घरफिचर्सक्लोज एंडेड फंड योजना

क्लोज एंडेड फंड योजना

Subscribe

मागच्या भागात आपण म्यु.फंडमध्ये आपले पैसे कधी व कसे गुंतवावेत हे पाहिले. तसेच मुख्य प्रकारात ‘ओपन-एंडेड’बद्दल माहिती घेतली. आता आपण दुसरा प्रकार म्हणजेच ‘क्लोज एंडेड’ म्हणजे काय? आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत.

मागच्या भागात आपण म्यु.फंडमध्ये आपले पैसे कधी व कसे गुंतवावेत हे पाहिले. तसेच मुख्य प्रकारात ‘ओपन-एंडेड’बद्दल माहिती घेतली. आता आपण दुसरा प्रकार म्हणजेच ‘क्लोज एंडेड’ म्हणजे काय? आणि त्याची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. बँक असो किंवा पोस्ट ऑफिस, जेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार आपले पैसे गुंतवू इच्छितात ,तेव्हा साहजिकच त्यांच्याकरिता अनेकविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात. कारण अल्प मुदतीपासून ते दीर्घकालीन पर्याय असणे हे सोयीचे असते. अर्थात त्यावरच व्याज किंवा डिव्हीडंट म्हणजेच लाभांश अवलंबून असतो. ह्याच निकषानुसार म्यु.फंडांकडे ओपन आणि क्लोज अशा प्रकारच्या योजना असतात.

क्लोज एंडेड योजना  

अशा प्रकारच्या योजनेत म्यु.फंडातर्फे योजना जाहीर होते, तिला मुदतीचे बंधन असते. अमुक तारखेपर्यंत आमची ही योजना खुली राहील आणि नंतर मात्र यात पैसे गुंतवता येणार नाहीत. एखाद्या शेअरचा आय.पी,ओ. (IPO) कसा अमुक तारखेला सुरु होतो आणि निश्चित तारखेला (जी आगाऊच जाहीर केलेली असते) बंद केली जाते.म्हणजेच अशा योजना अमर्यादित कालावधीसाठी उपलब्ध राहत नाहीत. म्यु.फंडात आपले पैसे गुंतवू पाहणार्‍या सर्वांनी अशी योजना जाहीर झाल्यावर मुदत कधी बंद होणार? ते आधीच पाहून घ्यावे म्हणजे संधी हुकणार नाही.

- Advertisement -

क्लोज एंडेड योजनांची वैशिष्ठ्ये

ओपन एंडेड योजनेनुसार युनिट्स पद्धतीत खरेदी होते. हे पैसे शेअर्स -इक्विटी (Equity) आणि रोखे -डेटमध्ये (Debt) गुंतवले जातात, अशी गुंतवणूक अर्थातच तज्ज्ञ आणि अनुभवी व्यावसायिकांमार्फत- फंड मॅनेजर्समार्फत केली जाते. कालावधीसाठी निश्चित मुदत. मुदत बंद झाल्यावर थेट खरेदी करता येत नाही
मात्र शेअरबाजारातून (सेकंडरी मार्केटमार्फत) अशा युनिट्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येतात अशा योजना मुदत-बंद स्वरूपाच्या असतात, म्हणजे ह्या किमान तीन किंवा पाच वर्षांसाठी तयार केल्या जातात. ह्यांना ‘लॉक -इन-पिरियड’ (Locked -In-Period) असे म्हटले जाते. हा कालावधी संपल्यानंतर अशी योजना आपोआप खुली स्वरुपाची होते. किंवा ती योजना कायमची बंद केली जाते आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत केले जातात. अशावेळी त्या मुदतीपर्यंतचे निव्वळ मालमता मूल्य (NAV) काढले जाते आणि दिले जाते. काहीवेळा म्यु.फंड अशा योजनांतील युनिट्सची स्वतः खरेदी करतात. मोठ्या गुंतवणुकीसाठी अधिक उपयोगी असते. फंड मॅनेजरच्या हाती निश्चित काळासाठी फंड उपलब्ध असतात.

नेमके काय फायदे होऊ शकतात?

१) फंड म्हणजे असा निधी जो म्यु.फंडाकडे जमा होतो. त्याला निश्चित कालावधीची मर्यादा असते. याचा अर्थ अशा फंडमध्ये सारखी-सारखी गुंतवणूक होत नाही. किंवा त्यातील पैसे वारंवार काढले जात नाहीत. म्हणून फंड मॅनेजरकडे उपलब्ध असलेला एकरकमी ‘निधी’ हा त्याला त्याचे व्यावसायिक कौशल्य वापरून अधिक नफा कमावण्याकरता गुंतवता येतो.सतत होणारी खरेदी-विक्रीच्या व्यवहारामुळे ‘ निधी’ रकमेत सतत चढ-उतार होत असतात, त्या कारणाने फंड-मॅनेजरला नेमका आकडा कळत नाही. परिणामी गुंतवताना मर्यादा येतात. म्यु.फंडाच्या आर्थिक भाषेत ह्यालाच ‘भक्कम मालमत्तेचे पाठबळ’ असेही म्हटले जाते. त्यातून निश्चित धोरण अंगीकारून अधिक लाभांश कमावता येतो.

- Advertisement -

२) असे म्यु. फंड युनिट्स हे बाजारभावानुसार उपलब्ध असतात. त्या-त्यावेळेला जी किंमत चालू असेल त्यानुसार व्यवहार होऊ शकतात.‘रिअल टाईम’चा बेनेफिट होतो.
उदाहरण म्हणजे त्याचा जो न्ह्याव्ह (NAV) असेल त्यापेक्षा अधिक किमतीने -प्रीमियमने किंवा न्ह्याव्हपेक्षा (NAV) कमी किमतीने असेल तर डिस्काउंटचा उपयोग मिळू शकतो.

३)  कोणत्याही गुंतवणूक साधनांत हे गुणधर्म असणे हे आपल्या हिताचेच असते. क्लोज एंडेड योजनेत हे दोन्ही उपलब्ध असतात. पाहिजे तेव्हा विकणे आणि घेणे हे व्यवहार होऊ शकतात. किमतीबाबत त्याक्षणी बाजारात जो भाव असेल त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो.
तोटे किंवा काही नकारात्मक बाबी- तशी कोणतीही गुंतवणूक योजना ही परिपूर्ण असत नाही, हीच बाब क्लोज एंडेडबद्दल सांगता येईल.

तोटे किंवा काही नकारात्मक बाबी

 तशी कोणतीही गुंतवणूक योजना ही परिपूर्ण असत नाही, हीच बाब क्लोज एंडेडबद्दल सांगता येईल. काही त्रुटींची उदाहरणे :-

१) ओपन एंडेडच्या तुलनेत क्लोजची कामगिरी थोडी कमी असू शकते

२) या योजनेत मोठ्या रक्कमा गुंतवल्या जाव्यात अशी अपेक्षा असते.त्याकारणाने छोटे गुंतवणूकदरांची अडचण होऊ शकते.खुल्या योजनेत छोट्या रक्कमा गुंतवता येतात, हा प्लस पॉईंट

३) खुल्या योजनेत –ओपन एंडेडमध्ये कामगिरीबाबत पूर्वइतिहास उपलब्ध असतो तसा बंद योजनेत मिळत नाही.

असे जरी असले तरी आपण आपल्या गुंतवणुकीचा एक सशक्त पर्याय म्हणून ओपन आणि क्लोज एंडेड अश्या दोनही म्युच्युअल फंडस योजनांकडे पहायला हरकत नाही.मात्र तसे करताना आपण डोळस असायला हवे, त्याकरिता माहिती आणि मार्गदर्शन जरूर घेतले पाहिजे. खालील निकष पडताळून पाहिले पाहिजेत आणि त्यानंतरच कोणत्याही योजनेत आपली कमाई गुंतवली पाहिजे.

महत्वाचे निकष :- असे निकष हे केवळ म्युच्युअल फंडाबाबत आहेत असे नाही, आपल्या कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीबाबत हे लागू होऊ शकतात. उदाहरणार्थ – बँकामधील ठेवी आणि खाती/पोस्ट योजना/पतपेढी. इतकेच कशाला आपण जागेत –ब्लॉक/जमीन ह्यात पैसे गुंतवतो किंवा शेअर्समध्ये उलाढाल करतो त्यासाठीही खालील निकष आपण तपासले पाहिजेत.

१) वृद्धी – आपले पैसे वाढले पाहिजेत –चांगले व्याज-लाभांश मिळेल अशी म्यु.फंडाची कामगिरी आणि व्यवस्थापन असायला हवे.

२) सुरक्षितता- आपले घामाचे –श्रमाचे पैसे सदैव सुरक्षित असले पाहिजे.फसवणूक,लुबाडणे आणि भ्रष्टाचार अश्या काही दोष-दुर्गुणांपासून कोणतीही योजना मुक्त असली पाहिजे

३) नियंत्रण – कायदा,सरकार आणि नियंत्रक ह्यांचा जर अंकुश असेल तर कोणतीही स्कीम बुडणार नाही कि कुणाला लुबाडणारदेखील नाही.

४) रोकड-सुलभता – आपल्या गरजेला,अडीअडचणीला आपल्याला आपले पैसे अगदी विनासायास परत मिळाले पाहिजेत.आपल्याला कोणाकडून उधार मागण्याची किंवा कर्ज काढण्याची अजिबात वेळ आली नाही पाहिजे.

५] जोखीम- कोणत्याही गुंतवणूक साधनांत ‘जोखीम’ ही असतेच. ‘’अधिक नफा = अधिक जोखीम’’ असे समीकरणही अनेकदा वापरले जाते.पण मुळात व्यावसायिकपणे निधी हाताळणी असायला हवी आणि आपण व्यक्तिगत पातळीवर किती जोखीम घेवू शकतो?हे ठरवले पाहिजे कारण आपल्या कौटुंबिक गरजा ह्याबद्दल आपणच ठीक ठरवू शकतो

असे निकष पाहण्याची आपल्याला संवय झाली तर साहजिकच समाजातील ‘आर्थिक साक्षरता’ वाढेल आणि परिणामी व्यक्तिगत आणि देश पातळीवर उत्पन्नाचा दर वाढू शकेल.पुढील भागात आपण म्युच्युअल फंडाबाबत अधिक माहिती घेणार आहोत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -