घरफिचर्सबॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन !

बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन !

Subscribe

पैसा, प्रसिद्धी, आलिशान घर, नोकर चाकर, हे सुख कोणाला नको असतं. काही बॉलीवूडकरांना ते खानदानातून मिळते तर सुशांतसारख्या सामान्य कुटुंबातील तरुणांना ते स्वकष्टातून कमवावं लागतं आणि ते टिकवण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या बरोबरीच्या स्टेटसवाल्यांबरोबर उठबस करावी लागते. यातूनच मग वास्तवाचं भान ठेवणार्‍या काही शहाण्यांचं भलं होतं तर काहीजण मात्र या चंदेरी दुनियेच्या तात्पुरत्या झगमगाटालाच आयुष्य समजून त्यात वाहवतं जातात. पण जेव्हा वास्तवाचं भान येत तोपर्यंत सगळंच हातातून गेललं असतं. आज सुशांतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात जसं बॉलीवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. तसं ते आधीही आलं आहे. यात ज्या व्यक्ती अडकल्या त्या नंतर लयासचं गेल्या.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आहे. हायप्रोफाईल प्रकरण असल्याने तपासानेही वेग घेतला आहे. यामुळे रोज या प्रकरणात नवीन खुलासे होत आहेत. याचदरम्यान, रिया चक्रवर्ती सुशांतला त्याच्या नकळत ड्रग्ज देत असल्याची खळबळजनक माहिती तिच्याच व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून समोर आली आहे.

यामुळे सुशांतचा बळी नेपोटीजम आणि मनोविकाराने घेतल्याच्या चर्चा तूर्तास थांबल्या असून बॉलीवूडचं जुनंच ड्रग्ज कनेक्शन पुन्हा एकदा नव्याने पुढे आलं आहे.

- Advertisement -

मात्र यावेळी यात रिया व तिच्या गँगबरोबरच अनेक बड्या धेंडांची नाव समोर येण्याची शक्यता असल्याने बॉलीवुडकरांची मात्र झोप उडाली आहे. कारण बॉलीवूडची चंदेरी दुनिया ही पैसा, ग्लॅमर्स, सेक्स, पार्टी, ड्रिंक्स अ‍ॅड ड्रग्ज या भोवतीच फिरत असते हे याआधीही जगाने बघितले आहे. त्यावेळी ड्रग्जच्या विळख्यात अ़डकलेल्या ज्या कलाकारांची पोलखोल झाली त्यांच पुढं काय झालं हे देखील सगळ्यांना माहीत आहे.

पैसा, प्रसिद्धी, आलिशान घर, नोकर चाकर, हे सुख कोणाला नको असतं. काही बॉलीवूडकरांना ते खानदानातून मिळते तर सुशांतसारख्या सामान्य कुटुंबातील तरुणांना ते स्वकष्टातून कमवावं लागतं आणि ते टिकवण्यासाठीही प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी आपल्या बरोबरीच्या स्टेटसवाल्यांबरोबर उठबस करावी लागते. यातूनच मग वास्तवाचं भान ठेवणार्‍या काही शहाण्यांचं भलं होतं तर काहीजण मात्र या चंदेरी दुनियेच्या तात्पुरत्या झगमगाटालाच आयुष्य समजून त्यात वाहवतं जातात. पण जेव्हा वास्तवाचं भान येत तोपर्यंत सगळंच हातातून गेललं असतं. आज सुशांतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात जसं बॉलीवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. तसं ते आधीही आलं आहे. यात ज्या व्यक्ती अडकल्या त्या नंतर लयासचं गेल्या.

- Advertisement -

त्यांना पुन्हा उभं राहताच आलं नाही. पण ज्यांना पश्चाताप झाला त्यांनी स्वत:ला सांभाळलं. बॉलीवूड ड्रग्जच्या या दुनियेचा कधी विषय आला तर प्रामुख्याने पहिलं नाव येतं ते मुन्नाभाई म्हणजे संजूबाबा, अभिनेता संजय दत्त याचं. प्रसिद्धीच्या झोतात असतानाच 1९82 साली अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच महिन्यांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती. ज्येष्ठ अभिनेते व मंत्रीपदावर असलेले सुनील दत्त व नर्गिस यांचा संजय मुलगा. यामुळे एवढ्या सुसंस्कारी घरात जन्माला येऊनही संजय अमली पदार्थांच्या सेवनाला कसा बळी पडला. यावर त्यावेळीही खूप चर्चा रंगल्या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संजयने ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. तसेच ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी वडील सुनील दत्त यांनी त्याला अमेरिकेत नेले. तेथे व्यसनमुक्ती केंद्रात त्याला ठेवण्यात आले.

यामुळेच आपण आज जिवंत असल्याचेही त्याने सांगितले होते. पण नंतर 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या काळात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला शिक्षा ठोठावण्यात आली होती. संजयने आयुष्यात केलेल्या या चुका त्याला महागात पडल्या. त्यानंतर शिक्षा भोगून आल्यावरही पुन्हा त्याला बॉलीवूडमध्ये हवा तसा जम बसवता आला नाही.

एका उमद्या कलाकाराला ड्रग्जने उद्धवस्त केले.

त्यानंतरही अनेक सेलिब्रटिजची नावं ड्रग्ज प्रकरणात आली. ज्येष्ठ अभिनेते फिरोज खान यांचा पुत्र फरदीन खान यालाही 5 मे 2001 साली कोकेन बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

त्यावेळी फरदीनने बॉलीवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. अभिनयात तो सुमार होता. पण त्याच्या चॉकलेट बॉय पर्सनॅलिटीमुळे लाखो तरुणींच्या गळ्यातल्या तो ताईत बनला होता.

संजय दत्तप्रमाणेच फरदीनलाही व्यसनमुक्ती केंद्रात ठेवण्यात आलं. 2010 मध्ये त्याने ‘दुल्हा मिल गया’ चित्रपट केला. पण तो आपटला. त्यानंतर फरदीन बॉलीवूडपासून दूर झाला.

हल्लीच्या काळातलं नाव घ्यायचं तर चॉकलेट बॉय रणबीर कपूरही अंमली पदार्थांचं सेवन करायचा. त्याबद्दल एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्यानेच खुलासा केला होता.

शाळेत असताना त्यानेही चरस, गांजाचे सेवन केल्याचं त्याने सांगितलं होतं. रॉक्सटार सिनेमात त्याला गर्दुल्यांची भूमिका करताना तो अनुभव कामी आल्याचंही त्याने सांगितलं होतं. शाळेत जाणारा पोर सवदा रणबीर गंमत म्हणून चरस, गांजा घेतो काय आणि घरातल्यांना त्याची भणक लागत नाही. हेही विचित्रच आहे. आपापल्या स्वतंत्र आयुष्यात मश्गुल असलेल्या या बॉलीवूडकरांची मुलं किती एकाकी असतात हे रणबीरनेच ड्रग्ज सेवनाची कबुली देऊन सांगितलंय.

‘कौवा बिर्याणी’मुळे प्रसिद्ध झालेला किडकिडीत देहयष्टीचा विनोदी नट विजय राज याला अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 2005 साली दुबई विमानतळावर अटक करण्यात आली होती.

त्याची रवानगी तुरुंगात केल्यानंतर विजय राज बॉलीवूडमध्ये फारसा दिसला नाही. विनोदी नट म्हणून नावारुपास येत असतानाच त्याने ड्रग्ज घेऊन माती खाल्ली. तेथेच तो संपला.

किंग खान शाहरुख खान याची पत्नी गौरी हिला बर्लिन विमानतळावर अटक करण्यात आली होती. प्रवासादरम्यान गौरीकडे चरस, गांजा आढळला होता.

हृतिकची पूर्व पत्नी सुजेन खान हिला ड्रग्जचे असलेले व्यसन सर्वश्रुत आहे. याच कारणामुळे हृतिक व सुजेन यांचा घटस्फोट झालेला आहे. गायक हनी सिंग हादेखील ड्रग्जच्या विळख्यात अडकला होता.

पैसा व प्रसिद्धी मिळताच त्याला अमली पदार्थांचे व्यसन जडले. व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतल्यानंतर आता तो सामान्य जीवन जगत आहे. एकेकाळी बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री असलेली ममता कुलकर्णी लोकप्रियतेच्या शिखरावर असताना बॉलीवूडमधून अचानक गायब झाली होती.

अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या विकी गोस्वामीबरोबर तिने लग्न केल्याने बॉलीवूडमध्ये खळबळही उडाली. मधल्या काळात या दाम्पत्याला ड्रग्ज रॅकेटप्रकरणात अटक करण्यात आली होती.

एकेकाळी नावारुपाला असलेली ही मंडळी आज आपआपले आयुष्य जरी जगत असली तरी त्यांच्यावर ड्रग्जचा ठपका मात्र कायमचा लागला आहे. पैसा व प्रसिद्धीची हवा डोक्यात गेली की माणसं सारासार विचार करणं बंद करतात.

समोर दिसणार्‍या पण दिशाच न दाखवणार्‍या प्रवाहात वाहून जातात. सुशांतसारखी प्रकरणं जेव्हा चर्चिली जातात तेव्हा या कलाकारांच्या जुन्याच ड्रग्ज कहाण्या नव्याने कानावर पडतात.

पण यांचं दुर्दैव की यावेळी ते फक्त कसे व्यसनाधीन झाले यावरच बोलले जाते. त्यांचे उत्कृष्ट काम, तेथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष, स्टारडम पुसला गेलेला असतो.

कारण नवीन कलाकारांची ड्रग्ज विश्वातल्या पार्टीत एन्ट्री झालेली असतात. जुन्या कलाकारांच्या संघर्षाला तिथे स्थान नसते. ते रडगाणे कोणालाच ऐकायचेही नसते फक्त हवी असते ती ड्रग्जची एक किक. झालं गेलं विसरण्यासाठी. बॉलीवूडच्या त्या दणदणाटात सुशांतची चर्चाही अशीच हळूहळू बोथट होत जाईल.

-कविता जोशी-लाखे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -