घरफिचर्सरोजचा पर्यावरण विचार...

रोजचा पर्यावरण विचार…

Subscribe

पर्यावरणीय विचार किती कठीण आहे, हे समजले असेलच. जेव्हा तुम्ही स्वत:ला ‘पर्यावरणवादी’ म्हणतात तेव्हा तुमच्या आयुष्यातील जीवनातील प्रत्येक गोष्टीचा असा विचार करीत असता का? हाच पर्यावरणीय विचार मोठ्या प्रमाणावर नगरपालिका, महानगरपालिका, राज्य-केंद्र शासन स्तरावर होते की आंतरराष्ट्रीय भांडवलाची खेळवणूक करताना, पर्यावरणीय विचार होतो का?होत नाही हे सत्य आहे. - सत्यजीत चव्हाण

पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे. ‘सेव एनव्हार्यनमेंट’. चला एक दिवस पर्यावरणासाठी. अशा बर्‍याचशा घोषणा कॅच लाईन आपण दररोजच्या जीवनात बघत असतो. परिसरात घडणार्‍या घडामोडी, आपला त्याकडे बघायचा दृष्टीकोन यावर आपला पर्यावरणीय विचार बनत असतो. पण तो सत्याच्या कसोटीवर खरा असतो का? हे आपणास कसे कळणार. आज आपण त्याच्या काही कसोट्या, कारणासहीत पाहणार आहोत.

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची… हवा, जमीन, झाडे, पक्षी, सर्व प्रकारचे प्राणी, किटक, नद्या, समुद्र, तलाव इत्यादी गोष्टी.

- Advertisement -

आता ‘पर्यावरण’ विचार करताना वरील उल्लेखलेल्या गोष्टींचे रक्षण झाले पाहिजे. किंवा निरोगी पर्यावरणात वरील गोष्टी सुरक्षित व उत्कृष्ट स्वरुपात राहतात. पुन्हा या गोष्टींचा परस्परावलंबित्वाचा संबंध आहेच.

मानव म्हणून आपल्या काही मूलभूत गरजा आहेत. पहिली म्हणजे अन्न. अन्नाचे उत्पादन शेतीद्वारे होते. तर शेती कशा प्रकारची, अन्न आपणापर्यंत कसे पोहोचते, हे बघणे महत्त्वाचे. उदा. रासायनिक किटकनाशके, रासायनिक खते यांचा वापर. या किटकनाशकांनी चांगल्या पराडी भवनात मदत करणार्‍या किटकांचाही नाश होऊन उत्पादन घटते. तसेच तयार होणार्‍या धान्यात त्यांचा विषारी अंश राहून मानवी शरीरात गेल्याने कर्करोगादी गंभीर आजार उद्भवतात.

- Advertisement -

रासायनिक खतांनी जमिनीचा नैसर्गिकरित्या बॅक्टेरियाद्वारे नायट्रोजन-फॉस्फोरस संक्रमित करण्याचा क्रम बिघडतो. आणि हळूहळू जमीन कमी उपजीव होत जाते त्यातील सुक्ष्म प्राणि जीवन संपते. रासायनिक खतांची मात्रा वर्षामागून वर्षे जास्त लागते.

पर्यावरणीय विचार करताना म्हणूनच नैसर्गिकरित्या पिकविलेल्या अन्नाचा विचार करणे भाग आहे. तसेच आपले अन्न कुठून येते. किती लांबून येते? हा ही विचार पर्यावरणीय विचार आहे. जेवढे अन्न लांब तेवढे तुमच्यापर्यंत आणायची व्यवस्था राबवावी लागते. आणि ही व्यवस्था खनिज इंधन जाळून वाहतूक व्यवस्थाच असते. म्हणजेच तुमच्या अन्नाचा घास तोंडात जाताना त्याची कार्बन फुट प्रिंट म्हणजेच अन्न शेतात असल्यापासून त्यावर प्रक्रिया करून, वाहतुकीद्वारे तुमच्यापर्यंत पोहचवितात. किती ‘कार्बन’ वातावरणात सोडला गेला.

आता आपण दुसर्‍या मूलभूत गरजेवर येऊ.

वस्त्र : आपण वस्त्र कुठून खरेदी करतो? मॉलमधून. मॉलची कार्बन फूटप्रिंट काय असेल? किती वीज लागत असेल. किती कोळसा जाळला जात असेल? की खादी चरख्यावरची घेतो. सुती वस्त्रांना कापूस कुठला येतो? विदर्भातला? बी.टी. कॉटनच्या बियाणापासून बनलेला, विषारी किटकनाशकं फवारलेला… बोंड अळीने घात केलेला… किती शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या. या कापूस शेतीने? याची आकडेवारी आपण ठेवतो की एक जीन्स. याच कुठल्यातरी शेतातल्या कापसापासून बनलेली. त्यात एका सोडून चार जीन्स असल्या तर? किती आत्महत्या आठवतात???

नकोसा वाटतो ना पर्यावरणीय विचार… मग सिंथेटीक वस्त्रे. खनिज तेलाची बाय प्रॉडक्ट असलेली. पॉलिएस्टर वगैरे. खनिज तेलाच्या उत्खननापासून जाळण्यापर्यंत किती कार्बन उत्सर्जित होतो. या कार्बन उत्सर्जनाच्या परिणामाने पर्यावरणच काय पृथ्वीच. तिच्यावरच जीवन धोक्यात आले आहे.

आता पर्यावरणीय विचार म्हणजे काय, याचा अंदाज आपल्याला आलाच असेल. तर तिसर्‍या मूलभूत गरजेकडे वळूया.

निवारा : निवार … म्हणताच आपल्या नजरेसमोर इमारती उभ्या राहतात. शहरातील नीम शहरातील दाटीवाटीने अ‍ॅम चोरून उभ्या राहिलेल्या सिमेंट काँक्रिटच्या इमारती. हे काँक्रिट कसे तयार होते? खाणीतील दगडापासून पावडर तयार करून, अति उच्च तापमानाला जाळून सिमेंट तयार होते. या सिमेंटमध्ये मिक्स होणारी रेती कुठून येते. नद्यांची पात्रे खरडवून पात्रातील जीवन संपवून विटा कुठून येतात? शेत जमिनीचा बारीक मातीचा एक-दीड फुटाचा स्तर काढून तो भाजून वर्षानुवर्षे जो मातीचा स्तर अन्न (परुवत हेता) तो एका क्षणात भाजून वीट होती. बांधकामात लागणारे लोखंड खाणीतून खाणी जगल्या खालच्या जंगल कापून नष्ट करून लोह खनिज काढले जाते.

निवारा : पर्यावरणीय विचार किती कठीण आहे, हे समजले असेलच. जेव्हा तुम्ही स्वत:ला ‘पर्यावरणवादी’ म्हणतात तेव्हा तुमच्या आयुष्यातील जीवनातील प्रत्येक गोष्टीचा असा विचार करीत असता का? हाच पर्यावरणीय विचार मोठ्या प्रमाणावर नगरपालिका, महानगरपालिका, राज्य-केंद्र शासन स्तरावर होते की आंतरराष्ट्रीय भांडवलाची खेळवणूक करताना, पर्यावरणीय विचार होतो का? होत नाही हे सत्य आहे. त्याचे गंभीर परिणाम दिसत आहेच. किमान आपला मानव म्हणून पर्यावरण स्नेही होऊ शकत नाही हे एकदाचे मान्य करूनच टाकून … निगरगट्टाचे जीणे सुरू करुयात. पृथ्वी काय राहील तेवढी राहील.

‘पर्यावरणीय विचार’ फार कठीण गोष्ट आहे. विस्तवाशी खेळ आहे. मिरवायची गोष्ट नाही एवढेच.

सत्यजीत चव्हाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -