हुशारीचे हे भूत कुणाचे?

जर्मन शब्द Zeitgeist म्हणजे zeit म्हणजे वेळ आणि Geist म्हणजे आत्मा किंवा भूत होय. Zeitgeist 2007 आणि 2011 सालच्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या तीन माहितीपटांची मालिका होय. ज्यात अनेक कट सिद्धांत तसेच व्यापक सामाजिक आणि आर्थिक बदलांचे प्रस्ताव आहेत.

प्रा.किरणकुमार जोहरे

दर 100 वर्षांनी पृथ्वीवर कोणत्या साली कोणते साथीचे रोग येणार याचा आराखडा पृथ्वीवर आधीच बनवून ठेवला आहे आणि कठपुतलीप्रमाणे आपण ब्रम्हांडाच्या पसार्‍यात वावरत आहोत. कुणीतरी हुश्शार सजीव म्हणजे ‘बायोमेकॅनिकल मशीन्स’ ते ऑपरेट करतो आहे. ‘जिनेटिक इंजिनिअरिंग’बरोबरच यात ‘इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी’च्या असंख्य शाखांची भर पडली आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी सध्याचा कोविड 19 हा आजार 2019 ते 2021 मध्ये पृथ्वीवर धुमाकूळ घालणार हे 1942 ते 1946 मध्ये विविध बातम्या व व्हिडीओमधून त्यावेळी लोकांना माहीत होते. ही काही चित्रपटातली स्टोरी नाही तर जित्याजागत्या हकिकतीचे वर्तमानाच्या मानगुटीवर बसणारे ‘भूत’ आहे. पण यामागे खरी हुशारी कोणाची हा प्रश्न आहे.

जर्मन शब्द Zeitgeist म्हणजे zeit म्हणजे वेळ आणि Geist म्हणजे आत्मा किंवा भूत होय. Zeitgeist 2007 आणि 2011 सालच्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या तीन माहितीपटांची मालिका होय. ज्यात अनेक कट सिद्धांत तसेच व्यापक सामाजिक आणि आर्थिक बदलांचे प्रस्ताव आहेत. Zeitgeist : The Movie(2007), Zeitgeist : Addendum (2008) आणि Zeitgeist : Moving forword (2011) हे सर्व चित्रपट पीटर जोसेफ यांनी दिग्दर्शित केले आहेत.

Zeitgeist चित्रपटात असे म्हटले गेले होते की ग्लोबलायझर्सचे ध्येय हे ग्रहावरील सर्व रहिवाशांच्या त्वचेखाली चिप्स लावायचे आहे. ज्यात एखाद्या व्यक्तीबद्दलचा सर्व डेटा आणि पैशाचा दुवा असेल. म्हणजेच, जर तुम्ही अचानक सिस्टमला विरोध केला तर चिप बंद केली जाईल आणि एखाद्या व्यक्तीला अगदी सहज यमसदनी पाठवणे नियंत्रण कक्षाला शक्य होईल. मानवी जीवन सुखकर करण्यासाठी हे तंत्रज्ञान आहे अशी दुसरी बाजू सांगितली जाते. तर पर्यावरणहानी न करता ‘पेपरलेस’ व श्रमानुसार शरीरातच डिजिटल करन्सीचे पॉईंट्स सरकारला पगाररुपाने मानवी क्षमतांनुसार व क्षमता नियंत्रण व विकसित करत देता यावे यासाठी हे राबविले जात आहे. एवढेच नव्हे तर दहशतवादाशी लढण्यासाठी अणूबाँबसारखी शस्त्रे नकोत यासाठी हे तंत्रज्ञान आहे. तसेच लोकसंख्या नियंत्रण करत मानवी मेंदूत व शरीरात डोपामाईनसारख्या रसायनांच्या रिमोट कंट्रोलने अ‍ॅटोमॅटिक ग्लोबल सुपर कॉम्प्युटर यंत्रणांशी जोडणारी ही अभिनव यंत्रणा म्हणजे मानवी बुद्धिमत्तेचा उत्तुंग आविष्कारच!

‘आवळ्याची मोट बांधणे’ ही एक म्हण आहे. एकमेकांशी न जमणार्‍या लोकांना एकत्र आणणे असा याचा अर्थ होय. मात्र तुम्ही कल्पनादेखील करु शकत नाही अशा तंत्रज्ञानाची आवळ्याची मोट बांधून तुम्हाला ‘मोटस’धारक बनविले जाण्याकडे जग चालले आहे. व्यक्तीस्वातंत्र्याच्या गप्पा मारणार्‍यांची तोंडेदेखील मोटसची मोट बंद करेल. पृथ्वीवरील चराचराला ज्ञानाचे दरवाजे खुलेकरत जणू जखडून टाकत (?) आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाचे नवे आयाम आपला फुलोरा फुलविणार आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का?

‘मोटस’ हे एखाद्या हॉलीवूड चित्रपटातील काल्पनिक रंजक भयकथानक वाटू शकते. मात्र 2021 साली प्रत्यक्ष अस्तित्वात आलेले ‘मोटस’ ही दुधारी तलवार आहे. ‘इंटर डिसिप्लीनरी सायन्स-टेक्नॉलॉजी’चे वर्तमान काळातील वास्तव आहे. आपण ते कसे ‘टोचून घेत’ स्वीकारू? हाच खरंतर गंभीर प्रश्न आहे! ‘मोटस’ म्हणजे क्वांटम कॉम्प्युटींग, इलेक्ट्रॉनिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), शरीर विज्ञान, भौतिकशास्त्र, नॅनो सायन्स, नॅनो टेक्नॉलॉजी यासोबतच जेनेटिक इंजिनिअरिंग तसेच रोबोटिक्स आदी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या एकत्र मिश्रणवजा खिचडीचे फलित आहे.

इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे प्रोफेसर लाऊ फॅमिली आणि कोलंबियातील बायोमेडिकल इंजिनीअरिंगचे प्राध्यापक केन शेपर्ड यांच्या नेतृत्वात झालेले ‘इंटिग्रेटेड सॉलीड लिक्विड मायक्रो चिप’वरील संशोधन, नेचर कम्युनिकेशन्समध्ये 7 डिसेंबर 2021 रोजी ऑनलाइन प्रकाशित झाले आहे. तर मागील वर्षीच ‘सायन्स अ‍ॅडव्हान्सेस’ या जर्नलमध्ये मे महिन्यात प्रकाशित रिसर्च पेपरनुसार कोलंबिया विद्यापीठाच्या इंजिनिअर्सनी सर्वात लहान सिंगल-चिप प्रणाली विकसित केली आहे. ‘मोटस’ नावाने ओळखली जाणारी ही यंत्रणा म्हणजे अत्यंत सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक सर्किट होय. मानवी शरीरात प्रत्यारोपण करण्यायोग्य असलेल्या या इलेक्ट्रॉनिक्स चिप्स केवळ सूक्ष्मदर्शकामध्ये दिसू शकतात. ‘मोटस’ म्हणजे 0.1 घनमिलीमीटर एवढ्या आकारमानाच्या या चिप्स आहेत. मानवी शरीरात काय घडते आहे हे जाणून घेण्यासाठी म्हणून वैद्यकीय औषधोपचार करण्याच्या उद्देशाने हायपोडर्मिक सुईने शरीरात इंजेक्शनद्वारे त्या सोडता येतात, मात्र यामागे इतर ही अजेंडे राबविणे शक्य आहे. ही तंत्रज्ञान किमया मानायची की, भस्मासुर राक्षस हा व्यक्तीपरत्वे वेगवेगळा विचार असू शकतो.

‘मोटस’धारक बनने हे मानवी सभ्यतेसाठी लवकरच म्हणजे साधारणतः 2050 सालापर्यंत पृथ्वीवर कंपल्सरी झालेले असेल. व्यक्तीचे खासगी आयुष्य यामुळे संपुष्टात येईल, असा वादग्रस्त मुद्दा म्हणजे ‘मोटस’! कारण मोटस म्हणजे लस देता तशी! कोविड-19 ने सिद्ध केले आहे की, काही महिन्यांत अब्जावधी लोकांचे लसीकरण शक्य आहे. उद्या मानवजातीच्या कल्याणासाठी प्रत्येक जन्माला येणार्‍या व्यक्तीला शरीरात मोटस टोचणे शक्य आहे. वसुंधरेवरील सर्व सध्याच्या सजीव व्यक्तीत ‘मोटस’ नावाचे हे इलेक्ट्रॉनिक्स नॅनो रोबोट ‘इन्स्टॉल’ केले की काम फत्ते. एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील घडामोडी आणि शरीराबाहेरील घडणार्‍या घटना या सार्‍यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे शक्य आहे. यातून प्रत्येक आजारासाठी एक्स रे, एमआरआय, सोनोग्राफी, विविध टेस्ट करत आजारांचे निदान करण्याची गरजच नाही. परिणामी जगातील विविध देशांतील अनावश्यक होणारा खर्च कमी करणे ‘मोटस’मुळे शक्य होईल. तसेच संपूर्ण मेंदूच चिपवर डाऊनलोड करणे शक्य होईल.

जेनेटिक प्रोग्रामिंग आणि सेमीकंडक्टर (अर्धवाहक) इलेक्ट्रॉनिक्स यांच्या कॉम्बीनेशन केलेले ‘मोटस’ म्हणजे Zeitgeist चित्रपटात दाखविले तसेच म्हटले तरी चालेल असा पृथ्वी नियंत्रक शासन व्यवस्थारुपी ईश्वराचा डोळाच म्हणावा लागेल. विश्वासार्हतेने अकाउंटिबिलीटी व रिस्पॉन्सिबिलिटी यांच्या आधारे देशातील सर्वांनी सरकारी ध्येय धोरणांशी प्रामाणिक राहून राष्ट्रीय अजेंड्यावर कार्य केल्यास मानवी अन्न, वस्त्र व निवारा या गरजा नियंत्रित करुन सुयोग्य पद्धतीने त्याचा लाभ समानसंधी देत अब्जावधी लोकांना कसे देणार आणि लोकांवर देखरेख कशी ठेवणार? यावर सरळ व सोपा उपाय आहे की जनतेला शरीरात ‘मोटस’धारक बनवून टाकणे. प्रोग्रामिंग केल्यास अब्जावधी लोकांचे मन व मेंदू नाही तर प्रत्येक हालचालीवर मॉनिटरींग म्हणजे देखरेख, कंट्रोल म्हणजे नियंत्रण आणि त्यांच्या हवे तसे कृतीत बदल घडवून आणणे शक्य आहे. एवढेच नव्हे तर एखाद्या गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याबद्दल ऑन द स्पॉट नियंत्रण कक्षातून गुन्ह्याची शिक्षा देणे ताबडतोब शक्य आहे.

एरोप्लेनमध्ये असलेल्या ब्लॅकबॉक्सप्रमाणे माहिती जतन करण्याचे फिचरदेखील ‘मोटस’मध्ये असल्याने गडे मुडदे उखाडण्याची गरज नसेल. तसेच एखाद्याला अमरत्व देणे शक्य होईल, कारण लवकरच संपूर्ण मेंदूच चिपवर डाऊनलोड करणे शक्य होणार आहे.

तंत्रज्ञानाची ही ‘भगीरथ-गंगा’ रोखणे केवळ अशक्य आहे. सो लवकरच जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) किंवा सरकारी आदेश आले की, इच्छा असो वा नसो आपल्याला आपल्या शरीरात या ‘मोटस’ चिप लसीकरणासारख्या टोचून घेत आपल्या शरीराच्या अंतर्बाह्य घटकांची माहिती ‘विशिष्ट केंद्रां’ना प्रदान करावी लागेल. हे जबरदस्ती वाटण्याचा ऑप्शनच कदाचित शिल्लक नसेल. परग्रहवासी किंवा एलियन यांची ही हुश्शारी आहे की मानवी पृथ्वी नियंत्रक हुश्शार, या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळणे अजूनही बाकी आहे!

(लेखक भौतिकशास्त्रज्ञ व तंत्रज्ञ आहेत )