घरफिचर्ससुटलेली पायरी आणि गोमूत्रशुद्धी !

सुटलेली पायरी आणि गोमूत्रशुद्धी !

Subscribe

सगळ्या भारताला जोडणारी बॉलिवूड ही चित्रपटसृष्टी मुंबईत आहे, असे सगळे असताना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती पाहिल्यावर देशाला दिशा देणारा हाच का तो महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. अर्थात, अशी परिस्थिती राजकीय नेत्यांनी आणलेली आहे. यात भाजप हा आघाडीचा पक्ष आहे.

महाराष्ट्रात राजकीय पातळीवर सध्या जे काही चाललेले आहे, ते पाहिल्यावर राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कशी पायरी सोडली आहे, याचे अनेक उदाहरणे दरदिवशी दिसतात. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही इतर राज्यांनी अनुकरण करावी, अशी होती. कारण महाराष्ट्र हे देशातील प्रमुख राज्य आहे, त्यात पुन्हा देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही महाराष्ट्रात आहे. त्यामुळे विविध राज्यातील लोक मुंबईत आपले नशीब काढण्यासाठी येतात, इतकेच नव्हे बाहेरील राज्यांमधील अनेक लोक केवळ मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही पोटापाण्यासाठी येत असतात. जेव्हा कोरोनाचा उद्रेक झाला तेव्हा मोठ्या प्रमाणात लोक मुंबई आणि महाराष्ट्रातून आपापल्या राज्यांमध्ये गेले होते, त्यामुळे अन्य राज्यांमधील लोकांना महाराष्ट्र किती रोजगार देतो हे दिसून आले.

सगळ्या भारताला जोडणारी बॉलिवूड ही चित्रपटसृष्टी मुंबईत आहे, असे सगळे असताना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती पाहिल्यावर देशाला दिशा देणारा हाच का तो महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. अर्थात, अशी परिस्थिती राजकीय नेत्यांनी आणलेली आहे. यात भाजप हा आघाडीचा पक्ष आहे. कारण भाजप स्वत:ला पार्टी वुईथ डिफरन्स असे म्हणत असे. म्हणजे आम्ही इतरांसारखे नाही, आमच्यामध्ये फरक आहे. आता तो नेमका फरक कुठला हे महाराष्ट्राच्या अनुषंगाने शोधण्याची वेळ आलेली आहे. कारण २०१९ साली भाजपच्या हातातोंडाशी आलेली सत्ता शिवसेनेच्या अट्टाहासापायी गेली, त्यापासून भाजपचे राजकीय नेते भयानक अस्वस्थ झालेले आहेत.

- Advertisement -

२०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी पुन्हा येणार, असे देवेंद्र फडणवीस म्हणत होते, पण ती सगळ्याच भाजप नेत्यांची भावना होती. कारण भाजपच्या नेत्यांना अगदी पूर्ण विश्वास होता की, आपलेच सरकार पुन्हा येणार, आता ही निवडणूक म्हणजे एक औपचारिकता आहे. आकाशात देव आणि दिल्लीत मोदी यांच्या लाटेवर सरकार पुन्हा येणार असे त्यांना वाटत होते. शरद पवार यांचे आता वय झाले आहे, आता राजकारणात त्यांचा अस्त झालेला आहे, असे भाजपचे नेते मोठा आवेष आणून बोलत असत. म्हणजे बाकीची सगळी मंडळी किस झाड की पत्ती, असे त्यांना वाटत होते. त्यात पुन्हा मोदींची लाट महाराष्ट्रात चालते, याचा त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अनुभव घेतला होता. लोकसभा निवडणुकीत मोदींनी पुन्हा बहुमत मिळवले होते, तसेच आपल्यालाही महाराष्ट्रात मिळेल, असे वाटत असताना, रंगाचा भंग झाला. जे सोबत येतील असे वाटत होते, ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. त्यामुळे आलेले वैफल्य भाजप नेत्यांची पाठ सोडत नाही.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, त्यामुळे काही तरी करा, यासाठी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. काही वेळा त्यांना आर्जवे केली, इतकेच नव्हे तर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांचा जो मुद्दा आहे, तो दोन वर्षे होत आली तरी तसाच भिजत ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे जिथून शक्य आहे, तिथून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा हरतर्‍हेचा आटापिटा करण्यात आला, पण काही साध्य झालेले नाही. सर्वात आधी भाजपचे राज्यसभेतील खासदार नारायण राणेंनी राज्यपाल कोश्यारी यांंना भेटून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. खरे तर भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांचे नेते सध्या विरोधी बाकांवर बसलेले आहेत. त्यांनी विरोधकांची भूमिका पार पाडताना सत्ताधारी सरकारवर धोरणात्मक टीका करायला काहीही हरकत नव्हती, त्यांचे घोटाळे उघड करायलाही काही हरकत नाही, पण राज्यातील भाजप नेत्यांचा रोख पाहिला तर ते सरकारवर धोरणात्मक टीका करत नसून काहीही करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडायचेच, असाच त्यांचा पवित्रा आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे तो जनतेला दिसतो. त्यामुळे भाजपने गेल्या अडीच वर्षात जनतेच्या मनातील स्थान खाली आणले आहेे. कारण त्यांच्या नेत्यांनी जे काही प्रकार चालवले आहेत, त्यामुळे भाजप सत्तेसाठी किती उतावीळ झालेली आहे, असे लोकांना दिसून येत आहे. त्यामुळे खरे तर भाजप आपले नुकसान करून घेत आहे. जेव्हा आपण विरोधात असतो,तेव्हा संयम पाळणे आवश्यक असतो. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात पाच वर्षे होते, तेव्हाही विरोधात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयम पाळला होता.

आता भाजप जसे करत आहे, तसे उठसूठ सरकार पाडण्याचे उद्योग करत नव्हते. त्या भाजपकडे विरोधी बाकावर असताना जी राजकीय परिपक्वता हवी ती दिसत नाही. भाजपचे नेते महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधार्‍यांनी किती घोटाळे केले याची दरदिवशी उदाहरणे देत आहेत. आता या घोटाळ्यांची यादी इतकी मोठी झाली आहे की, आता ते नेमके किती घोटाळे होते, याची चौकशी करावी लागेल. हे घोटाळ्यांचे आरोप करून केंद्रीय तपास यंत्रणांकडून तपासणी करूनही सरकार काही पडत नाही. शेवटी भाजपची राज्यातील नेते मंडळी महाराष्ट्रातील परिस्थिती कशी बिघडली आहे, याची तक्रार घेऊन केंद्रीय गृहसचिवांकडे गेली. आता केंद्रीय गृहमंत्रालय याची चौकशी करणार आहे. राज्यात सरकारवर घोटाळ्याचे आरोप करणारे आघाडीवरील भाजप नेते आहेत, किरीट सोमय्या. त्यांना पुणे महापालिकेच्या पायरीवर शिवसैनिकांनी धक्काबुक्की केली, त्यात ते पायरीवर पडले. त्यानंतर दोन दिवसांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सोमय्या यांचा त्याच पायरीवर सत्कार केला, त्यानंतर काही तासात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सोमय्यांचा सत्कार झालेली पायरी गोमूत्र टाकून शुद्ध करून घेतली.

भाजपच्या विरोधी मोहिमेला उत्तर देताना शिवसेनाही हातचे राखून ठेवत नाही. भाजप आणि काँग्रेसने मुंबईतील पालिका निवडणुकीच्या तोंडावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे शिवाजी पार्कात स्मारक होण्याचा मुद्दा पुढे आणला होता, त्यात कुठलाही प्रामाणिकपणा नव्हता, तो जनमत आकर्षित करण्याचा एक स्टंट होता, हे लोकांनाही कळते. मुस्लीम युवतींनी हिजाब घालण्याचा मुद्दा कर्नाटकातील होता, पण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली व्होटबँक असलेल्या मुस्लीम महिलांना हिजाबच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरवले. सत्तेसाठी महाराष्ट्रातील राजकीय पक्ष काहीही करायला तयार आहेत. त्यांनी आपली पायरी सोडली आहे. गोमूत्रामुळे त्यात सुधारणा होणार आहे का, असा प्रश्न आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -