्य करतो.)
थोड्याच वेळात पुन्हा तिब्बती काळवीट दिसले.
आणि मग भरळ, मर्मोतसारखे इथले सामान्य प्राणी.

बॅकग्राऊंडच्या फिक्या चॉकलेट रंगामध्ये ते अक्षरशः मिसळून गेले होते. पण ह्याच क्षणी नजर ही बसली आणि या एकसारख्या रंगामध्ये मी मान वर करून पशुपक्षी शोधत धावू लागलो. त्यात दिवाकर सोबत असल्याने दोनाचे चार डोळे. मीरूमध्ये पोहोचेपर्यंत आम्ही जवळपास 40 पक्ष्यांच्या नावाजलेल्या प्रजाती पाहून झाल्या होत्या आणि ऊपशीच्या आधी इंडस नदीचे पहिले दर्शन होताच माझी लिस्ट 50 च्या वर पोहोचली होती. ऊपशी ते लेहचा प्रवास कंटाळवाणा आणि बुलेट स्वरांच्या दगदगीमध्ये गेला. पण याची कसर आम्ही खार्दुंगलाच्या पलीकडे नुब्रा व्हॅलीमध्ये भरून काढली. 49 तासात 222 किमी धाऊन जवळपास 80 प्रजाती पाहून झाल्या होत्या.

अल्ट्रा रन संपवून लेहमध्ये पुन्हा परतल्यावर आशिष इतर टीमसोबत भेटला व सुरुवात झाली कांग यात्झे 2 मोहिमेची. 2 दिवस मोहिमेसाठी लागणारे साहित्य घेऊन तब्बल 5 दिवसांचा मारखा व्हॅलीमध्ये ट्रेक केला. ही जागा हेमिस राष्ट्रीय उद्यानाच्या मागे. तिबेटीयन फॉक्ससारखे दुर्मिळ प्राणी आणि Guldenstadt Redstart सारखे दुर्मिळ पक्षी पाहायला मिळाले. मोहीम फत्ते झाल्यावर चोकदो गावात Snow Leopard च्या वास्तव्याची माहिती मिळाली. थाचुंगतसे गावामध्ये आयबेक्सने दर्शन दिले आणि रोज पिकासारखा धडपडीचा दिवस जाऊ लागला. रोज काहीतरी नवीन दिसल्याने उस्फूर्तता कायम राहिली होती. मोहीम आटपून लेहमध्ये फ्लाईटच्या 4 दिवस आधी पोहोचलो. पुढील तीन दिवसात पर्यटन स्थळांना भेट दिली. पँगोंग लेकच्या आधी असलेल्या पठारावर मार्मोतची टोळी आणि लेकमध्ये merganser बदकाला शिकार करताना पाहिले.

घरी येताना तब्बल 162 प्रजातींची यादी घेऊन परतलो. या फिक्या डोंगरांच्या रंगामध्ये कितीतरी लहान मोठे पशुपक्षी लपलेले असतील याची कल्पना आधी कधीच नव्हती. बुलेटच्या धुराने मळलेल्या रस्त्यांव्यतिरिक्त स्वच्छ निसर्गाने रमलेले लध्दाख पाहिल्याचे समाधान आज lockdown मधील बंद खोलीतही तेवढेच जाणवते.

-तुषार परब 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -